मित्रांसह भिमाशकंर च्या ट्रेकला जाण्याचा योग आला.तसे काही वर्षाच्या गँपने तिस-यांदा या ट्रेकला जात होतो.दाट रानातून भ्रमण करण्यास मिळणार म्हणुन आनंद होतो. विरस झाला.खुप वाईट वाटले.पुर्वी या ट्रेकला घनदाट जगंलातुन जावे लागते.भिती वाटायची.पण आता परिसर ओसाड दिसला.
घनदाट अरण्य, सह्यादीचे गननभेदी कडे, जंगलातून वाहणारे ओढे, रंगीबेरंगी फुलपाखरं आणि उंच वृक्षांवर उड्या मारणारी शेकरू खार... असं आणि बरंच काही दडलं आहे भीमाशंकरच्या परिसरात. पुणे, रायगड व ठाणे जिल्ह्यामध्ये १०३ चौकिमीवर पसरलेलं भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य नंदनवनासारखं भासतं.आंबा, जांभूळ, करंबू, अंजन, शेंदरी, पिसा, उंबर, फणस आदी उंचच उंच वृक्ष आपल्या सभोवताली आढळतात.नाना त-हेच्या पक्ष्यांचे आवाज व दुमिर्ळ फुलपाखरांची साथ यामुळे चालण्याचा शीण जाणवआचा.भीमाशंकरच्या अभयारण्यात ‘शेकरू’ हा खारीसारखा दिसणारा, परंतु खारीपेक्षा मोठा असणारा लाजाळू प्राणी पाहायला मिळतो. येथील अभयारण्याव्यतिरिक्त ‘शेकरू’ कोणत्याच जंगलात दिसत नाही हे विशेष आहे. ‘शेकरू’ या प्राण्यासाठी भीमाशंकर अभयारण्य प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक आणि भाविकांना येथे आल्यावर ‘शेकरू’ पाहण्याचा मोह आवरत नाही.शेकरू किंवा मलबार जायण्ट स्क्विरल ही दुमिर्ळ प्रजात इथे प्रामुख्याने आढळते. सुमारे दोन फूट लांबीची, लाल-पिवळ्या रंगाची ही देखणी खार उंच वृक्षांवर आपल्याला पाहावयास मिळते.नागफणीचा ट्रेक काहीसा खडकाळ व अरुंद पायवाटेतून जातो. श्रावणात या परिसरात फुललेली पिवळीजर्द सोनकी पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. नागफणी पॉइण्टवर सोसाट्याचा वारा झेलत सभोवतालची दरी पाहण्यात निराळाच आनंद मिळायचा.हा निसर्गाचा अनमोल ठेवा पाहण्यास मिळाला नाही.
जैविक विविधतेचा खजिना लाभलेल्या या अभयारण्यावर मात्र मानवी अतिक्रमणाची कु-हाड पडू लागली आहे. काही वर्षांपूवीर्पर्यंत हे जंगल उत्तरेकडे नाणेघाट व दक्षिणेकडे खंडाळा राजमाचीला जोडलेलं होतं. मात्र मनुष्य वस्तीची वाढ व बेसुमार वृक्षतोडीमुळे या परिसरातील जंगल कमी होत चाललं आहे.भीमाशंकरच्या अभयारण्यात बेसुमार बेकायदा वृक्षतोड होत असल्याचे निदर्शनास आले आहे.भीमाशंकर अभयारण्य क्रमांक दोनमध्ये बेकायदा वृक्षतोड होत असून येथील वन्यजीव आणि पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहेखरे तर वन्यजीव विभागाने येथील अभयारण्याकडे जातीने लक्ष देऊन अभयारण्याचे रक्षण करणे गरजेचे आहे, खरे तर वन्यजीव विभागाने येथील अभयारण्याकडे जातीने लक्ष देऊन अभयारण्याचे रक्षण करणे गरजेचे आहे, मात्र ‘कुंपणच शेत खाते’ या म्हणीनुसार वन्यजीव विभाग बेकायदा होत असलेल्या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करत आहे.मात्र ‘कुंपणच शेत खाते’ या म्हणीनुसार वन्यजीव विभाग बेकायदा होत असलेल्या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करत आहे.खरे तर वन्यजीव विभागाने येथील अभयारण्याकडे जातीने लक्ष देऊन अभयारण्याचे रक्षण करणे गरजेचे आहे, मात्र ‘कुंपणच शेत खाते’ या म्हणीनुसार वन्यजीव विभाग बेकायदा होत असलेल्या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करत आहे.कायद्याला न जुमानता अभयारण्य क्षेत्रातून आणि खासगी वनांमधून खुलेजाम, सर्वासमक्ष येथील लोक लाकूडतोड, वृक्षतोड करतात.
पूर्वीपेक्षा भीमाशंकर क्रमांक दोनचे जंगल खूपच विरळ झालेले दिसते. पूर्वी असलेली मोठमोठी झाडे जवळ जवळ नष्ट झालेली आहेत.भीमाशंकर अभयारण्याचा परिसर हा अतिदुर्गम भाग असल्याने अधिकारी जास्त लक्ष देत नाहीत वाटते. स्थानिक,मंदिर ट्रस्ट व वन्य खात्याच्या अधिका-यांच्या आपपासातले मतभेद दुर ठेवून या कामाकडे लक्ष देऊन या अनमोल ठेव्याची राखण केली पाहिजे.ग्लोबल वाँर्मिगचे परिणाम आपण पाहत आहोतच.आपण असेच दुर्लक्ष करीत राहिलो तर जग़णे कठीण होईल.
1 comment:
Very nice.
A neatly arranged / written blog.
Dinesh Malekar
dbmalekar@gmail.com
Post a Comment