देशातील लोकसभा निवडणुका लवकरच होत आहेत.देशातील एकुण ७१ कोटी २९ लाख मतदारांपैकी ३४ कोटी ६ लाख महिला आहेत. सहा राज्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदांरापेक्षा अधिक आहे. कीती राजकीय पक्षांनी येत्या निवडणुकीत महिलाना उमेदवारी दिली आहेत. महिलाना फ्क्त उमेदवार निवडीच्या ह्क्कांसोबत उमेदवारीचा ह्क्क मिळवून दिला पाहीजे. निवडणुक आयोगाने पुरुष व महिला मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात उमेदवारी देण्यात यावी. महिलांचे प्रश्न सरकार पर्यत पोहच्विणारे महिलांचे प्रतिनिधित्व मिळविण्याची संधी महिलाना मिळाली पाहीजे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षक पदाच्या निवडणुकीत श्रीयुत ओबामाना निवडुन देण्यात महिलांचा मोठा सहभाग राहीला आहे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाहीबद्दल अमेरिकेत त्यानी महिलांसाठी एक स्वतंत्र कौन्सिल उघडले व मंत्रीमडंळात सगभागही दिली आहे. राजकीय ह्क्क मिळुन घोरण ठरविणार्याच्या पंक्तित जेव्हा त्या बसतील तेव्हाच बदल घडतील. पुरुषप्रधान समाज्यात व राजकारणात महिलाना दुय्यम दर्जाची वागणुक दिली जाते. राजकारणात स्त्रिया पुढे आल्यास पुरुषांची मक्तेदारी काही प्रमाणात कमी होइल. महिलांच्याकडे पाहण्याचा पांरपारीक द्रुष्टीकोन बदलावा लागेल व निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत स्त्रिशक्तीला बाजुला न सारता अधिकारात सामील कराव्यात. पुरुषी अंह्कार बाजुला सारुन महिलांना राजकारणात ह्क्काचे स्थान मिळवून देण्यातच खरा पुरुषार्थ आहे.महिलादिना निमित्त राजकारणी नेते महिलाना त्याचे अधिकार मिळवून देण्याचे आश्वासन देतात पण निवडणुकीतून महिलाना उमेदवारी देण्याची वेळ येत तेव्हा दुर्लक्ष करतात. या निवडणुकीत महिलाना मतदार म्हणुन नव्हे तर त्याना उमेदवार म्हणुन उतरविले पाहीजेत.
No comments:
Post a Comment