
निवडणुक आयोगाने संगणकातील नविन तंत्रज्ञानांच्या साहाय्याने आपली मतदानाची प्रक्रिया अद्ययावत करावी. मतदार याद्या,मतदार केंद्रे,मतदान यत्रे,साही लावणे,मतमोजणी ही जुनी,खर्चिक,वेळखाऊ, मनुष्यबळ व कडक़ सुरक्षा लागणारी पध्दत आपण अजून किती वर्ष वापरणार आहोत? बँकाची कामे,शेअरमार्केट,रेल्वे व विमान आरक्षण असली किचकट कामात सुरक्षेसहीत संगणकाच्या अद्ययावत प्रणालीचा वापर होत आहे. मतदारांची सर्व माहीती फोटॉसहीत गोळा करुन डेटाबेस बनविल्यानतंर प्रत्येक मतदाराला (आय डी)नबंर दिल्याने त्याला घरबसल्या मतदान करणे सोपे जाईल.नेटच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाला जगातून कोठुनही व दिलेल्या ठराविक वेळेत मतदान करता येईल. तरुणांई मोठ्या संख्येने मतदानात सहभागी होतील.तसेच मतदान न करणार्यावर तात्काळ कायदेशिर कारवाई करणेही सोपे होईल. मतमोजणी एका बटनाने लगेच व कमीत कमी वेळेत होऊन निकाल ताबडतोब लागेल. सर्व पक्षांनी गेल्या निवडणुकीत वेबेसाईट बनवून प्रचाराला सुरुवात केली आहे. सरकारला राजकीय नेते,विचारवंत आणि तज्ञांच्या मदतीने अभ्यास करुन संगणकाची अत्याधुनिक प्रणाली बनवून निवडणुक प्रक्रियेसाठी लागणारा वेळ,सरकारी यत्रंणा व पैसा वाचविता येऊ शकतो. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत नविन प्रणालीचा वापर करण्यासाठी आयोगाने प्रयत्न करावेत.
हे माझे पत्र २ जुन,२००९ रोजी 'सकाळ'या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले आहे.
No comments:
Post a Comment