Friday, June 5, 2009

मोबाईलची शिकवणी.

मुंबईत लोकलने प्रवास करीत होतो.मला खिडकीची जागा मिळाली होती.दादरला नवरा,बायक़ो व लहान मुलगा असे एककुटुंब समोरचा सिट वर येउन बसले.सामान रँकवर सर्वजण स्थानापन्न झाले.नवर्याने माझ्या शेजारच्या कडुन पेपरमागुन घेतला व वाचु लागला. थोडया वेळाने बायकोने नवर्याला मोबाईलवर कोणा नातेवाईकाला फोन करण्याची विनंती केली. त्याचे लक्ष पेपर वाचण्यात होते.त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. तिने पुन्हा त्याला हलहलवुन फोन लावण्याची विनंती केली. त्याला वाटते तो फोन करायचा नव्हता म्हणुन त्याने मोबाईल तिचा हातात सोपवुन तीला फोन करण्यास सांगितले व पेपर वाचू लागला. मी शांतपणे सर्व गोष्टी पाहत होतो. तीने मोबाईलवरुन फोन करण्याचा प्रयत्न केला.तो पेपर वाचता वाचता तिच्या कडे पाहत होता. त्याला तीचे प्रयत्न पाहुन न राहील्यामुळे त्याने एकदम तिच्या हातातुन मोबईल ओढुन घेतला. त्याने मोबाईल कसा वापरायचा याची शिकवणी सुरु केली.

back-मागे, search- शोधा, View- पहा, delete- रद्द करणे, edit- दुरुस्त करा. हया सर्व संज्ञा वापरुन त्याने त्याच्यापरीने तीला माहीती देण्याचे प्रयत्न सुरु होते. लहान मुलगा आईबाबांकडे शांतपणे पाहत होता. गाडीतले प्रवासी या शिकवणीची मजा घेत होते. तीला प्रयत्न करुनही काय जमत नव्हते.तो व्यतागुन रागवत होता.मघ्येच कसा काय एक फोन लागला. नतंर राँग नबंर लागलेल्याचे कळले तेव्हा तर त्याने तीच्या खाद्यावर थप्पड मारली. नवर्याकडे सर्व प्रवासी पाहु लागले.तीने खादां चोळत त्याच्या कडे रागाने पाहीले. त्याचे सार्वजनिक जागेत असे वागणे योग्य वाटले नाही. ती पुन्हा प्रयत्न करु लागली. back,delete,हिरवे,लाल बटने दाबण्यास तो तीला ओरडुन सांगत होता. तो स्वत:ला मोठा ज्ञानी समजत होता ती गरीबासारखी सर्व गोष्टी ऐकत होती.

शेवट पर्यत त्याची शिकवण काय संपली नाही पण गाडी सीएसटी ला पोहचली होती. त्याला तो फोन लावयचा नव्हता असे वाटले.


1 comment:

Prashant said...

विवेक,

छान लिहिला आहे. कधी कधी असा वेडेपणा होत असल्याचे आपण पाहत असतो. असे वागणे टाळून सबुरीने घ्यावे.

एक माझा दृष्टीकोन सांगतो,... दर वेळेस असे होते असे मात्र नाही..... पण असेही प्रसंग होतात:
काही लोकांना जेव्हा कोणी आपणहून वेळ येण्याआधीच नविन गोष्टी शिकवतो, तेव्हा त्याचे महत्व नसते. हे काय नविन प्रकरण.... आमच्या वेळी असे नव्हते किंवा मला काय करायचे आहे हे शिकून...... असा भाव. मग साहजिकच शिकवणार्‍याचा हिरमोड होतो. नंतर गरज पडेल तेव्हा मात्र परावलंबी व्हावे लागते.

बिचार्‍या नवर्‍याला वाटत असेल की बायकोने स्वतः फोन लावणे शिकावे. पण शिकवणीची जागा चुकली आणि नसती भानगड झाली.

किंवा नवशिक्यांना माहित नसते की फोनमधे बॅटरी असते, प्रवासात शक्यतो ती टिकवून ठेवावी. गरज असेल तेव्हाच फोन लावावा. उगाच लोकांच्या गर्दीत फोन लाउन लोकांना त्रास देऊ नये. किंवा खरोखरच त्याला फोन लावायचा नसेल.... पैसे काही झाडाला लागत नाहीत...... आपण इथून काय सांगू शकतो?

---
लिखाणात चुका टाळण्यासाठी कृपया लिहिण्याच्या Help ची मदत जरूर घ्यावी. खुप वेळ नाही घेणार ही गोष्ट.
उदा. :
‘नवर्याला’ ऐवजी ‘नवर्‍याला’ असे लिहावे.


अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी पहा : http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=90016191&tid=5337676323429277727&start=1


-- प्रशांत