घोटाळे करायचे व मी निर्दोष आहे असा बोभाटा करायचे ही राजकारण्यांनी नीती ठरविली आहे.
आर्दश चव्हाण व राष्ट्रकुल कलमाडी घोटाळ्यात अडकले तरीही ते निर्दोष असल्याची ग्वाही देत आहेत. काँग्रेस पक्ष या नेत्यांच्या भ्रष्टाचा-यांवर कारवाई करताना फक्त राजीनामा मागितला जातो.सगळे नेते कोणत्यातरी जागेच्या घोटाळ्यात गुंतले आहेत.असे का होते? वाढत्या जागेच्या किंमतीमुळे सर्वाची
नजर मोक्याच्या जागा विकण्याचा व खरेदी करण्याचा प्रयत्नात नवे घोटाळे करीत आहेत. सामान्य कामगाराना आपली मालमत्ता जाहीर करावी लागते.मालमत्तेत वाढ झाल्यास त्याची चौकशी होते.पण या नेत्यांची अफाट वेगाने वाढणा-या मालमत्तेची कोठेच चौकशी होत नाही. एकाही मोठ्या राजकारण्याला मोठी शिक्षा झालेली नाही.हि मडंळी आपल्या अधिकाराचा उपयोग करीत आपण केलेल्या घॉटाळ्यात इतर शासकिय अधिका-याचा बळी पडत सुरक्षित बाहेर पडतात. महानगरातील जमिनींना सोन्यापेक्षाही अधिक भाव आले आहेत.महाराष्ट्रातील राजकारणी जमीनव्यवहाराच्या मायाजालात गुंतत आहेत. नेत्याकडून राजीनामे घेण्याचे उपचारही पार पाडले जातात हे राज्याच्याच काय पक्षाच्याही दृष्टीने हिताचे नाही. घोटाळ्याची चौकशी 'सीबीआय' या गुप्तचर यंत्रणेकडे अधिकृतरीत्या सोपवण्याचा निर्णयही लवकरात लवकर घेण्यात यावा. 'सीबीआय' चौकशीत जे दोषी ठरतील त्याना कडक शिक्षा व्हायला पाहिजे.
भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि भ्रष्टाचा-यांना जरब बसविणे, यापेक्षा सत्तेची समीकरणे बदलून सत्ता टिकवणे वा सत्तांतर घडविणे यावर सत्ताधारी आणि विरोधकांचा याचा भर आहे.हल्ली हेच राजकारण सुरु आहे. राजकारण्यांनी भ्रष्टाचार करण्याचा बंद केल्यास त्याचे सचिव,शासकिय व पोलिस अधिकारी व सरकारी कर्मचा-यांवर वचक बसेल व तेही भ्रष्टाचारापासुन लांब राहतील.म्हणुनच राजकारण्यांनी भ्रष्टाचार कायम थांबविण्याची गरज आहे.
देशाच्या प्रगतीसाठी सत्ताधा-यांनी भ्रष्टाचारमुक्ती केली पाहिजे.
No comments:
Post a Comment