

मागच्या रविवारी आमच्या ल्कबचा ट्रेक 'आजोबा' येथे आयोजित केला होता.मीच पुढाकार घेऊन सर्व मित्राने फोन करुन ट्रेकला येण्याचे आमत्रंण दिले. ट्रेक एक दिवसाचा ट्रेक असल्याने मित्रमडंळी पटापट तयार झाली. नवशिक्यांनासाठी व ट्रेकची आवड निर्माण होण्यासाठी खुप मित्राना ट्रेकसाठी बोलावले.
कल्याण,मुरबाड,शेणवे,डोळखांब करुन डेणे गांवात पोहचलो. ओळख परेड मघ्ये चाळीस जण जमले होते. पाउस बारीक थोड्या वेळाने सारखा पडत असल्याने वातावरण उत्साही वाटत होते. रमतगमत गाणीगात दंगामस्ती करीत वर चढत होतो. सगळी कडे हिरवी शाल पाधंरली होती.निसर्ग पाह्त राहावा असाच होता. ग्रुप मोठा असल्याने परिचय होण्यास वेळ गेला पण नतंर मजा आली. चढत चढत आम्ही पटक्न वाल्मिकी आश्रमाजवळ पोहचलो ते कोणालाच कळले नाही. तसेच उत्साहाचे वातवरण होते.
ते स्थळ खुपच रमणीय असेच आहे. मोठमोठ्या वृक्षांच्या खाली हे वाल्मिकी आश्रम वसलेले आहे. हे प्रेक्षणीय स्थळ पाहण्यास प्रत्येकाला हा ट्रेक करावा लागेल. येथे वाल्मिकींची समाधी एका जुन्या व पडक्या घरामघ्ये आहे. वाल्मिकींचे आसन व सीतेचे कुंड या ओळ्खी दिसण्यात येतात. तेथे कायम वास्तव्य करणारे साधु व स्थानिकांच्या मदतीने या समाधीची देखभाल केली जीते.तेथे सीतेचे व लवकुशांचे वास्तव्य होते असे सांगितले जाते. उंच पर्वतावर सीतेचा पाळणा व लवकुशांच्या गुहा आहेत. ही पुरातन वास्तु अशी अडचणीत पडलेले पाहुन वाईट वाटते. हे आश्रमाला त्या परीसरातले व आमच्या सारखे वाटसरुच फक्त भेट देतात.
आश्रामाच्या बाजुला पावसाळ्यात एक धबधबा वाहत असतो.त्यामघ्ये सर्वानी मजा केली व आश्रामात येऊन जेवण केले.गाणी गाणुन मनोरजंनाचा कार्यक्रम केला. पुढच्या वर्षी परत येवु असे ठरवत आम्ही परतलो.
हे ठीकाण सरकारने विकासीत करावे.महाराष्ट्रात अशी कितीतरी ठिकाणे पडुन आहेत.त्याचा विकास करुन पुढच्या पिढीला माहीती करुन देण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment