Thursday, May 21, 2009

'ऑस्कर' विजेत्याना कोणी मदत करील का?




'ऑस्कर'विजेत्या 'स्लमडॉग मिलिओनेअर'मधील अनेक बालकलाकार राहात असल्याने चर्चेत आलेल्या वांद्यातील चमडावाडी नाल्यालगतच्या २५ अनधिकृत झोपड्यावर गुरुवारी मुबंई महापालिकेचा हातोडा चालला. पडद्यावरील सलीमची... प्रत्यक्षातील अझहरची झोपडीही त्यात जमीनदोस्त झाली. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नाल्यातील पाणी या झोपड्यांमध्ये शिरून काही दुर्घटना झाली असती, तर ठपका पालिकेवरच आला असता, असा दावा अधिकाऱ्यांनी केला. 'स्लमडॉग मिलिओनेअर' या ऑस्करविजेत्या सिनेमाने अझर व रुबिना या बालकलाकारांना त्यांच्या अभिनयामुळे भरपूर प्रसिद्धी मिळाली. आताही ते प्रसिद्धीच्या झोतातच आहेत. पण ही प्रसिद्धी आहे, बेघर झाल्यामुळे. अझरपाठोपाठ रुबिनाची अनधिकृत झोपडी बुधवारी तोडण्यात आली.

या मुलांना 'ऑस्कर' पारीतोषिक मिळाले तेव्हा सर्व मान्यवरानी प्रसिध्दीसाठी डोक़्यावर घेतले होते.जगातपुढे स्वत:ला चमकुन घेतले.आता ही मडंळी गेली कोठे? परदेशी डायरेक्टरानी या मुलांना घेऊन चित्रपट काढला नावलौकिक व पैसा मिळविला पण या मुलासाठी काय केले? 'ऑस्कर' मिळाल्यामुळे देशवाशीयानीही भाव खाऊन घेतला होता.

या मुलाना कोणी आसरा देईल का?

No comments: