Thursday, March 26, 2009

मित्राचे महान कार्य.

माझा मित्र स्पष्टवक्ता पण मनमिळावु असल्यामुळे सर्व मित्राना आपलासा वाटायचा.त्याचे खुप मित्र होते. स्पष्टवक्तेपणाने त्याचे काही मित्र त्याच्यापासुन लांबले होते. दुसर्याना मदत करण्यात तो मग्न असायचा. तो जिथे राहत होता तेथे बाजुला कपंनीचे रुग्णालय होते.तिथे कपंनीचे कर्मचारी नेहमीच औषधोचारासाठी येत असतात.त्यातले काहीजण मोठया आजाराने रुग्णायलामघ्ये दाखल होते.माझा मित्र रोज रुग्णायलात एक फेरी मारायचे व दाखल असलेल्या सर्व रुग्णाची हसतखेळत विचारपुस करीत असायचा. थोडा वेळ तरी हे सर्व रुग्ण आपला आजार विसरत होते. ज्या रुग्णाच्या जवळ नातेवाईक नसायचे त्याची आपुलकीने तो चौकशी करायचा. त्याला या रुग्नाबद्दल आस्था असायची. त्याच्या फेरीची ठराविक वेळ होती.त्या वेळेची सर्व आजारी वाट पाहत असायचे.डाँक्टर व सिस्टरचा याला विरोध नसायचा.त्याला पाहरेकरीही वाँर्डमघ्ये जाण्य़ास अडवायचे नाहीत. या फेरीला त्याने केव्हाच क़ंटाळा केला नाही की त्याने चुकविली नाही. आजाराने पछाडलेल्या रुग्नाची सेवा जास्त करायचा.त्याची छोटी छोटी कामे करायचा. रुग्ण कोणत्याही जाती घर्माचा असलातरी मित्र त्याला मदत करायचा. रुग्णायलात तो प्रसिध्द होता. वयाच्या पच्चावन वर्षात न थकता हे कार्य करीत होता. लहान मुलांवर तो खुप प्रेम करायचा.प्रत्येक मुलाने पोहणे शिकले पाहीजेत असा त्याचा अट्टाहास होता. मे महीन्यात पोहण्याचा क़ँम्प भरवायचा. त्याला कोणतीच शारीरीक व्याधी नव्हती तो तर्दुस्त होता. त्याला एका दिवशी हदयविकाराच्या झटक़्यामुळे अत्याव्यस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आमचा मित्र डाँक़्टरांच्या परीचीत असल्यामुळे सर्वानी धावपळीचा सुरुवात झाली.काही वाँर्डमघ्ये ही बातमी कळली. सर्व रुग्ण धास्तवले. डाँक्टरांचे प्रयत्न सुरु होते. त्याचे शरीर प्रयत्नाना साथ देत नव्हते. तो या त्रासातून बरा व्हावा असे सर्वाना मनापासून वाटत होते. काही तासानतंर त्याची प्राणज्योत मावळली.सर्वजण हळह्ळ्ले. वाँर्डमघ्ये शातंता झाली. डाँक्टर व सिस्टर हेही स्तब्ध झाले. याना या गोष्टी नेहमीच्या असतात पण मित्राच्या मृत्युने सर्वाना वाईट वाटले. वाँर्डमघल्या रुग्णानी त्या दिवशी काहीच खाल्ले नाही. सर्वाना नेहमी हसवणारा आमचा मित्र आता शांत झाला होता. त्याचा हसरा चेहरा नजरे समोर होता.
रुग्णाना आधार देण्याचे महान कार्य करणारा आमचा मित्र आम्हाला सोडुन गेला होता. हे त्याचे वेगळेच कार्य पुढे नेणारा अजून तरी कोणी नविन माणुस तयार झालेला नाही.

No comments: