Saturday, February 21, 2009

अतंर्मनातील सल

आम्ही ज्यांच्यासाठी लढलो त्यांना आमच्याबद्द्ल काहीच जिव्हाळा वा आपुलकी नाही. सारा समाज चेतनाहीन आणि संवेदाहीन झाल्यासारखा दिसतो आहे.आत्मनिष्ठ आणि आत्ममग्न स्वकेद्रित माणसांचा वावर संपूर्ण समाजात झपाटयाने वाढतो आहे. देशाच्या किंवा समाजाच्या रक्षणासाठी तैनात असणारे शूर जवान म्हणजे नरबळी देण्यासाठी ठेवलेली पगारी माणसे,ही भावना सामाजिक स्तरावर झपाटयाने दृढ होऊ लागली आहे. अशीच स्थितीत कशाला आम्ही या समाजासाठी आणि त्याच्या रक्षणासाठी लढायचे आणि आपल्या प्राणांचे मोल द्दायचे,की प्रत्येक जवानाच्या अतंर्मनातील सल आहे. आम्ही ज्यांच्या वतीने लढतो त्या सत्तेतील अधिकारपदांवर बनलेल्यांनसुध्दा आमच्या जीवचे मोल नाही. घातपाती हल्ला झाल्यानतंर केवळ घटनास्थळी भेटी द्दायच्या,हळहळ व्यक्त करायची,या वीरांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही म्हणून नक्राश्रु ढाळायचे,श्रुध्दांजली वाहून म्रुतदेहावर पुष्पचक्र अर्पण करायचे आणि नक्षलीचा वा अतिरेक्यांचा नि:पात केला जाईल असे ईशारे द्दायचे,या पलीकडे ही मडंळी काहीच करीत नाही.


या पाश्वभुमीवर, ज्याच्याविरुध्द आम्ही लढतो त्यांना तर आमच्याबद्द्ल काही कणव व करुणा अथवा आपुलकी वाटण्याचा प्रश्नच उदभवत नाही. खरे म्हणजे त्यांचा संघर्ष व्यक्तीगत आमच्याविरुध्द नाही.त्यांचा संघर्ष या सार्या सामाजिक व राजकीय व्यवस्थेविरुध्द् आहे. ती उलथवून टाकण्यासाठी जीवाची बाजी लावून ते सरसावले आहेत. त्यामुळेच या व्यवस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा आमच्यावर रोष आहे. विद्धीमान सामाजिक व राजकीय व्यवस्था कायम राहावी म्हणून आम्हीसुध्दा जीवाची बाजी लावून त्यांचा मुकाबला करीत असतो. मात्र,या व्यवस्थेविरुध्द त्यांना एवढी प्रचंड चीड, संताप आणि घ्रणा आहे की,त्यातुन ते आमच्यावर अनन्वित अत्याचार करुन हा सारा क्षोम व्यक्त करीत असतात.

दहशतवाद्दांनी किंवा नक्षलवाद्दांनी बेछुट गोळीबाराने ठार मारलेले जवान असॉत किंवा अनन्वित अत्याचार करुन,'हलाल' करुन यमसदनी धाडलेले शिपाई असोत,त्यापैकीं कुणाचीही अतिरेकी वा दहशतवाद्दांशी व्यक्तिगत दुश्मगी नसते.त्यामुळे त्यांच्यातील संघर्ष प्रयेक वेळी टिपेला पोहोचतो आणि प्रत्येकजण स्वत:चे उद्दीष्ट पुर्ण व्हावे म्हणून प्राणांची बाजी लावित असतो. सियाचेन सारख्या उणे ६० अंश हवामान असलेल्या प्रदेशात जीवाची बाजी लावून अनेक शूर जवान देशप्रेमापोटीच सीमेवर निगरानी ठेवीत असतात.पण,या सार्याच ज्ञान - अज्ञात शूर जवानांना आणि वीरमरण पत्करणार्या शहीदांना त्यांच्या अत्युच्च शौर्य व त्यागाबद्दल काय मिळ्ते?

आपल्या व्यवस्थेचे प्रतिनिधी म्हणविणारे सत्ताधीश राजा हरिचद्रांचा अवातर धारण करुन लक्षावधी रुपयांचे इनाम मग शहिदांच्या नावाने घोषित करतात.या शहिदांच्या बलिदानातूनही मग श्रेय लाटण्याचा कृतघ्न खेळ खेळला जातो.स्वार्थी राजकारणाची पुटे त्यांच्या बलिदानावर चढविली जातात. ताज-ओबेराँयसारख्या पंचतारांकीत हाँटेलांवर झालेल्या हल्ल्यांत शहीद होणार्याच्या नावाने मेणबत्त्या तरी लावल्या जातात. पण गडचिरोलीसारख्या दुर्गम जंगलात किंवा सियाचेनसारख्या अत्यंत प्रतिकुल सीमा प्रातांत अथवा जम्मू-काश्मीर वा आसामच्या दर्याखोर्यात ज्या शूरा६ना वीरगती प्राप्त होते त्यांच्या नावांने कुठेही ना चिरा,ना पणती अशीच अवस्था असते. कशासाठी आम्ही लढायचे आणी कोणासाठी आम्ही छातीचा कोट करुन ही व्यवस्था उलथवू इच्छिणार्याच्या गोळ्या झेलायचा,हा या शूर जवानांचा आणि त्यांच्या आप्तांचा सवाल खरोखरच रास्त आहे,हे मान्य करावेच लागेल.
विचार करावयास लावणारा लेख.

No comments: