Monday, June 1, 2009

!! शिवराज्याभिषेक दिन !!


आपल्या अलौकिक पराक्रमाने हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या शिवरायांचा राज्याभिषेक किल्ले राय़ागडावर ज्येष्ट शुध्द त्रय़ॉदशी १६४७ मघ्ये झाला. राज्यभिषेक सोह्ळ्याची स्मृती म्हणुन रायगडावर राज्यभिषेक दिन साजरा केला जातो. शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, रायगड जिल्हा परिषद आणि कोक़ण कडा मित्र मंडळातर्फे ५ जुनला ३३६ वा शिवराज्याभिषेक दिन रायगडावर होत आहे.

या वर्षी ज्येष्ट शुध्द त्रय़ॉदशी अर्थात ५ जून रोजी या एतिहसिक घटनेस ३३६ वर्ष होत आहेत.या देदिप्य्मान घटनेचे स्मरण करण्यासाठी हा 'शिवराज्याभिषेक दिनोत्सव ' साजरा केला जातो.महाराष्ट्रतून तसेच बाहेरील राज्यांतूनही या सोहळ्याला अनेक शिवप्रेमी उपस्थित राहतात.

ज्येष्ट शुध्द व्दादशी दिनांक ४ जून रोजी सकाळपासून श्री. शिरकाई गडदेवता पुजन,श्री.छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्सव,दुपारी श्री जगदिश्व्ररास महाभिषेक, पुण्याहवाचन असा कार्यक्रम होईल.

त्यानतंर मर्दानी खेळ ,शाहीर गोघंळी यांचा जागर व शिवतुलादान,इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.५ जूनला पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिषेक, सिंहासनारोहण व मुद्राभिषेक,त्यानंतर राजमंचदर्शन सोहळा, व्याख्यान असे कार्यक्रम, भव्य पालखी मिरवणुक सोहळा,राजदरबार ते श्री जगदिश्र्वर मंदिर मिरवणुकी दरम्यान होळीचा माळ येथे मर्दानी खेळ ,ढोल ताशे.लेझीम पथकांचे संचलन व शेवटी महाप्रसाद अशा प्रकारे हा सोहळा होणार आहे.

या दोन्ही दिवशी गडावर येणार्यासाठी निशुल्क भोजन व्यवस्था उत्सव समिती व रायगड जिल्हा परीषद यांच्या संयुक्त विद्दमाने केली जाते. कील्ले रायगडावर हा सोहळा साजरा करण्यासाठी मावळ्यांनी पारंपारीक वेषात, ढोल ताश्याच्या गजरात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असाच शिवराज्याभिषेक दुसर्याच दिवशी पुन्हा दुसरी संघटना साजरी करणार आहे याबद्द्ल वाईट वाटते.

No comments: