लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासुन राजकीय घडामोडीला वेग आला आहे.वेगवेगळ्या पक्षांच्या युत्या व आघाडंयामघ्ये ओढाताण सुरु आहे. नतंर याच युत्या व आघाडयांमघ्ये जागावाटपावरुन धुमचक्री होत आहेत. पक्षापक्षातुन उमेदवारीहुन वादावादी जोषात आहे.जेष्ट नेते काही जागावर हक्क दाखवित आहेत. नेते तिकीटासाठी दिल्लीच्या वार्या करीत आहेत. जागा वाढविण्यासाठी आपल्या मित्रपक्षाशी लढा देत आहेत. मित्रपक्षाने कमकुवत व दुबळे उमेदवार उभे करावेत अशी मागणी होत आहेत. सर्व पक्षांनी
आपले निवडणुकांच्या प्रचाराचे जाहीरनामे प्रसिद्दद केले आहेत.या जाहीरनाम्यातून अव्वाच्या सव्वा आश्वासने दिले आहेत. या आश्वासनांच्या कामाशी ना पक्षाला ना मतदाराना काहीच सोयरेसुतक उरलेले नाही. दुसर्या नेत्यांवर टिका करणे हाच हल्लीचा मुख्य प्रचार आहे. जनतेचे प्रश्न व त्यांच्या गरजांचा विचार न करता फक्त हि निवडणुक कसेही करुन जिंकायची हाच उद्देश प्रत्येक पक्षांचा व उमेदवाराचा दिसतो.
मतदारांचा विश्वास संपादन न करता व जाहीरनाम्यातील योजनांचे विश्लेषन न करता मतांची मागणी केली जात आहे. या सर्व प्रकाराहून ही लोकसभा निवडणुक आतापर्यत झालेल्या निवडणुकांपेक्षा व्यवहारीक निवडणुक होत आहे. निवडणुकीनतंर सत्ताप्रातीसाठीचे धोरण आणि तत्वांचे राजकारण बासनात गुंडाळुन निर्माण होणार्या युत्या व आघाडीचा विशिष्ट विचारसरणीतून ठराविक पक्षाशी निष्ठा दाखवित मतदान करणार्या मतदारांची गोची करीत आहेत. एखाद्दा पक्षांची विचारसरणी व तत्वे पसंत नसतील त्या पक्षाबद्दल तिरस्कारांची भावना असेल यासाठी मतदार त्या पक्षाला नाकारतो. तो पक्ष निवडणुकीनतंर सत्ताआघाडीत सहभागी होतो. अशा या राजकारणात मतदार पुणर्त: गोधंळुन गेलेला दिसतो. मतदाराला कोणत्या उमेदवाराला व कोणत्या पक्षाला मते देण्याच्या प्रश्न पडलेला आहे.
No comments:
Post a Comment