Friday, April 7, 2017

साहित्य संमेलनात युवा पिढी                       साहित्य संमेलनात युवा पिढी 
साहित्य संमेलन म्हणजे मराठी साहित्यप्रेमींचा दोन-तीन दिवस चालणारा आनंद महोत्सव असतो.मराठी साहित्य संमेलन दरवर्षी कोणत्या ना कोणत्या वादाच्या भोवऱ्यात सापडते. सहित्य संमेलनात वारंवार होणार्‍या या मानापमानाच्या नाट्यांमुळे आपले मराठी साहित्यावरचे प्रेम आणि आदर कमी होत आहे.पण तरीही त्या संमेलनाचे आकर्षण व प्रतिष्ठा मात्र कायम टिकून राहिलेली आहे.

साहित्यातून देशाची संस्कृती, मानवी मनाचे व स्वभावाचे चित्रण दिसून येते.त्यामुळेच युवा पिढी संस्कारक्षम, सोज्वळ व ज्ञानपूर्ण घडविण्यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजित करणे, हे अत्यंत गरजेचे आहे. पण युवा पिढीचे शिक्षण मराठी भाषेतून होत नसल्याने त्यांना मराठी 
साहित्याकडे ओढ नाही.याचा परिणाम साहित्य संमेलनांवर होत आहे.युवा पिढीने साहित्य संमेलनांकडे पाठ फिरवली आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तरुणांचा सहभाग आणि वाचकांचा सहभाग वाढावा यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी प्रामुख्याने पुढे आली आहे.  

 युवापिढी सुधारण्यासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार होणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. युवापिढी ज्यावेळी संस्कारक्षम घडेल, त्याचवेळी आपल्या साहित्याचा ख-याअर्थाने उपयोग झाला असे म्हणता येईल. साहित्याचा प्रवास अनंत काळापर्यंत चालण्यासाठी साहित्य मनात रूचविणे व रूजविणे, यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे समाज घडविण्याचे चांगले माध्यम आहे. 

सध्याचे सर्व स्तरांतील युवक इंटरनेट, मोबाइल, टीव्ही व अन्य माध्यमांद्वारे इतके काही पाहत व ऐकत असतात की, युवा साहित्य संमेलनातून त्यांना वेगळे असे काय आणि किती मिळणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असल्याने संमेलनापासून  युवावर्ग निश्चित दूर झालेला आहे.

केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या मराठी वाचक-लेखकांना एकाच व्यासपीठावर कसे आणता येईल, या विचारातून ई-साहित्य संमेलनाची संकल्पना आकाराला आली व 
ई-साहित्य संमेलने नेटवर भरली.पंचवीसहून अधिक देशांतील मराठी रसिक वाचक या संमेलनातून  सहभागी होतात.संमेलनाचा आस्वाद घरबसल्या घेता येणार असून त्यात सहभागीही होता येते. त्यामुळे जगभरातील मराठी वाचकांना संवादाची मोठी संधीही मिळते.अशा ई-साहित्य संमेलनातून  युवा पिढीला आणाले तर त्यांना साहित्यात नक्की गोडी निर्माण होईल. 

 मुळात मराठी वाचकांचा टक्का कमी होत आहे. तो वाढवण्यासाठी तरुण पिढीचा सहभाग संमेलनात होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावे. जेणेकरून तरुण पिढी पुन्हा वाचनाकडे वळेल. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयातील किमान विद्यार्थ्यांचा सहभाग संमेलनात असावा. असे झाले तर त्यांच्यापर्यंत आपली मराठी संस्कृती पोहोचेल आणि मराठी वाचक वाढण्यास मदत होईल.वाचनसंस्कृती नव्या पिढीमध्ये रुजविण्यासाठी काय करता येईल याचा विचारच साहित्य संमेलनातून झाला पाहिजे.


   युवा साहित्य संमेलनांची गरज गेली अनेक वर्षं केली जात आहे.अन्य माध्यमे देऊ शकत नाहीत ते साहित्य संमेलनातून मिळणार असेल तर त्याकडे युवावर्ग निश्चित वळेल, किंबहुना इतर माध्यमे देत नाहीत ते युवा संमेलनातून दिले जावे. 

Wednesday, August 10, 2016

अपयशी संघर्षईशान्य भारतात लागू असलेला लष्कराचा विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) हटविण्याची मागणी करत मागील सोळा वर्षांपासून उपोषण करत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी अत्यंत जड अंत:करणानं उपोषण सोडल्याने अपयशी लढाईची सांगता झाली. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी लढाई थांबवली आहे.पंधरा वर्षांपेक्षा जास्त  काळ उपोषण करून जगातील सर्वाधिक उपोषण  करणारी व्यक्ती ठरलेल्या इरोम चानू शर्मिला ला "मणिपूरची लोहमहिला‘ संबोधले जाते.इरोम शर्मिला यांनी तब्बल १६ वर्षं अन्नपाण्याचा त्याग केला होता. त्यामुळे सरकारने त्यांच्या अन्ननलिकेत नळी सोडून त्यांना लिक्विड स्वरूपात पोषक घटक पुरवण्यात येत होते. ४ नोव्हेंबर २००० रोजी आसाम  रायफल्सच्या जवानांकडून मणिपूरमध्ये १० नागरिक मारले गेले होते.त्या घटनेचा निषेध  करत मणिपूरमध्ये लष्कराला असलेला विशेषाधिकार रद्द करण्यात यावा या मागणीसाठी  इरोम शर्मिला यांनी तेव्हापासूनच उपोषणाला सुरूवात केली होती. शर्मिला यांनी हा कायदा रद्द व्हावाच या कळकळीने सुरू केलेले उपोषण अनेकवेळा अटक झाल्यावरही सोडले नाही. 

इरोम यांच्या उपोषणावरून लोकांमध्ये दोन मते बनली आहेत. इरोम यांनी विशेषाधिकार रद्द करण्याचे लक्ष्य साध्य झाल्यानंतरच उपोषण सोडायला हवे होते असे एका गटाचे मत आहे तर दुसर्‍या गटाने तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. 

आताचे राजकिय नेते सामान्यांसाठी असा संघर्ष करतील का? 

आसाम मध्ये दहशतवादी हल्ल्यात सामान्य नागरीक व जवान मारले जात आहे.
सरकारकडे इच्छाशक्ती असेल हे हल्ले बंद होऊ शकतात व कोणाला असा दिर्घ्काळ संघर्ष करावा लागणार नाही.

Tuesday, August 9, 2016

महिलांवरील अत्याचार रोखावेत.स्त्रियांवरील अत्याचारांच्या बातम्या सध्या वारंवार येऊन धडकत आहेत.पूर्वी बलात्कार होतेच नव्हते,असे कोणीही म्हणंणार नाही: परंतू आजकाल त्यांची संख्या लक्षणीय म्हणावी इतकी वाढलेली दिसत आहे.विकास आणि सुसंस्कृतपणात अग्रेसर असल्याचा टेंभा मिरवणा-या महाराष्ट्रातूनच या बातम्यांची मालिका सुरु असल्याने कुणादी सुजाण नागरीकास त्याची लाज वाटेल.बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे शारिरीक शोषण, खुले आम होणारी अश्लील शेरेबाजी, वासुगिरी, दुकानातील छोटय़ा चेंजिग रुममध्ये छुप्या कॅमेऱ्यातून तयार होणाऱ्या ‘व्हिडीओ क्लिप’ आदी माध्यमातून महिला व युवतींचे शोषण सुरू आहे.समाज कोठे चालला आहे?  
महिलांवरील अत्याचार वा विनयभंगाच्या घटना देशात रोज कुठे ना कुठे घडत असतात, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. देशात पोलीस आहेत, सुरक्षा यंत्रणा, कायदे, न्यायालये, अपराध्याला शिक्षा या सर्व गोष्टी असतानाही स्त्रियांवर अत्याचार करू पाहणा-या नराधमांना कायद्याची जराही भीती वाटत नाही वा आपल्या कृत्याची जराही लाज वाटत नाही, ही खरोखर चिंतेची बाब आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता घराबाहेर पडलेली स्त्री सुरक्षित नाही, अशीच सार्वत्रिक भावना दिसते. घराबाहेर पडलेल्या नोकरदार महिलेवर किंवा शाळा-महाविद्यालयात जाणा-या मुलीवर कुणाचा कधी हल्ला होईल, तिचे अपहरण होईल, बलात्कार होईल, तिच्यावर अ‍ॅसिड वा उकळते तेल फेकले जाईल, याची शाश्वती उरलेली नाही.महिलांवरील लैगिंक अत्याचार व हिंसक हल्ले कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळेच थांबविता येऊ शकतील. अपराध्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. त्याचबरोबर समाजामध्ये महिलांबद्दल जो पूर्वापार खोल रुजलेला दूषित दृष्टिकोन आहे तो बदलण्यासाठी सामाजिक मानसिकताही बदलणे गरजेचे आहे. 
गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाणही कमी आहे.हे प्रमाण वाढले पाहिजे यासाठी सार्वत्रिक प्रयत्नाची आवश्यकता आहे.राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांची तड लागावी, हे गुन्हे कमी व्हावेत यासाठी सरकारने योजलेल्या उपाययोजनांना चांगले यश मिळत आहे.

राज्यामध्ये वाढत्या व्यसनाधीनतेमुळे महिलांवरील अन्याय, अत्याचार वाढत चालले आहेत. शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने त्यांची हत्या केली जाते.कायद्याने महिलांना हक्क व संरक्षण दिले असले तरी समाजात समानतेची भावना अजून वाढीस लागली नाही. स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने समर्थपणे काम करीत असल्या तरी दारूमुळे महिलांवर होणारे अत्याचार वाढले आहेत.देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर "केवळ कडक कायदे करणे पुरेसे नाही.

 महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न केवळ भारतापुरता मर्यादित नाही.खरे म्हणजे हा महिलांच्या हक्काचा प्रश्न नसून मानवी हक्काचा प्रश्न आहे. जर महिलांना सुरक्षित वाटत नसेल तर संपूर्ण समाजाचीच उलथापालथ होते आणि त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघांनी उठून अन्याया विरुद्ध झगडून योग्य मार्ग शोधला पाहिजे. माझा ठाम विश्वास आहे की मानवी मूल्यांचे जतन करून महिलावरील अत्याचार रोखण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे . 


महिलांवर होणार्‍या अन्याय-अत्याचारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे करून त्या कायद्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासन आपल्यापरीने प्रयत्न करत असताना या कामात सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घ्यावा असा प्रयत्न करण्यात येत आहे. सजग व जागरूक नागरिकांनी असे अत्याचार रोखण्याकरिता सहभाग घेतल्यास महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. सजग नागरिकांना प्रोत्साहित केले तर परिस्थिती सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. या पध्दतीने महिलांवरील अत्याचारविरूध्द काम करणाऱ्या नागरिकांसाठी निर्भय पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.याबद्द्ल कितीजणांना दिला काही कळले नाही कि कोणीही महिलांवरील अत्याचारविरूध्द काम केले नाही.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्वांनीच पुढे येणे गरजेचे असून, समाजानेसुद्धा आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.

अत्याचारच होऊ नये अथवा ते रोखणे महत्वाचे आहे.

Saturday, August 6, 2016

सुंदर, साजिरा श्रावण आला!

                          सुंदर, साजिरा श्रावण आला !
हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला
तांबुस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला
मेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला
लपत, छपत, हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आला
इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला
लपे ढगामागे, धावे माळावर, असा खेळकर  श्रावण आला
                                                                              सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला
 श्रावण म्हणजे निसर्गाची रंगपंचमी. ओल्या मातीतून, गंधातून पुलकित करणाऱ्या या काळात नव्या पानाफुलांच्या आगमनाने श्रावणाच्या बहराला पूर्तता येते.सृष्टीने रानफुलांची कोवळ्या किरणांनी विणलेली सुंदर भरजरी किनार असलेला हिरवा शालू नेसताच श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागते.  

 श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. हिरव्या रंगांची विशाल वस्त्रे एकावर एक लपेटून उभे असलेले चराचर डोळ्यांचे पारणे फेडते. ज्येष्ठात सुरू झालेला पावसाळा श्रावणात चांगलाच स्थिरावलेला असतो. या दिवसांत ऊन-पावसाचा लपंडाव चाललेला आढळतो. क्षणात आभाळात काळ्या ढगांची पीछेहाट होऊन सूर्याची किरणे धरणीवर तेजाची बरसात करतात, तर दुसऱ्याच क्षणी गडद निळे ढग, सूर्यकिरणांना मागे सारून घननीळ बरसतो आणि रेशीमधारा रिमझिमतात. जलधारांची बरसात करू लागतात. जलबिंदूंच्या माध्यमातून सूर्याच्या सप्त रंगांचे मनोहारी दर्शन घडविणारा श्रावण.कधी ऊन तर कधी पावसाच्या खेळात हिरवाईने नटलेली सृष्टी ही श्रावण मासाची खासियत.

मृग संपले आणि त्या जोरदार पावसाच्या आगमनाने सारे काही मनासारखे घडून आले. नदी-नाले, ओढे तुडुंब झाले. धरणे भरू लागली.  चांगला पाऊस कोसळू लागला. विहिरींना पाणी आले परिसर हिरवागार होऊन एका नव्या नवलाईने चिंब भिजून गेला. काय विलक्षण सामर्थ्य आहे या निसर्गशक्तीत.. 
 व्रतवैकल्याचा आणि सृष्टीला हिरवागार शालू नेसवलेला सुंदर-साजिरा श्रावण हा आज धरतीवर पाऊल ठेवेल. वसंतऋतूपेक्षा वेगळ्या तऱ्हेच्या पावसाळी फुलांनी हिरव्यागार वृक्षलतांनी नटलेली विलक्षण चिरसुगंधी विविधरंगी फुले हसऱ्या-नाचऱ्या श्रावणाला लाजरा बनवतात.. 


    श्रावणाच्या आगमाने अवघी सृष्टी हिरवीगार झाली आहे. वेगवेगळी फुलेही उमललेही आहे. त्यांवर भिरभिरणारी फुलपाखरे बघतांना मन सुखावते. त्याचे मनमोहक रंग जणू सर्वांवर मोहिनीच करतात. सगळ्या सृष्टीसकट मनामनांची मरगळ धुऊन काढणारा श्रावण सगळ्यांचाच सखा बनतो, तो आपल्या विविध रंगांच्या नर्तनाने सगळ्यांची मनं जिंकतो. 


             चोहीकडे दाटलेली हिरवळ आणि ’क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे’ अशा आल्हाददायी वातावरणामुळे खरोखरंच ’श्रावण मासी हर्ष मानसी’ झालेला असतो. श्रावण म्हणजे पावसाच्या सरी, हिरवी दुलई पांघरलेली वसुंधरा, प्रत्येक थेंबानिशी स्वच्छ झालेले सृष्टी, 

निसर्गातील स्थित्यंतरांचे मनमोहक रुप दाखविणारा महिना सारी सृष्टी आनंदोत्सव साजरा करते.
Saturday, June 11, 2016

असामान्य कर्तृत्वास सलाम

                                                  वीरपत्नीचा आदर्श


शहीद कर्नल संतोष महाडिक यांना देशाच्या सीमेच रक्षण  करत असताना  वीरमरण आले होते.शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर वीरपत्नी स्वाती यांनी ' माझी दोन्ही मुलं तर मिलिटरीतच जातील, पण मीही देशसेवेसाठी सारं आयुष्य झोकून देईन !'..हा केलेला निर्धार अखेर त्यांनी खरा करुन दाखविला आहे.त्या अत्यंत अवघड अशा सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या परीक्षेत पास होऊन लष्कारत दाखल होत पतीला सन्मानपूर्वक मानवंदना दिली.पतीची अर्धवट राहिलेली देशसेवा पूर्ण करण्याची जिद्द स्वाती यांच्यात निर्माण झाली आणि ही वीरपत्नी आता वीरश्री गाजविण्यासाठी पुढे आली आहे.कोणाची मदत न घेता स्वत:च्या कर्तृत्वाने हे आव्हान पेलून त्यांनी कुटुंबात देशप्रेम ठासून भरल्याचे सिद्ध केले आहे.पती संतोष जसे देशसेवेसाठी शहीद झाले तसे आपण व आपली दोन्ही मुले देशसेवेसाठी अविरत लढू, हा स्वाती यांचा निर्धार असामान्य कर्तृत्वास सलाम करावा असाच आहे.


देशसेवा, समाजप्रेम असलेल्या या वीरपत्नीने इतरांसमोर एक नवा आदर्शच ठेवत साऱ्या तथाकथित देशभक्तांना आपल्या कर्तृत्वाने सणसणीत चपराक लगावली.नि:स्सीम देशभक्तीला सलाम ...


Sunday, June 5, 2016

आदरनीय व्यक्तिमत्व


 मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री  सुलभा  देशपांडे ह्या एक खंदे व्यक्तिमत्व हरपल्याची भावना  व्यक्त होत आहे.नाटक, मालिका तसेच     मराठी आणि   हिंदी चित्रपट यांना जोडणारा सुलभा देशपांडे     नावाचा महत्त्वाचा दुवा निखळला.आपल्या सहज अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या आणि सर्वाची पडद्यावरची  प्रेमळ 'आई' अशी ओळख असलेल्या सुलभा देशपांडे.अशा या    अष्टपैलू मराठी  अभिनेत्रीला महाराष्ट्राने गमावले  आहे.   


 १९६०पासून सुलभा देशपांडे नाट्यसृष्टीशी संबंधित होत्या. विजय तेंडुलकर, विजया मेहता यांच्यासोबत त्यांनी ‘रंगायन’ या नाट्यसंस्थेची चळवळ सुरू केली. पण पुढे ‘रंगायन’ फुटल्यावर १९७१मध्ये त्यांनी त्यांचे रंगकर्मी पती अरविंद देशपांडे तसेच नाट्यकर्मी अरुण काकडे यांच्यासमवेत ‘आविष्कार’ या नाट्यसंस्थेचे सुकाणू हाती धरले. ‘आविष्कार’ने प्रायोगिक रंगभूमीवर ‘छबिलदास चळवळ’ रुजवली आणि समस्त नाट्यसृष्टीला तिची दखल घेणे भाग पाडले.

सुलभा देशपांडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या सुलभा कामेरकर! आधी त्या छबिलदास शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. तिथेच त्यांच्यात नाट्यबीज रोवले गेले. याच काळात त्या ‘रंगायन’च्या संपर्कात आल्या. त्यानंतर राज्य नाट्य स्पर्धा त्यांनी गाजवल्या. १९६७मध्ये त्यांनी ‘शांतता... कोर्ट चालू आहे’ या नाटकात ‘बेणारे बाई’ ही भूमिका रंगवली आणि त्या लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचल्या. या नाटकातले त्यांचे स्वगत आजही माइलस्टोन म्हणून ओळखले जाते. एकीकडे ‘आविष्कार’ची धुरा वाहत असतानाच त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांकडेही पावले वळवली.

‘आविष्कार’ने बालनाट्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘चंद्रशाला’ संस्थेची स्थापना केली आणि त्यात सुलभा देशपांडे यांचे मोठे योगदान होते. या संस्थेने ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटक रंगभूमीवर आणले. हे नाटक प्रचंड गाजले आणि ‘चंद्रशाला’ची ख्याती वाढत गेली. ‘बाबा हरवले आहेत’, ‘पंडित पंडित तुझी अक्कल शेंडीत’ अशी नाटके सादर करून त्यांनी ‘चंद्रशाला’चे नाव प्रकाशात आणले. अरुण काकडे यांच्या साथीने त्यांनी ‘आविष्कार’ अखंड कार्यरत ठेवली. मराठी चित्रपटांसह, दूरचित्रवाणी मालिका आणि अनेक हिंदी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.

पुरस्कार : संगीत नाटक अकादमी पुरस्कार, नानासाहेब फाटक पुरस्कार, गणपतराव जोशी पुरस्कार, वसंतराव कानेटकर पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, तन्वीर सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला. ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करून राज्य शासनाने त्यांच्या रंगभूमीवरील निष्ठेचा यथोचित गौरव केला.

मराठी चित्रपट : जैत रे जैत, भूमिका, हेच माझं माहेर, मला आई व्हायचंय, चौकट राजा, विहीर, हापूस, इन्व्हेस्टमेंट इ. ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या निधनामुळे मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपले आहे. आविष्कार या नाट्यनिर्मितीच्या माध्यमातून त्यांनी बालरंगभूमीला व्यासपीठ मिळवून दिले. ‘शांतता... कोर्ट चालू आहे’मधील बेणारे बाई, ‘सखाराम बार्इंडर’मधील चंपा ते हल्लीच्या ‘मिसेस तेंडुलकर’ या विनोदी मालिकेतील राणे आजी या भूमिकांमधील त्यांचा बाज, आवाका, एकूण मांडणीतील त्या व्यक्तिरेखेची व्याप्ती हे सारेकाही भिन्न. अशा या अष्टपैलू अभिनेत्रीला महाराष्ट्राने गमावले आहे.

कौमार्य परीक्षा कुणासाठी? कशासाठी?

नाशिकमधल्या एका गंभीर घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. कंजारभाट जातपंचायतीने नुकतंच लग्न झालेल्या तरुणीची कौमार्याची परीक्षा घेतल्याची धक्कादायक घटना घडलीये. शिर्डीमधल्या एका मुलीचा नाशिकमधल्या मुलाशी विवाह झाला. मात्र, लग्नानंतर लगेचच नवरीच्या कौमार्याची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये ही मुलगी नापास झाल्याचा दावा जातपंचायतीनं केला.त्यानंतर नवरीला लग्नघरीच सोडून वर्‍हाडी निघून गेले. नवर्‍या मुलानेही जातपंचायतीच्या सांगण्यावरून लग्नही मोडलं. विशेष म्हणजे या मुलीनं पोलीस भरतीसाठी ती प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती ट्रेनिंगही घेत होती. मुलीनं स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न केला. पण कोणीही तिचं ऐकलं नाही.कौमार्य परीक्षा प्रकरणी संबंधित नवर्‍यामुलाने पीडित मुलीची माफी मागितल्यानंतर वधू-वराने पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कौमार्य परीक्षेवरून मोडलेला संसार आता पुन्हा सावरला आहे.

कौमार्य परीक्षेत विवाहित महिला उत्तीर्ण न झाल्याने तिला दोषी ठरवत पतीने तिला लग्नानंतर दोनच दिवसांत माहेरी पाठवून नांदवण्यास नकार दिला. ही घटना घडली आहे, नासिक जिल्ह्यातील संगमनेर येथे. भारत विविध क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करत आहे. जगाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठीचे जे काही प्रयत्न करता येईल ते भारताकडून करण्यात येत आहे. अशावेळी अजूनही मंदिरात महिलांना प्रवेशासाठी संघर्ष करावा लागत आहे. पंचायतींकडून सहजच विवाह मोडले जातात. त्याला कारण तसे क्षुल्लकच असते. संगमनेर येथील घटनेतील कारणही याच प्रकारात मोडणारे आहे. पण एका छोटय़ाशा कारणामुळे एका मुलीला पुन्हा माहेरी पाठवण्यात आले. तिचा दोष हाच होता की ती लग्नानंतरच्या कौमार्य परीक्षेत उत्तीर्ण झाली नाही.

लग्न हा भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. विशिष्ट वय झाल्यानंतर उपवरांचे लग्न लावून देण्यात येते. मुलगी सुस्वरूप हवी, ती कामसू असावी, अशी अनेक मुलांची अपेक्षा असते. त्यातच ती ‘व्हर्जिन’ असावी ही मुख्य अट असते. त्यातूनच मग अशा घटना घडत असतात. मुळात वयात आल्यानंतर कौमार्य परीक्षा वगैरे फॅडचा उदय होत असतो. स्त्रीमधील स्त्री सुलभ अवयव विकसीत झाल्यानंतर ती विवाहयोग्य होते, असे आपल्याकडे मानले जाते. त्यानंतर यथाशक्ती तिचा विवाह योग्य वर पाहून लावून दिला जातो. अनेकदा स्पर्धेच्या युगात स्त्रीयाही पुरूषांसारखेच अंगमेहनतीचे, कसरतीचे कामे करतात. यात त्यांच्यात काही बदल झाल्यास त्यामुळे ती चारित्र्यहीन कशी ठरू शकते? हाच नियम पुरुषांना का लावला जात नाही, याचे कोडे अद्यापही सुटलेले नाही. रूपवान, चारित्र्यसंपन्न स्त्री आपली पत्नी म्हणून पाहिजे, असे म्हणणारे अनेक पुरूष विवाहापूर्वी व्हर्जिन असतात का? हा खरेतर संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण त्याकडे दुर्लक्ष करीत विशिष्ट भागांभोवतीच्या पावित्र्याच्या खुळचट कल्पनांमध्ये आपली मानसिकता अडकली जाते. ही मानसिकता आता बदलायला पाहिजे.

योनीसुचिता या मानसिकतेभोवती समाजमन अजूनही रूंजी घालत असल्यानेच अशा प्रकारच्या घटना घडत असतात. ग्रीक लोककथांमध्ये तरुणीचे कौमार्य भंग पावू नये म्हणून त्या विशिष्ट भागाभोवती संरक्षण जाळी लावली जायची. ही प्रथा तर रानटी स्वरूपाचीच होती. काही समाजात या विशिष्ट अवयवांवर ब्लेड फिरवण्याची अधोरी प्रथा सुरू होती. मध्यंतरी काही महिलांनी त्याविरोधात आवाजही उठवलेला होता. अशा पध्दतीने या रानटी प्रथा, परंपराविरोधात लढण्याची गरज आहे.

जातपंचायत हा प्रत्येक धर्मातील तमोध्याय आहे. या जात पंचायतींच्या साक्षीने हा कौमार्य परीक्षेचा घाट घालण्यात आला होता. एकेकाळी भारतात घटना अस्तित्वात नव्हती तेव्हा समाजात अनाचार माजू नये, यासाठी जात पंचायतीचे नियोजन करण्यात आले होते. पण काळानुरूप या जात पंचायती स्वत:ला श्रेष्ठ मानू लागल्या. त्यांच्याकडून येणारे निर्णयच ग्राह्य धरावे लागतील, अशी मानसिकता बळावू लागली. त्यातूनच मग दुस-या जातीत लग्न करणा-या मुलीच्या कुटुंबाला वाळीत टाकणे असो, कौमार्य परीक्षा असे प्रकार वाढीस लागलेले आहेत. कुठेतरी हे प्रकार थांबणे गरजेचे आहे. जात पंचायती विरोधातील कायदा राज्य सरकारने केला. पण त्यावर अद्याप राष्ट्रपतींची सही झालेली नाही. ही सही झाल्यानंतर या कायद्याला मूर्त स्वरूप प्राप्त होईल.

काळ ज्या पध्दतीने बदलतो त्याप्रमाणे त्या त्या काळातील रूढी-परंपरा कालबाह्य होत जातात. पण त्याच रुढी,परंपरा यांना कुरवाळत राहिलो तर हाती काहीच येणार नाही. येईल तो मनस्ताप, दु:ख. कौमार्य परीक्षेत उत्तीर्ण न झालेली ही महिला शिक्षित आहे. तिने नव-या मुलाचे अगोदर लग्न झालेले असतानाही त्याला स्वीकारले. हा तिचा त्याग बाजूला ठेवत थेट कौमार्य परीक्षेत अनुतीर्ण झाल्यानंतर घरची वाट धरावी लागत असेल तर त्यासारखे दुर्दैव्य ते कोणते? महिला अंतराळाची प्रदक्षिणा करीत आहेत. पुरूषांसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या कामे करीत आहेत. गुणवत्ता किंवा कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. अशावेळी योनीसुचितेच्या नावाखाली त्यांना कमी लेखणे हा प्रकारच विकृत मानसिकतेचा आहे. तो थांबलाच पाहिजे. इंदिरा संत यांच्या एका कवितेत ‘शिजणारीही तिच अन् शिजवणारीही तिच’ असं स्त्रीचं वर्णन करण्यात आले आहे. खरोखरच शिजत, शिजवणा-या या ‘बाईमाणसाची’ जाचक अटींतून केव्हा मुक्तता होणार?

Wednesday, March 30, 2016

अति महत्वाच्या व्यक्ती सुरक्षित आहेत का?
  दहशतवादी  हेव्हिड हेडलीने तपासणीत 'लष्कर-ए-तोयबा'ने  शिवसेनाप्रमुख     बाळासाहेब ठाकरे  यांना मारण्याचा    प्रयत्न  केला     होता   असा धक्कादायक   खुलासा केला.या अपयशी  प्रयत्नात    हल्लेखोराला  पडकले  होते पण तो पोलिसांच्या कोठडीतून पळून  जाण्यात     यशस्वी  झाला    या माहीतीने  प्रतिष्ठित व्यक्तींच्या सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे निधाले आहेत.सुरक्षा यंत्रणा कडक असताना हा हल्लेखोरे बाळासाहेबांच्या जवळपास पोहचलाच कसा? गुप्‍तचर यंत्रणेचे हे अपयश होते. पोलिसांनी त्याला पकडून शाबासकी मिळवली पण यंत्रणेच्या  निष्काळजीने  तो पळाल्याने नाचक्की  ओढावून  घेतली   आहे.प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा अशी कमकुवत असेल तर सामान्यांच्या सुरक्षेचे काय?सुरक्षा यंत्रणा प्रभावी असेल तेवढे त्या देशाचे नागरिक निश्‍चिंत असतात. असे हल्ले पुन्हा होऊ शकतात.    यासाठीच आपल्या सुरक्षा यंत्रणेचे   कडे सक्षम व  भक्कम असावेत.  सुरक्षा यंत्रणेतल्या त्रुटी दूर करुन  यंत्रणेचे सक्षमीकरण व   आधुनिकीकरण करण्यात यावे  तरच आपण  सुरक्षित राहू.

    अति महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा कवच असावे.देशातल्या अति महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा देण्यात राज्य सरकारांनी कोणतीही कसूर करू नये. केंद्रीय मंत्र्यापासून काही खासदार-आमदारांपर्यंत आणि ज्यांच्या जीविताला धोका असल्याची खात्री वाटते, त्यांना सशस्त्र पोलिसांचे संरक्षण द्यायची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारांवर पडली. 


राष्ट्रपती, पंतप्रधान अशा व्यक्तींना सुरक्षा पुरविणाऱ्या सुरक्षायंत्रणांवर असलेला ताण मोठा आहे. एकाच वेळेस अनेक शक्‍यता गृहीत धरून त्यांना पंतप्रधानांसारख्या व्यक्तींच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी लागते.हा ताण असताना काही महत्त्वाकांक्षी राजकारणी आणि अधिकारी आपल्यालाही कमांडोंची सुरक्षा हवी, असा आग्रह धरतात. ती पुरविली गेली नाही, तर त्यांचा अहंकार दुखावला जातो. या अहंकारी नेत्यांमुळे सुरक्षायंत्रणांवरील ताण वाढतो. ज्यांना गरज नाही, असे फुटकळ नेते जेव्हा पुढे-मागे सुरक्षारक्षक घेऊन फिरतात, तेव्हा करदात्यांकडून मिळणाऱ्या पैशाचा गैरवापर होतो. 

व्हीआयपींना केंद्र आणि राज्य सरकारांकडून दिल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा खर्च होतो. व्हीआयपींच्या सुरक्षा व्यवस्थेत गर्क असलेल्या हजारो जवान आणि अधिकाऱ्यांच्या वेतनाशिवाय त्यांचे भत्ते, प्रवास असा सर्व खर्च केंद्र आणि राज्य सरकारांच्या तिजोरीवरच पडतो. काही राजकारणी नेत्यांना सत्ता मिळताच सुरक्षा व्यवस्थेचा डामडौल मिरवायची हौस असते.निर्लज्ज राजकारण्यांना आणि नोकरशाहांना जनतेच्या पैश्यावर शेखी मिरविण्याची संधी ते का सोडतील? 


पोलिसांच्या- कडची शस्त्रे जुनाट आणि कालबाह्य झालेली असतानाही, अत्याधुनिक शस्त्रे द्यायसाठी राज्य सरकारांच्याकडे पुरेसा निधी नाही. पोलिसांची वाहनेही भंगारात फेकायच्या लायकीची झाली तरी, त्यांना नवी वाहने मिळत नाहीत. गुंडांच्या टोळ्यांच्याकडे मात्र अत्याधुनिक शस्त्रे आणि वेगवान वाहनांचे ताफे आहेत. गुंडांच्या टोळ्यांशी मुकाबला करताना, पोलिसांना आपले प्राण पणाला लावावे लागतात. 

आयपींच्या जीविताची काळजी घेणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारांनी सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेसाठीही गंभीरपणे विचार करायला हवा. सामान्यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या पोलिसांच्याही समस्यांची सोडवणूक करायला हवी. व्हीआयपींना कडक सुरक्षा आणि सामान्य जनता वाऱ्यावर, असा पायंडा पडणे योग्य नाही.

Monday, March 14, 2016

टाहाकारीच जगदंबा मंदिर

                                                     टाहाकारीच जगदंबा मंदिर    

 अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुक्यात अनेक प्राचीन व कलाकुसरीने युक्त मंदिरे आहेत.त्यातील एक टाहाकारी गावात "जगदंबेचे " प्राचिन मंदिर आहे.आढळा नदीकाठच्या त्या भव्य, कोरीव मंदिरावरील शिल्पकलेचे गारुडच मनावर आरूढ होते.


मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्‍याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेदहुन टाहाकारीला जाणारा रस्ता आहे. इगतपुरी ते टाहाकारी अंतर ५८ किमी आहे.
टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे सिमेंटचे तीन पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिरा जवळ पोहोचल्यावर मंदिरा भोवती असलेली सात फ़ूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर उत्तराभिमुख आहे. त्याचे तोंड उत्तरेला म्हणजेच आढळा नदीकडे आहे. टाहाकारी मंदिराची बांधणी हेमाडपंथी पध्दतीची आहे.त्रिदल पद्धतीचा गाभारा, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप अशी मंदिराची रचना. यातील मुखमंडपच दहा खांबांवर आधारित. यावरूनच मंदिराची भव्यता ध्यानी येते. टाहाकारीच हेमाडपंथी मंदिर भूमीज पध्दतीचे आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चारफ़ूट उंच दगडी जोत्यावर (ज्याला "अधिष्ठान" म्हणतात) उभ आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्प कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पही आहेत. मुख मंडपातून सभामंडपात शिरल्यावर समोरच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मुर्ती दिसतात. त्यातील एक शंकर पार्वतीची आहे, तर दुसरी गणपतीची आहे. मंदिराच छत ७२ खांबांवर तोललेल आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्प, किर्तीमुख, भौमित्तीक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत.देवालयात शृंगारिक शिल्पे आढळतात.

 मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशव्दारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भूजा असलेली काष्ठमुर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुर मर्दीनीच्या’ अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजुस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मुर्तीं आहेत.

 मंदिराचा अंतर्भाग पाहुन मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनात दुमडलेला बाह्यभाग समोर येतो. यामुळे निर्माण झालेल्या कोनाड्यांमधे सुरसुंदरींच्या मुर्ती बसवलेल्या आहेत. यात शुकसारीका, नृत्य करणारी, वादन करणारी,शस्त्र धारण केलेली इत्यादी अनेक प्रकारच्या सुरसुंदरींच्या मुर्ती आहेत.

गणेश, शिव-पार्वती, चामुंडा आदी देवतांबरोबरच सूरसुंदरींचे तब्बल बावीस प्रकारचे आविष्कार येथे प्रकटले आहेत! सूर सुंदरी म्हणजे देवांगना. देवांच्या खालोखाल यांचा मान. कोण आरशात स्वतःची सुंदरता न्याहाळतेय.कोण केशरचना करण्यात गुंग आहे.कुठे नृत्य अवस्थेतील सुंदरी तर कोणी बासुरी-मृदुंग वाजविणाऱ्या.हाती पक्षी घेतलेल्या शुक सारिका, मुलाला घेतलेल्या वात्सल्य मूर्ती असे त्रिभंग अवस्थेतील नाना शिल्पाविष्कार आचंबित करतात.

टाहाकारीसारखी अनेक कोरीव शिल्पमंदिरे आज आपल्याकडे खेडोपाडी उपेक्षेचे जीवन जगत आहेत. अशा प्राचीन वास्तूंच्या देखभालीचे काम पाहणाऱ्या पुरातत्त्व विभागाचे त्यांच्याकडे लक्ष नाही तर दरदिवशी ढासळत्याबांधकामाने स्थानिक गावकऱ्यांचे मात्र चित्त लागत नाही. 


आमच्या गौरवशाली इतिहासाचाच हा भयाण वर्तमान म्हणावाकी काय! असे असले तरी टाहाकारी मंदिर आवर्जून पाहण्यासारखेच आहे. महाराष्ट्रातील प्राचीन ठेवा जपून कसा ठेवता येईल याकडे सगळ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

Wednesday, February 3, 2016

तरुणाई व्यसानांच्या विळख्यात.   भारताला लाभलेली सत्वात मौलवान संपत्ती म्हणजे, देशातील तरुणाई.सध्या फक्त झोपडपट्टी किंवा मध्यमवर्गातून आलेली तरूण मंडळीच नव्हे तर, अगदी विदेशी गाड्यांमधून फिरणारे,पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणारा वर्गदेखील व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेला दिसतो.  व्यसन हे तरूणाईचे स्टाईल स्टेटमेट बनलंय हेच खरे आहे. 

कॉलेज कट्टा असो किंवा सोसायटीचा बाक,नवीन वर्षाची पार्टी असो, पहिले प्रश्न असतात..तू कोणती दारु पिणार?तू कोणती सिगारेट ओढतोस?तू दारु  नाही पित? कोणता  मुलगा जर मद्द्पान नाही करत तर त्याला हिन प्रवृतीचे समजले जाते.धुम्रपान आणि मद्द्पान एक ट्रेंड झाले आहे.   

    थर्टी फर्स्टमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालत नव वर्षाचे स्वागत करण्याची प्रथा पडली आहे.थर्टी फस्ट म्हटले की दारु पिऊन  दंगा, हुल्लडबाजी असेच काहीसे समीकरण होवून बसले आहे.सरकारी आकडे सांगतात ३ महिन्यात जेव्हढी दारू विकली जात नाही त्याहून ही अधिक दारू एकटा ३१ डिसेंबर पिऊन जातो   


     आनंद साजरा करण्याची पध्दत बदलत चालली आहे.शाँपेन फोडुन ती मित्रमडंळीसह रीचवून आनंद साजरा करण्याच्या पाश्चात संस्कृतीचे अनुकरण करु लागलो आहोत.आनंद किंवा सेलिब्रेशनचा दारूशी अन्योन्य संबंध जोडला आहे. दारुशिवाय आनंद साजरा केला जात नाही आणि जी मडंळी दारुकामात भाग घेत नाहीत त्यानी आनंदोत्सव साजरा केलाच नाही असे समजले जाते.आजकालच्या तरुण पिढीला व्यसन करणे ही खूप नॉर्मल गोष्ट वाटते.

आपल्या आजूबाजूच्या हाय ल्कास लोकांमध्ये राहायचे असेल तर त्यांच्या स्टेटसप्रमाणे  वागायला पाहिजे असे त्याना वाटते.ताण पडला सिगारेट तर दु:ख झाले की दारुच्या स्वाधीन व्हायचे ही एक स्टाईल बनली आहे. 

     मुंबईत कोणत्याही आनंदत्सवात मद्यसंस्कृतीचा अंमल वाढला होता. विक्रमी  दारूविक्रीचे जे तडाखेबंद आकडे प्रकाशित झाले आहेत.होळीच्या दोन दिवसांत मुंबईकरांनी साडेतीन लाख लिटर दारू रिचवली. नववर्षाचे स्वागत करताना संपते. हीच स्थिती राज्यातल्या बहुतेक शहरांत आणि देशातल्या बहुतेक राज्यांमध्ये होती. कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश इथून येणा-या बातम्या हेच सांगत आहेत. 

    तरुणपिढी आणि नशा हे समीकरण झाले आहे.सुखाच्या व दु:खाच्या प्रसंगाला नशा करुन साजरा केला जातो.नवे जन्म किंवा अकस्मात मरण,वाढदिवस किंवा लग्न,मिरवणुक किंवा निवडणुक,पास किंवा नापास,पिकनिक किंवा संमेलन,वर्षाचा पहिला दिवस किंवा शेवटचा दिवस असो नशा केलीच पाहिजे.दारु पिणे ही एक फँशन झाली आहे.आपली संस्कृती सोडुन पाश्चात संस्कृती स्विकारलीच पाहिजे का? आपल्या सार्‍याच परंपरा कशा अमृतामय आहेत. त्या सोडून हे पाश्‍चात्त्य विष का बरं प्यायचे?

   अनंत व्यसनात बुडालेली आजची तरुणपिढी म्हणजे एक गंभीर समस्याच होऊन बसली आहे. माणसाला विकृतीकडे ढकलणारी पाश्‍चात्त्य संस्कृती आपण सर्वांनी अंगीकारली, त्याचेच भीषण परिणाम आज आपल्याला पदोपदी दिसतात.पाश्‍चात्त्य संगीत, पाश्‍चात्त्य नृत्ये आणि दारूचा महापूर आलेला दिसतो. काही ठिकाणी अमली पदार्थांचेही सेवन हमखास होते. आजच्या तरुणपिढीला अशा नृत्यरजनींचे खूपच ‘फॅड’ लागले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रात्रभर दारू पिऊन तर्र झालेले हे युवक कित्येक अपघातांना बळी पडतात.तरुणपिढी राजरोसपणे अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून येते.नैराश्य, मनावरील दडपण, अतिताण, दु:ख यामुळे ते व्यसनांना बळी पडत आहेत. 

    तरुणांमध्ये ड्रग्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. चांगल्या घरातील, सुशिक्षित आणि समंजस मुलेही ड्रग्जच्या विळख्यात  अडकलेली दिसत आहेत. यामागे एकच कारण आहे. काळ्या पैशाची किक्. काळा पैसा घरात आला की, पैसेवाल्या बडे बाप के बेट्यांना या व्यसनाच्या सवयी लागतात. खरा ड्रग्जचा विळखा हा पब, डिस्कोथेक येथेच पाहावयास मिळतो. सर्वच वर्गात ही समस्या वाढत आहे. कुणी टेंशनच्या नावाखाली, कुणी पैशाच्या मस्तीच्या जोरावर या विळख्यात सापडत आहे. पण या नशेला खरी किक् काळ्या पैशाचीच आहे. व्यसनांच्या कारणांची भली मोठी लिस्ट असली तरी कौटुंबिक संस्काराच्या अपूर्ततेमुळे अशा घडामोडी होत आहेत.

व्यसन आरोग्याला व जीवनाला हानिकारक आहे हे तरुणाईने जाणून घेतले पाहिजे व व्यसनापासून दूर राहीले पाहिजे.

     भारताला महासत्ता व्हायचे असेल तर तरुणपिढीला व्यसनमुक्त करणे आवश्यक आहे.आपल्या देशाचे भवितव्य तरूणांच्या हाती आहे.तसेच तरुण पिढीने सामाजिक भान ठेवून  आपली संस्कृतीही जपली पाहिजे. 

Friday, January 22, 2016

सुरक्षा यंत्रणांना कायम सतर्क राहणे गरजेचे आहे.

   

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशाची सुरक्षा देखील मजबूत असायला पाहिजे.दहशतवाद भारताचा पिच्छा सोडायला तयार नाही. तसा तो सोडणारही नाही. दहशतवाद्यांच्या रडारवर भारत यापुढील काळातही राहणार असल्याने चोख सुरक्षाव्यवस्था असायलाच हवी.आतंकवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर सीमेवरील रहिवाशांना सतर्क रहाण्याची चेतावणी वारंवार दिली पाहिजे.सुरक्षिततेचा विषय आम्ही गंभीरतेने जेव्हा घेतो ज्यावेळी एखादी दहशतवादी घटना घडते तेव्हाच. इतर वेळी मात्र आपण बेफिकीरीत राहतो आणि याच गोष्टीचा फायदा दहशतवादी घेतात.मात्र एखादा हल्ला अथवा एखादी दुर्घटना घडल्यावरच संबंधित यंत्रणांना जाग येते, याला सरकार व पोलीस जबाबदार आहेत. थोडक्यात काय, सुरक्षिततेचा विषय ज्या पद्धतीने गांभीर्याने आणि सातत्यपूर्ण दक्षता ठेवून हाताळायला पाहिजे, तसा तो हाताळला जात नाही. 

  पठाणकोटवर झालेल्या हल्ल्यानंतर संरक्षण मंत्र्यानी सुरक्षेसंदर्भात काही त्रुटी राहून    गेल्या याची   कबुली दिली. सुरक्षाव्यवस्थेतेतील  ढिलाईमुळे पठाणकोट हवाई तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी   केलेल्या हल्ल्यात प्रतिकार करताना अधिकारी व    जवान शहीद झाले. गाफीलपणामुळे पठाणकोट हवाई तळावरील हा हल्ला झालेला आहे.तो पूर्वनियोजित होता आणि अजूनही  हल्ल्याची शक्यता आहे.कोणत्याही प्रकारची हलगर्जी फार मोठी किंमत मोजायला लावू शकेल.

       पठाणकोटचा हल्ला हा  देशाच्या सीमा सुरक्षित नसल्याचा व देशाची अंतर्गत सुरक्षाही साफ कोसळल्याचा पुरावा आहे. तसेच सीमावर्ती भागातून होणारी घुसखोरी रोखण्याकरिता भारतातील सुरक्षायंत्रणांनी वारंवार प्रयत्‍न केले जाते. 

आणखी एक बाब म्हणजे अशा हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी स्थानिक पोलिसांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे असणे गरजेचे ठरते. दहशतवाद्यांकडे  रायफल्स असतात आणि त्यांचा मुकाबला आपले पोलिस साध्या बंदुकीच्या सहाय्याने करतात. उलट दहशतवादी वरचेवर आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करत आहेत. त्या तोडीचे शस्त्रास्त्रे आपल्या पोलिसांकडे असण्याची आवश्यकता आहे. आधुनिक शस्त्रास्त्राशिवाय पोलिसांना दहशतवाद्यांशी लढण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याचीही आवश्यकता आहे. किंबहुना ती काळाची गरज आहे. 

दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी दहशतवाद्यांना आपल्या देशातील कोण, कोणत्या स्वरूपाची, कशी मदत करतात हे शोधून काढणे आणि तसे करणार्यांवर कठोर कारवाई करणे हा मार्ग अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. कारण दहशतवादी एकदम येऊन एखाद्या ठिकाणी हल्ला करू शकत नाहीत. त्यांना कोणी ना कोणी स्थानिक मदत करत असणार आहेत. ही मदत बंद झाली तर दहशतवाद्यांना कारवाया करणे कठीण जाईल हे नक्की. या सार्या बाबींचा आता तरी गांभीर्याने विचार केला जायला हवा.सुरक्षेसाठी पोलीस दलाचे संख्याबळ वाढविणे ही काळाची गरज आहे.देशविरोधी घटना घडत असतानाही शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत किती गंभीर आहे?

दहशतवादी  संघटनांच्या वाढत्या कारवायांमुळे पुढील काळ भारतीय  सुरक्षायंत्रणांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.त्यांनी सदैव सावधगिरी बाळगायला हवी.  

    पाकिस्तानच्या छुप्या युद्धाचा अंत होत नाही तोवर सुरक्षायंत्रणांनी कायम सतर्क राहावे लागणार आहे.सीमावर्ती भागातून होणारी घुसखोरी रोखण्याकरिता भारतातील सुरक्षायंत्रणांनी वारंवार प्रयत्‍न केले जाते.

       सुरक्षा यंत्रणा कायम सर्तक राहिल्यास दहशतवादी कधीच हल्ले करु शकणार  नाहीत.

Tuesday, January 12, 2016

समाजाने बदलणे गरजेचे आहे.

      
सध्या अल्पवयीन मुली आणि स्त्रियांवर अनेकवेळा विविध प्रकारचे लैंगिक अत्याचार आणि बलात्कार घडण्याच्या घटना घडताना आपणा ऐकतो. त्यात सामूहिक बलात्कार हा एक हिंसक लैंगिकतेचा प्रकार आहे.लैगिक अत्याचारात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे.अमानुष्य गुन्हे करणारे कायद्यातील त्रुटीमुळे सहीसलामत सुटतात.पण यात पिडीत व्यक्तीला आयुष्यषभर यातना भोगाव्या लागतात.मुळात स्त्रीवरील अत्याचाराचा दोष स्त्रीलाचा देणे हेच सामाजिक विकृतीचे लक्षण आहे. 


स्त्रियांचे पावित्र्य,शिल,चारित्र्य,स्त्रिधर्म याबाबत हा अलिखित कायदा थोडा जास्तच आग्रही आहे.स्त्रिचा सारा सन्मान तिच्य योनीशुचितेमध्ये गुंतला आहे.असे वेगवेगळ्या अंगाने बजावणा-या समजुती आणि प्रथांमुळे तिच्यावर तिच्या मनाविरुध्द झालेला लैगिक हल्ला सुध्दा  तिलाच गुन्हेगाराच्या भूमिकेत नेऊन उभा करतो.अचेतन संपत्ती,मालमत्ता,जायदाद यांची लुट करणा-याला व घाला घालणा-याला समाज गुन्हेगार ठरवतो.पण शरीरावर घाला पडलेली आणि इज्जत लूटली गेलेली स्त्रिच कंलकिनी म्हणून मान खाली घालून जणू तिनेच अपराध केला आहे अशा पध्दतीने तोंड लपवत जगावे लागते किंवा आयुष्यच संपवावे लागते असा दुटप्पी समाजव्यवहार रुढ झाला आहे.लिखित कायदा  लुटारुला शिक्षा देतो,अलिखित कायदा ज्याचे लुटले गेले आहे त्या व्यक्तीलाच बदनामी, अवहेलना,प्रसंगी सामाजिक बहिष्कारसारखी जीवघेणी शिक्षा देत आहे.बलात्कार करणारा नव्हे,तर जिच्यावर बलात्कार झालेला आहे ती व्यक्ती केवळ मनानेच नव्हे,तर सर्वार्थाने उदध्वस्त होईल इतकी या अलिखित कातद्याची जरब असते.हि जरब इतकी तीव्र आहे,
की खुद्द बलात्कारीत व्यक्तीलाही आपणच गुन्हेगार असल्याचे वाटत राहते.अलिखित कायदा
समाजाने मोडीत काढला पाहिजे. 

बलत्कारीत स्त्रीला आणि तिच्या कुंटुबाला समाजाच्या त्या निदेंला व नजरांना सतत तोंड द्द्यावे लागते.पिडित व्यक्तीचे नाव लपवून ठेवावे लागते.संबंधित व्यक्तींना उपहासात्मक टिकेला सामोरे जावे लागते.पांरपारिक समजुती ,प्रथा आणि दृष्टीकोन समाजाने काळाबरोबर मागे सारल्या पाहिजेत. वर्षा नु वर्षाचा पगडा असलेला दृष्टीकोन बदललाच पाहिजे.पिडितांना कडे बधण्याचा दृष्टीकोन समाजाला बदलावाच लागेल.           

   हा दृष्टीकोन बदलण्याची सुरुवात निर्भयाच्या आईने निर्भयाचे खरे नाव जाहीर करुन केली आहे.माझ्या मुलीने कोणताही गुन्हा केलेला नाही मग तिची ओळख समाजापासून का लपवावी असे आशादेवी (निर्भयाची आई) यांचे विचार आहेत.लेकीबाळींना दूषणे न देता,आपल्या इभ्रतीला धक्का लागला असे न समजता तिच्यावर हात टकणारा गुन्हेगार आहे आणी बोटे दाखवायचीच, तर त्याच्याकडे दाखवा असे स्पष्टपणे नवे विचार मांडले आहेत.याचे स्वागत व्हायला पाहिजे. 

  अल्पवयीन मुली कि त्यांना याबद्द्ल काहीच माहीती नसते त्यांचे पुढे काय होत असेल. बलात्कारामुळे अल्पवयीन मुली आणि स्त्रियांवर शारिरिक आणि मानसिक आघात होतात आणि त्या त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतात.या पीडित मुलींचे मनोधैर्य वाढवण्यासाठी समाज काय करतो? केवळ कायदा करून स्त्रीला तिचा आत्मसन्मान परत मिळेल? दूरगामी दृष्टीकोनातून सामाजिक प्रबोधन आणि समुपदेशनावर भर द्यावाच लागेल.समाजातील रूढी-परंपरा, चाली-रिती ज्यांचा म्हणून स्त्रीच्या प्रतिष्ठेला धोका आहे, त्या सर्व गोष्टी या समाजाच्या सकारात्मक प्रभावातून मोडून काढल्या पाहिजेत. 


पोटातला गर्भापासून ते मृत्युच्या शय्येवरील स्त्रीत्वाची चाललेली अखंड अवहेलना थांबणार आहे का? 

Wednesday, December 23, 2015

धार्मिक वेडाचारापासून तरुणांनी दूर राहावे.


धार्मिक  वेडाचारापासून  तरुणांनी  दूर राहावे.


इराक, सीरियासह जगभरात रक्तरंजित हिंसाचार करणारी इस्लामी दहशतवादी संघटना  ’इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने पुणे शहरातील एका सोळा वर्षांच्या युवतीला आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. इसिसचा प्रभाव या मुलीवर येवढा वाढला होता की, त्यांच्यासाठी ती काहीही करायला तयार होती. तीने इसिसचा सांगण्यावरून तीचा पेहराव देखील बदलला होता. तसेच त्यांनी परदेशात बोलवले होते त्यासाठीही ही मुलगी तयार होती.धक्कादायक म्हणजे ही तरुणी ‘इसिस’ची ‘सुसाइड बॉम्बर’ होण्यासाठी तयार झाली होती.सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसच्या संपर्कात आलेल्या या युवतीचे मतपरिवर्तन करण्याचे काम आता दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) सुरू आहे. 

इस्लामिक दहशतवादी संघटना म्हणजेच आयसिस आता भारतातही पाय पसरु पाहत असल्याची भीती गेल्या महिनाभरातल्या काही घटनांमधून व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील काही तरुण आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची भीती गुप्तचर यंत्रणांना आहे.


दहशतवादी कारवायांनी जगाची डोकेदुखी बनत असलेल्या ’इसिस’  या संघटनेच्या जाळ्यात भारतातील तरुण ओढले जात आहेत.कर्नाटक, जम्मू-कश्मीर, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांमधील काही तरुण-तरुणींचा या ग्रुपमध्ये सहभाग आहे.तरुणांनी ‘इसिस’च्या भूलथापांना बळी पडू नये. तरुणांनी इंटरनेट, व्हॉट्स अ‍ॅप किंवा इतर कोणत्याही मार्गाने येणारी प्रलोभने, भूलथापांपासून जागरूक राहून कोणत्याही प्रकारे समाजातील शांतता भंग होईल असे कृत्य करू नये, इसिसकडून तरुणांना भडकावण्याचे प्रकार होत असल्यामुळे आपली मुले कोणाच्या संपर्कात आहेत,यावर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.

वेडी आहे का हि मुलगी?आपली संस्कृती किती सुंदर आहे.आपले शिक्षण काय कमी पडले काय म्हणून हि दुर्बुद्धी झाली तिला. वेगळे काय करायचे असेल तर कमांडो मध्ये जा. पायलट बन पण दहशतवादी बनू नकोस. आईवडिलांचे असे पांग फेडू नकोस त्यांच्या जीवाला किती यातना झाल्या असतील.

युवकांनी आपण भारतीय आहोत हे जर लक्षात ठेवले आणि आपल्या धर्माचा खरा अर्थ जर समजून घेतला तर हे धर्मवेड्या संघटना कधीच टिकू शकणार नाहीत.

आपण देशप्रेमाचे धडे देण्यात कुठेतरी कमी पडतोय. ह्या वयात चुकीच्या मार्गाकडे वळणे अगदी साहजिक आहे जर आपले संस्कार आणि शिकवण पक्के नसतील. शालेय शिक्षणात या सर्व बाबींचा विचार करून योग्य ते बदल करण्यात यावे. एकदा का आपल्या देशाविषयी नितांत प्रेम आणि श्रद्धा निर्माण झाली तर मग जगात कुणीही आपले मत परिवर्तन करू शकणार नाही. याव्यतिरिक्त व्यक्तिगत पातळी वर आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊन कटाक्षाने योग्य ते संस्कार होतील याची खबरदारी घ्यायला हवी.

’इसिस’ ही दहशतवादी संघटना भारतातील युवकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यामार्फत भारतामध्ये हल्ले घडवून आणले जाण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याचे म्हणत देशातील सर्व राज्यांना सुरक्षा व्यवस्थेचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाने दिल्याची माहिती आहे.

 ‘इसिस’च्या जाळय़ातही आता भारतीय तरुण सापडू लागले आहेत, ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.कोणताही सारासार विचार करू न शकणारी तरुणाई अशा आत्मघातकी, देशविघातक आणि धार्मिक वेड्यांच्या जाळय़ात सापडते. धार्मिक वेडाचार मग तो कोणत्याही धर्माचा असो त्याला बळी न पडण्याचे शिक्षण आता घरातूनही द्यायला हवे. 

Monday, December 7, 2015

महिलांना मंदिरात प्रवेशबंदी नसावी.


                  
गेल्या आठवड्यात शनिशिंगणापूर येथील शनी मंदिरातील चौथऱ्यावर प्रवेश करून एका तरुणीने शनी महाराजांना तेल वाहिले होते. या     चौथऱ्यावर महिलांना  प्रवेश करण्यास बंदी  असतानाही तरुणीने हे पाऊल उचलल्यामुळे गावात एक दिवस बंद पुकारण्यात आला होता.पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनी त्या     तरुणीने दाखवलेल्या धाडसाचे    कौतुक   केले  होते. त्याचवेळी ग्रामस्थांनी या घटनेनंतर मंदिर समितीवर टीकेची झोड उठविली होती.दुसऱ्या दिवशी दुग्धाभिषेक घालून शनी महाराजांच्या चौथऱ्याचे शुद्धिकरण करण्यात आले होते. 

स्त्रियांना मासिक पाळी येते आणि त्यामुळे त्या अपवित्र असतात. अनेक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारला    जातो त्याचे हे एक कारण. त्या केवळ  मासिक पाळीच्या काळातच अपवित्र नसतात. तर त्यामुळे एरवीही अपवित्रच असतात. म्हणून त्यांना अनेक ठिकाणी सरसकट प्रवेशबंदी असते.शेकडो  वर्षांची  ही परंपरा आहे. ती मोडता येत  नसल्याने देशातील तसेच    राज्यातील  कित्येक देवस्थानात महिलांना प्रवेशबंदी आहे. 

आज महिलांना समान हक्क आणि आरक्षण असूनही त्यांना समान अधिकार मिळत नाहीत.ज्या महिला याबाबत क्रांती करण्याचा विचार करतात त्यांना काही रूढी जपणाऱ्या महिला वर्गाकडून तसेच देवभोळ्या समाजाकडून डावलण्यात येते,आणि निषेधाचा सूर उमटतो.स्त्रीला मंदीरप्रवेश नाकारायचा यात कोणतं शहाणपण सिध्द करू  इच्छितात ही बुरसटलेली विचारसरणीची माणसं. या गोष्टीतून खरंतर स्त्रीयांनीच काहीतरी शिकायला हवं. अशा देवाधर्माच्या नावावर बळावलेल्या हीन प्रवृत्ती व देवधर्म, मंदीरं यांना झिडकारून अशा प्रथा मोडीत काढल्या पाहीजेत. तरच या  गोष्टींना आळा बसेल.

आजच्या युगात स्त्रिया आकाशाला गवसणी घालताहेत, नवनवीन  संशोधन   करतातहेत, घरच्या जबाबदा-या सांभाळुन सुध्दा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या क्षेत्रात अग्रेसर ठरताहेत. एवढं सारं असतांना विज्ञानयुगात त्याच स्त्रीला मासिक पाळीवरून मंदीरप्रवेश नाकारणं हे दुर्दैवी आहे.

आज उच्च शिक्षित  महिला पोथ्या,पुराणे, पारायणे, व्रत-वैकल्ये यात इतक्या गुरफटलेल्या गेल्या आहेत. शिक्षणाने त्या   साक्षर जरूर  झाल्या, पण सुशिक्षित   झाल्याच असे म्हणता येणार नाही. आधुनिकतेशी नातं सांगणाऱ्या समस्त महिलांनी या घटनेचा निषेध करावा. सगळ्या प्रार्थनास्थळांवर बहिष्कार कायला हवा.मंदिर,मशिदी,दर्गे जिथे जिथे स्त्रियांना प्रवेशबंदी,दर्शनबंदी आहे, तिथला प्रवेश स्त्रीयांनीच झिडकारायला हवा ! स्त्रियांच्या शोषणाची मूळं अशा धर्मस्थळातच लपलेली आहेत. ती तिथून आता उखडायला हवीत.

 पौरोहित्य करण्यासाठी महिला चालते, तर    ती देवीच्या  गाभाऱ्यात का जाऊ शकत नाही? स्त्रीच्या मासिक पाळीचे कारण देत सात्विकतेचा मुद्दा उगाळणाऱ्या पुरुषी डोळ्यांना श्रीपूजकांच्या तथाकथित   सात्विकतेचा मुखवटा का  सत नाही? दुसऱ्यावर श्रेष्ठत्वाचा अधिकार गाजवण्याची जी प्रवृत्ती माणसात असते त्याचाच आविष्कार अशा तऱ्हेच्या बंदीत स्पष्टपणे दिसतो.स्त्री व पुरुष असा  भेदभाव करणं घटनेतील समानतेच्या  तत्त्वाविरुद्ध आहे. नव्या आणि बदलत्या  वातावरणात तसंच भारतीय घटनेनेही समानतेचे तत्त्व    मान्य केले असल्याने स्त्रिया आणि पुरुष यांच्यात असा भेदभाव करणे योग्य नाही. स्त्रियांना दूर ठेवण्याची मानसिकता आहे ती पुरुष हा अधिक पवित्र आहे या समजुतीतून आली आहे.  अशा समाजाच्या मानसिकतेचीच मशागत गरजेची आहे. 

 

‘जिथे जिथे पुरुष प्रवेश  करू शकतो, तिथे तिथे   कायद्याने आणि नैतिकदृष्ट्या स्त्रीही प्रवेश करू शकलीच पाहिजे’.

Thursday, November 26, 2015

धर्माचा दहशतवादाशी संबंध जोडू नये.
      दहशतवाद्यांचा धोका एखाद्या देशापुरता, प्रांतापुरता मर्यादित राहिलेला नाही. संपूर्ण जगासमोरच दहशतवाद्यांचे आव्हान उभे ठाकले आहे.विविध देशांमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांविषयी चिंता व्यक्त करतानाच दहशतवादाचा भस्मासूर आता एका देशापुरता मर्यादित नसून त्याचे सावट संपूर्ण जगावर आहे. धर्माशी संबंध जोडून दहशतवाद्यांना आश्रयस्थान देऊ नये.दहशतवादाला आज सीमा राहिलेली नाही. धर्माचा दहशतवादाशी संबंध जोडून तरुणांना या दहशतवादी संघटनांनी आपल्या जाळ्यात ओढून शेकडो निरापराध लोकांचा प्राण घेत आहेत. धर्माचा आणि दहशतवादाचा संबंध न जोडता दहशतवादी संघटनांच्या उच्चाटनासाठी संघटित प्रयत्न करण्याची गरज आहे.‘आसियान’ संघटनेतील देशांनी आणि संपूर्ण जगाने दहशतवादाच्या आव्हानाचा संघटितपणे मुकाबला करायला हवा.

कालानुरूप सर्वच क्षेत्रांत मानवी जीवनात बदल होत असताना दहशतवादात आणि क्रौर्य या क्षेत्रांत ते होऊ नयेत अशी अपेक्षा धरता येणार नाही. तेव्हा काळाप्रमाणे दहशतवादाचे रूपही बदलले आणि तो अधिकाधिक तीक्ष्ण, तीव्र होत गेला. सांप्रत काळात या दहशतवादामागील धर्म म्हणून इस्लामच समोर येत असल्याने इस्लाम म्हणजे दहशतवाद असे मानले जाऊ लागले. दहशतवादामुळे मुस्लिम समाजसुद्धा प्रचंड त्रस्त असून दहशतवादाचा इस्लाम धर्माशी काहीही संबंध नाही. काही लोकांनी राजकीय फायद्यासाठी दहशतवादाशी इस्लामचा संबंध जोडला आहे.


सध्याच्या दहशतवादामागे आर्थिक कारणेही तितकीच प्रबळ आहेत.सध्या इस्लामी दहशतवाद नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रौर्याच्या मुळाशी प्रगत पाश्चात्त्य जगाने पश्चिम आशिया आणि अन्य प्रदेशांतील तिसऱ्या जगाचे केलेले आर्थिक शोषण आहे.इस्लामी दहशतवाद. आज दहशतवाद म्हटले की याच धर्माचे नाव जोडले जाते. त्यास त्या धर्मातील अतिरेकी, मूलतत्त्ववादी घटक जितके कारणीभूत आहेत तितकेच अन्य धर्मातील सोईस्कर भाष्यकार देखील कारणीभूत आहे.


