कोणताही साहित्यिक कार्यक्रम असला की,तरुणांचा सहभाग हा कमीच असतो,हे साहित्य संमेलनाने पुन्हा एकदा अधोरेखित केले.संमोलनाकडे तरुणांनी पाठ फिरवली आहे.संमेलन इतिहासातल्या विषयांवर पुढेही चालू राहणार असेल तर तरुण त्याकडे कायमची पाठ फिरवतील.
कुठल्याही भाषेची वाढ व्हायला,ती समुध्द व्हायला जो राजाश्रय आणि लोकाश्रय लागतो तो मराठीला लाभलेला आहे.पण बदलत्या काळात केवळ राजाश्रय-लोकाश्रय पुरेसा ठरेल असे नाही तर या भाषेला 'तंत्रज्ञानश्रय' लाभायला हवा.संगणक व मोबाईल ही आजच्या आधुनिक जगण्याची माध्यमे आहेत.जी पिढी ही साधने संपर्कासह जगण्याच्या विविध क्षेत्रातल्या अनेक गोष्टीसाठी सरावाने वापरते ती पिढी त्या माध्यमांवर मराठी वापरणार आहे क़ा?वापरते आहे का? इंग्रजी इतक्याच सुलभ रीतीने मराठी संगणक आणि मोबाईल या आधुनिक साधनांवर वापरली गेली तर ती भाषा नव्या पिढिच्या हातात,आधुनिक जगण्याक्या प्रवाहात सामावली जाईल.संगणकावर-इंटरनेटवर मराठी वापरलीच गेली नाही तर जगण्याच्या वेगवान अत्याधुनिक प्रवाहात ती मागेच पडेल.
आजच्या घडीला संगणकावर-इटंरनेटवर मराठी वापरणे हे इंग्रजी इतकेच सुलभ झालेले आहे.पण त्यासाठीची तंत्रे कशी वापरायची हेच तरुणाना शिकवले जात नाही किंवा माहीती होत नाही.साध्या सोप्या गोष्टी शिकून घेतल्या तर इग्रजी इतक्याच सुलभतेने मराठी वापरल्यास मराठीचा प्रसार जोरात होईल.संगणकातील नवनविन प्रणालीचा उपयोग मराठीच्या प्रसाराला केला तर नेट सँव्ही तरुण मडंळी मराठीकडे नक्कीच वळतील.तेव्हाच ही तरुण मडंळी साहित्याकडे येण्यास तयार होतील.
आजचे प्रगल्भ तंत्रज्ञान वापरुन भाषेला पुढच्या टप्प्यावर नेणार,आधुनिक जगण्याचा अविभाज्य घटक़ असलेल्या साधनांचा वापर करुन त्यातून संवाद आणि माहितीचे आदानप्रदान वाढवणे एवढेच आपल्याला करायचे आहे.तसे झाले तर नव्या प्रवाहात नव्या साधनांसह मराठी अधिक समृध्द होईल.हे दीर्घकाळ सातत्याने करवयाचे अत्यंत मोठे काम आहे.त्यासाठी राजकिय-शासकीय इच्छासक्तीसह काम करणा-या संशोधनवृत्तीची गरजेवर मराठीचे भविष्य ठरेल.याची नोंद संमेलनात घेतली व त्याप्रमाणे विचार व बदल केल्यास तरुणही संमेलनाकडे वळतील.
संमेलनाचे अध्यक्षपद भुषविणारी व्यक्ती ही सत्तरी ओलांडलेली आणि मावळतीच्या प्रवासाला लागलेली असते.तरुण व्यक्तीला हे पद मिळायला हवे.तरुणांमघ्ये धावपळ करण्याचा उत्साह असतो.संमेलनाला तरुण अध्यक्ष मिळाल्यास साहित्य संमेलनाकडे तरुणांचा ओढा वाढेल.
मराठी भाषेचे जतन,संवर्धन तरुणांच्या हाती दिले पाहिजे.
No comments:
Post a Comment