अरुणाचलचा प्रदेश हा पर्वतीय प्रदेश आहे व याभागात हवाई उड्डणासाठी हवामान नेहमीच अनुकूल नसते.येथे धुके असते तसेच दिवस लवकर मावळत असल्याने अंधारही लवकर पडतो. त्यामुळे मानवी दृष्टीला फार दूरचे दिसत नाही.चीनने तिबेटमध्ये रेल्वे आणून सीमाभागातील लष्करी पायाभूत सोयींमध्ये कमालीची सुधारणा घडवून आणल्यानंतर भारतीय लष्कराने या भागात लष्कराची ये-जा सुलभ व्हावी यासाठी तातडीने धावपट्ट्या बांधण्यास सुरुवात केली आहे. केवळ धावपट्ट्या आहेत, विमानतळ नव्हेत. त्यामुळे येथे विमानांना मार्गदर्शन करणारी कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा नाही. विमानचालकांना प्रत्यक्ष पाहूनच धावपट्टी शोधावी लागते व त्यावर विमान उतरवावे लागते.वाईट हवामानातही सियाचीन आणि काश्मिरात हवाईदलाचे पायलट विमाने नेतात व यशस्वी कामगिरी करतात. पण भारतीय हवाईदलाच्या विमानाना अरुणाचल प्रदेशात होत असलेले अपघात हा चीनबरोबरच्या सीमाक्षेत्रात हवाईदलालाअसलेला आव्हान स्पष्ट दिसत आहे. ही विमाने समोरचे काही दिसत नसल्याने हिमालयाच्या एखाद्या शिखराशी टकरून पडले आहेत असे अंदाज बाधंले जात आहेत.अपघातातून हवाईदलाचे व लष्कराचे जवान मरण पडत आहेत.ह्या ठीकाणी विमान चालवताना दैवाची साथ गरजेची आहे. चीनेने आक्रमणाला तोंड देण्यासाठी ह्या घावपट्ट्यावरुन हवाईदलाची अत्याधुनिक विमाने उड्डाणे घेण्यासाठी तयारीत असतात.या विमानांपुढेही हवामानाचे हे आव्हान आहे. त्यामुळे येथे हवामान व भौगोलिक स्थिती या शत्रूंशीही हवाईदलाला सामना करावा लागणार आहे. या भागात रस्ते नसल्याने सैन्य विमानातून न्यावे लागते.कॉणतीही मदत विमानातूनच पुरवावी लागते. अशा अवस्थेत युद्ध ही दुहेरी जोखीम आहे. या भागात चिनने रेल्वे आणली तर आपल्या देशाला रस्ते तरी बाधांवे लागतील. काम थोडे कठीण पण सुरुवात तरी करावी लागेल. नाहीतर होणारी हानी सहन करण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही. दैवाच्या साथीची कीती दिवस वाट पाहत बसणार?
1 comment:
बरोबर.माणसाचे श्रम व योजकता ह्याच्या जोडीला दैवाची साथ की कुठलेही लक्ष्य गाठणे अशक्य नाही.
मुद्दा चांगला.
Post a Comment