इस्लाम, जुडाइझम, बौद्ध आणि ख्रिस्ती या सर्व धर्माचा इतिहास हा रक्तलांच्छितच आहे. हिंदू धर्माचा समावेश नाही याचे कारण अन्य धर्मीयांप्रमाणे हिंदू धर्मीयांत आपल्या धर्माचा प्रसार करणे हे जीवितकर्तव्य नाही. सारे जग इस्लामी व्हावे वा ख्रिस्ती व्हावे ही जशी त्या त्या धर्मातील ढुढ्ढाचार्याची मनीषा असते तसे हिंदू धर्मगुरूंचे नाही.कोणता एक धर्म हिंसक नाही ,वा शांतता आणि सलोख्याची मक्तेदारी ही कोणा एका धर्माकडे नाही. धर्म, त्यानिमित्ताने तयार होणारे त्या धर्मीयांचे आर्थिक हितसंबंध, त्यास प्रस्थापित राजकारणाचा आधार आणि त्या राजकारणाने सोयीसाठी केलेला या हितसंबंधांचा वापर ही धर्माधिष्ठित दहशतवादाची कारणे आहेत.ज्या राजकारणाने, इस्लामच्या नावावर या प्रकारच्या हिंसक प्रवृत्तींना जन्म दिलाय, ते राजकारण आपण ओळखायला हवे आणि त्याला उघडे पाडायला हवे.दहशतवादाची पाळेमुळे पश्चिम आशियातील तेल भांडारांवर कब्जा करण्याच्या राजकारणात आहेत.विनाकारण हिंसा आणि लोकांचे जीव घेण्यात लिप्त असलेल्या तत्त्वांचा जाणूनबुजून इस्लामच्या या संस्करणात उपयोग केला गेला, कारण त्याने त्यांचे राजकीय उद्देश साध्य करीत आहेत.धर्माचा उपयोग नेहमीच सत्ता मिळविण्यासाठी केला जातो, याला इतिहास साक्ष आहे.  


कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कृत्याच्या विरोधात लढा देताना आंतरराष्ट्रीय भागीदारीची समीकरणे जुळवत असताना जागतिक समुदायाकडून धर्म आणि दहशतवादाचा परस्पर संबंध नाकारला जावा.

Thursday, November 19, 2015

धान्याचा तुटवडा निर्माण होत आहे.    मानवजातीला पुरून उरेल एवढे धान्य पिकत होते.पावसाने यंदा दगा दिल्याने भातशेतीसोबत   अन्य कडधान्ये पिकवणा-या राज्यातून धान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.तसेच  अवाजवी पध्दतीत लोकसंख्या वाढल्याने धान्याचा तुटवडा भासू लागले आहे.देशातील धान्यांचा राखीव साठाही गेल्या काही वर्षापासून सातत्याने कमी होत आहे.याचा परिणाम बाजारेपेठेतील धान्य़ांचा उपलब्धतेवर होत असल्याने सहाजिकच धान्यांचे भाव वाढत आहेत.या परिस्थितीचा साठेबाज गैरफायदा उकळत आहेत.सध्या तूरडाळीवरुन सुरु असलेला सावळागोंधळ पाहता याबाबत वेळीच सावध झाले तरच हे संकट टळेल.

  स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या हरितक्रांतीनंतर भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. त्या वेळी शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि शेतकरी या तिन्ही घटकांनी जोरकस प्रयत्न केल्यामुळे खाद्यान्नाच्या बाबतीतली पराधीनता नष्ट करण्यात आपल्याला यश मिळाले.उत्पादकतावाढ आणि त्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टींमुळे तेव्हा आपण हे यश मिळवू शकलो.गेली तीन-चार वर्षे सलग सुरू असलेला दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीट या हवामान बदलाशी निगडित त्रयीने शेतकऱ्याचे आणि शेती उत्पादनाचे गणित विस्कटून टाकले आहे. कृषिक्षेत्र सध्या प्रचंड अडचणीतून जाते आहे.

अन्नसुरक्षा हा भारताच्या दृष्टीने कळीचा मुद्दा आहे. त्याबाबत या क्षेत्रातील धुरीण, धोरणकर्ते चिंता व्यक्त करतात. त्यासाठी काही योजनाही घोषित केल्या गेल्या आहेत. सारे काही कागदावर तयार आहे. प्रत्यक्षात मात्र वास्तव लक्षात घेऊन धोरणे बदलायला, त्यासाठी योग्य आर्थिक तरतूद करायला ना केंद्राला सवड आहे ना राज्य सरकारला.    

 वर्षी वरुणराजाची अवकृपा झाल्यामुळे पावसाच्या पाण्यावर पूर्णपणे विसंबून असणाऱ्या कडधान्यांच्या उत्पादनात थोडी घट झाली आहे.मुळात धान्यांची मागणी व पुरवठा यातील असमतोलाचा हा फार जुना आजार आहे.धान्याचा तुटवडा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.कडधान्यांच्या उत्पादनातील तूट ही ३३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे; परंतु गेल्या ५० वर्षांत कडधान्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी शासकीय पातळीवर कोणताही प्रयत्न झालेला नाही.तांदुळ, गहू,ज्वारी, बाजरी, कडधान्ये, तेलबिया इत्यादी पिकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास उत्पादकता दुप्पट होईल. 

अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत हक्कांपैकी अन्नाची गरज कशी भागवावी आणि पारदर्शी पद्धतीने, भ्रष्टाचार निर्मूलन करून वितरण व्यवस्था सामान्य जनांपर्यंत कशी पोहचवावी, हा कळीचा मुद्दा आजही आपल्यासमोर आहे. 

जगाचा पोशिंदा म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, त्या शेतकऱ्याच्या जीवनमरणाविषयी कोणाला काहीच वाटत नसेल, तर भविष्यात अन्नधान्य टंचाईचे संकट आणखी गंभीर होऊ शकेल.

Thursday, November 5, 2015

वाचन संस्कृतीची गरज

         आजच्या युगात वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल.वाचाल तर वाचाल' ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो. आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साह्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढले आहे.वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचारसंपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्यक आहे.वाचनाने माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन कराल तेवढेच ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरू आहेत. 

        अलीकडच्या काळात आपल्या मोबाईल फोनवरसुद्धा विशिष्ट नंबर फिरविल्याबरोबर आजच्या    घडीला जगातील कानाकोपर्‍यात घडणार्‍या घटकांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्या पिढीपाशी ही अद्ययावत 
साधने नसल्यामुळे जास्तीत जास्त   वाचनातून ते आपली ज्ञान-लालसा भागवीत असत. तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. ती मोबाईलच्या आहारी आणि इंटरनेटवर वेळ      घालवित असल्याचे आजचे चित्र आहे. त्यांना वाचनासाठी वेळ उपलब्ध नसतो. नव्या माध्यमांच्या आगमनानं वाचन संस्कृती लोपते आहे. तरूणांमध्ये  वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपRमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

लोकमान्यांनी ‘तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर वाचन करा’ असा संदेश दिला. धावत्या युगाच्या बरोबरीने धावायचे असेल तर वाचन करा, असा उपदेशही त्यांनी केला. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात इलेक्ट्रॉनिकच्या दुनियेत त्यांच्या उपदेशाकडे नव्या पिढीचे लक्ष विखुरले गेले आहे.सखोल विचारातूनच एकरूप समाज निर्मित होत असतो आणि सखोल विचार करण्याची सवय चांगल्या वाचनातूनच तयार होते.वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्वाचा वाटा असतो. यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करा. त्याचप्रमाणे जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. ज्ञानात वाढ करण्यासाठी वाचन हा 
एकमेव मार्ग आहे.

  वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची  मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्वाचा वाटा असतो. यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करा. त्याचप्रमाणे  जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. ज्ञानात वाढ करण्यासाठी  वाचन हा एकमेव मार्ग आहे. 
   

        लहानांपासून मोठय़ांपर्यंत ‘पुस्तके’ हा अनेकांच्या जिव्हाळय़ाचा विषय. पूर्वी पुस्तक मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे वाचनालय. आज त्या वाचनालयांची जागा इंटरनेट आणि ‘ई-बुक’ने घेतली आहे. ऑनलाईन साईट्समुळे विविध विषयांमधील पुस्तके मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु असे असले तरी वाचन संस्कृती हळू-हळू कमी होत आहे. तरूणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपRमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात. पुस्तकांमधील समम्ृद्ध विचारांचा आपल्या 
जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन कायमचा बदलून जातो.


पुस्तक हे केवळ शब्दसंपदा वाढवण्यास मदत करणारे साधन नसून पुस्तक हे अनुभवांसह कल्पनांचे, आशा-आकांक्षाचे क्षितीज निर्माण करणारे साधन आहे. पुस्तके आपल्याला सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करतात. त्यामुळे मानवाच्या कमकुवत मनाला धीर येतो. वाचनाची सवय एकदा लागली की माणूस मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात गुंगून जातो. त्यामुळे निराशेच्या गर्तेत अडकलेला माणूस आत्महत्या, हत्या असे प्रकार करण्यापासून परावृत्त होतो.वाचन संस्कृती जपण्याशिवाय पर्याय नाही. वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो. नियमित वाचन केले तरच भावी पिढी सक्षम व सुजाण होतो.तरुण पिढीने पुस्तकवाचन हा छंद जोपासला पाहिजे. 

साक्षर तरुणांपैकी  ६१ टक्के जण, त्यांनी साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत समाधानी आहेत. मात्र, वाचनाचा छंद असलेल्या तरुणांमध्ये समाधानाचे प्रमाण ७० टक्के, तर कमी वाचन करणाऱ्यांमध्ये हेच प्रमाण ५८  टक्के आहे. 

वाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती प्रबल होते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते सृजनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुसर्‍याच्या दु:खाची जाणीव, त्यांस आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते. इतरांबाबत, समाजाबाबत, आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान प्राप्त होते. मन संकुचित, क्षुद्र गोष्टीत अडकत नाही.  वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचे मोल किती अनमोल आहे याचे भान प्राप्त झाल्याशिवाय रहात नाही.

     माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन साजरा करीत वाचन संस्कृतीची जनजागृती केली पाहिजे.