Friday, March 5, 2010

राँयल्टीने पशुसंर्वधन करावे.


व्यवसायिक आपल्या वस्तू व सेवा विकण्यासाठी ग्राहकाना आकर्षित करण्यासाठी ब्रँन्ड नेमुन त्याना कोट्यावधीरुपयांचा मोबदला दिला जातो.सिनेकलाकार व खेळांडुच्या लोकप्रियतेवर त्यांची ब्रँन्ड व्हॅल्यू अवलंबून असते. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींइतकीच गेल्या काही महिन्यांत आपल्या वाघोबाची ब्रॅन्ड व्हॅल्यूही उद्योगक्षेत्राने हेरली आहे. दुदैर्वाने वाघोबाच्या ब्रॅन्ड व्हॅल्यूचं महत्त्व अचानक इतकं वाढण्याचं कारण हे त्याच्या रुबाबात नसून त्याच्या ढासळत्या संख्येमध्ये आहे. आता उरलेत केवळ १४११, आणखी कसली वाट पाहताय तुम्ही, अशा आशयाचं आवाहन अनेक जाहिरातींमध्ये दिसू लागलं आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या ब्रॅन्ड प्रमोशनमध्ये पुन्हा एकदा वाघोबाला स्थान दिलेलं पहायला मिळेल.वाघाच्या रोडावत चाललेल्या संख्येमुळे अनेकजण आता वाघाकडे धाव घेत असले, तरी यापूवीर्ही वाघोबाने अनेक ठिकाणी ब्रॅन्डस् म्हणून आपलं नाव कोरलं आहेच. वाघोबाने अशा प्रकारे ब्रॅन्ड व्हॅल्यू म्हणून रॉयल्टी मागण्याचा सपाटा लावला असता,तर कित्येक कोटी रुपये त्यालाही मिळू शकले असते.वाघ,सिंह्,क्रोकोडाइल,कासव,ससा,बकरी,माकड ह्या प्राण्यांचे नांव अनेक ठिकाणी ब्रॅन्ड्स वापरले. सृष्टीतल्या प्रत्येक पशुपक्ष्याने आपल्या मनावर लहानपणापासून नेहमीच गारुड केलेलं असतं. त्यामुळेच सृष्टीतल्या अशा प्रत्येक भागीदाराची ब्रॅन्ड व्हॅल्यू काढायचं म्हटलं, तर आकडेच पुरे पडणार नाहीत.

ब्रँन्डची राँयल्टी जमा करुन तो निधी पशुसंवर्धनासाठी वापरला पहिजे.राँयल्टी नसल्याने कंपन्या पशुपक्षांना ब्रँन्ड म्हणुनवापरुन पैसा वाचवून फायदा जमा करीत आहेत.ब्रँन्ड ची राँयल्टीच्या पैशाने अभयारण्य उभारणे,प्राण्यांचे संरक्षण,त्याची देखभाल,प्राण्यांचे रुग्णालय स्थापणे ही कामे करु शकतो.सरकारने राँयल्टी घेण्यास सुरुवात करावी.नाहीतरी कंपन्या करोडो रुपये ब्रँन्ड वर खर्च करतात तेव्हा त्याना प्राण्यंच्या ब्रँन्डवर खर्च करण्यास काहीच हरकत नाही.