Thursday, October 16, 2008

पूर्व तयारी

परदेशातून माझ्या भावानी ( विक्रम ) खुप वेळा आग्रह केला. 'एकदा तरी येउन फिरुन जा' असा त्याचा आग्रह होता. माझ्या कामातून मला वेळ मिळ्त नव्हता त्यामुळे मी त्याच्या आग्रहाच्या निमंत्रणाला मान देऊ शकलो नाही.आता दुबईत त्याच्याकडे जाण्याचे ठरविले आणि तयारीला लागलो. माझ्या व पत्नीच्या आँफिस मघुन परदेशात जाण्यासाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' घेण्याचे मुख्य काम होते. तसेच मुलाच्याही पासपोर्टमघ्ये 'ईसीएनआर'चा शेरा मारुन घेण्याचे काम होते. मुलाच्या परीक्षेचे वेळपत्रक पाहुन व आम्हा दोघांच्या सुट्ट्या पाहुन २५ आँक्टोंबर ला निघण्याचे व १५ नोव्हेंबर ला परतायचे ठरविले. माझ्या आँफिसमघले काम ओळखीने थोडया कालावधीत झाले. मुलाच्या पासपोर्ट चे काम पत्नी व मुलाने धावपळीत करुन घेतले.पण तिच्या आँफिसच्या 'एनओसी' साठी तिची खुप पळापळ सुरु होती. आँफिसमघल्यानी खुप उणिवा काढल्यामुळे तिला त्याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. विक्रम परदेशातून रोज आमच्या तयारीची विचारणा करुन करुन दमला. त्याच्यावर आम्ही आमच्या 'विसा' चे काम सोपविले होते. पत्नीने त्याच्या हेड आँफिसला तीन दिवस खेपा मारुन व खुप खटपट करुन सरते शेवटी ' एनओसी' मिळविली. लगेच विक्रमला कळविले.त्याने तिकिटे काढण्यास सगिंतले. भावोजीना घेऊन 'रीया टुर ऍड ट्रावेल' या बुकींग ऐजंट कडे जाऊन २४ आँक़्टोंबर व १५ नव्हेंबर ची तिक़िटे फोनाफोनी करुन बुक केली. बुकींग झाल्यावर विक्रमला कळविले. आणि सर्वजण तयारीला लागलो.

No comments: