माझा भाऊ परदेशातुन येण्याअगोदरच त्याने आम्हाला लोणावळा येथे आपल्या कुटुंबाची एक दिवसाची सहल आयोजित करण्यास सागितली. मी माझ्या दुसर्या भावाला एक बगंला बुक करण्याची माहिती दिली. त्याने त्याचा मित्राबरोबर हल्लीच जाऊन आलेल्या बगल्यांची बुकिंग विषयी बोलणी केली व बगंला मिळेल असे त्याने कळविल्यामुळे आम्ही निषींत झालो. भाऊ मुबंईत आल्यानतंर दोन दिवसानी शनिवार व रविवार घरुन लोणावळ्याला जाण्याचे ठरविले.बहीणीने तिचा मुलासह रेल्वेने प्रवास करीत मला ठाण्यात भेटली व आम्ही सर्वजण रेल्वेने प्रवास लोणावळा येथे पोहचलो.
आई बाबाना व दुसर्या भावाला घेऊन एनआरआय भाऊ त्याच्या कुटुंबालासह मोटार गाडीने लोणावळ्याला निघाले. लहान मुलांनी खेळाची सर्व साधने बरोबर घेतली. सर्वजणानी जमवुन ही सहल मोठया उत्साहाने निघाली होती. आईबाबा सर्व मुलं व नातवांडासह सहलीला निघाल्यामुळे खुशीत दिसत होते. मुले व आईबाबासह सहलीला एकत्र जाण्याचा योग आल्यामुळे आम्ही खुशीत होतो. सहलीतील करमणुकीची सर्वसाहीत्य गोळा करुन गाडीत टाकुन मुलांनी आणली होती. लोणावळा येथे बगच्यापुढे व बुशी डँमच्या अगोदर वनराई मघ्ये आमच्या बंगल्याचे बुकींग भावाने केले होते. तेथे पोहचल्यानतंर भावाने त्या माणसाला गाठुन बंगल्याच्या बुकींगची चौकशी केली.त्याने त्याच्या बुकींग वहीत ,पाहुन तुमच्या नावांने बुकींग नाही व कोणाचा फोनही आलेला नाही.हे एकुन आम्ही सर्वजण आवाक झालो व एकामेकांकडे पाहु लागलो.नाराज झालो.भावाने फोनाफोनी सुरु केली पण ज्याच्या नावांने बुकींग केले होते तो काही फोन उचलत नव्ह्ता व वनराईतले आम्हाला दुसरा बंगला देत नव्हते. अशा अडचणीत आमचे कुटुंब सापडले.आम्ही एकमेकाला दोष देउ लागलो. पडिक,अस्वच्छ व भरपुर भाडयाचे दोन बगंले आम्ही नापसंत करुन स्वत:लाच दोष देत तेथुन निघालो. सर्वजणाना एका बगीच्यात बसवुन मी एनआरआय भावाला घेउन लोणावळ्यातील सर्व एजंटना भेटलो व काही हॉटेल पालथी घातली पण कोठेच सोय झाली नाही. दोन दिवसापुर्वी लोणावळ्यात कस्टम अधिकार्यानी धिगांणा घातल्यामुळे व पोलीसांच्या भीतीमुळे आम्हाला कोणीच जागा देण्यास तयार नव्हते. आम्ही शोध मोहीम थांबविली व मुबंईला परतण्याचा निर्णय घेतला.सर्वाना एकत्र आणुन जेवण केले व चिक्की खरेदी केल्यावर गाडी एक्सप्रेस हायवे पळायला लागली. सगळेजण विशेषत: मुले एकदम नाराज झाल्यामुळे जो येताना उत्साह होता तो आता नाहीसा झाला होता. अजानतेपणे आमच्या कडुन चुक झाल्यामुळे सगळ्याचा विरस झाला.तसा तुमचा होउ नये म्हणुन बाहेर निघताना पुर्ण खात्री करुनच सहलीला निघा.

No comments:
Post a Comment