Wednesday, July 27, 2011

राजाने वाजवला बाजा

टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी चौकशी दरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर आरोप केले.टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात आपण पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना ओढले आहे.माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी पुन्हा पंतप्रधानांना ‘ टार्गेट ’ केले. स्पेक्ट्रम वाटपासंदर्भात मनमोहन सिंग यांनी मंत्रिगटाची स्थापना का केली नाही? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

अटक़ झाल्यापासून राजा याना आपली लवकर सुटक़ा होणार  नाही याची जाणिव झाल्यानतंर त्यानी बचावासाठी हा बाजा वाजवला आहे.त्यांनी या दोघांनाही या घोटाळ्यात गोवण्याचा प्रयत्न केला आहे.खोळ चिखळात अडकल्याने बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसल्याने दुस-याना चिखळात ओढले जात आहे .मंत्री ए. राजा ने देशाच्या राजा व प्रधानांवरच आरोप केले आहेत.या घोटाळ्यात आणखी किती जणांची नांवे येतात ते पाहुया.राजा ढोळ वाजवत सुटले आहेत.राजाच्या ढोळाचा आवाज मिडियाला आल्याबरोबर मिडिया त्या ढोळाचा आवाज देशाला ऐकवले जाते. 
पण सहका-यांच्या भ्रष्टाचाराकडे दीर्घकाळ कानाडोळा केला की स्वच्छ माणसावरही कसे शेकू शकते हे राजा यांनी पंतप्रधानांचे नाव घेतल्याने स्पष्ट झाले आहे. केंद्रात काँग्रेसला पुरेसे बहुमत नसल्याने आघाडीचे राजकारण करावे लागले  पंतप्रधानांनी आपल्या सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला ठामपणे विरोध करणे आवश्यक होते. मनमोहन सिंग यांनी ते केले नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर ते अनेक विजय मिळवत असले तरी अंतर्गत कारभारावरून त्यांचे नियंत्रण सुटत गेले व त्याचा गैरफायदा केवळ युपीएतील पक्षांनीच नाही तर त्यांच्या पक्षातील काही मंत्र्यांनीही घेतला व मन:पूत भ्रष्टाचार केला. पंतप्रधानांनी त्यांच्या कारकीदीर्च्या पहिल्या टप्प्यात चांगला कारभार करूनही दुसऱ्या टप्प्यातील निष्क्रियतेमुळे त्यांच्या संपूर्ण कर्तृत्वावर पाणी पडले आहे.


आता ए. राजा त्यांच्या जबानीचा वापर पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याविरोधात राळ उठविण्यासाठी करतील. ते आणखी कुणाची नावे घेतात ते पाहावे लागेल. यातून राजा वाचतील की नाही हे सांगता येत नसले तरी त्यांना पाठीशी न घालणाऱ्यांविषयी संशयाचे वातावरण निर्माण करण्यात मात्र ते यशस्वी होतील. राजा यांचेच अनुकरण सीबीआयच्या चौकशीत अडकलेले अन्य मंत्री व राजकारणीही करतील. अशा परिस्थितीत पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करून विरोधक गोंधळ माजवतील. या सर्व गोंधळामुळे एकंदरच देशाची आथिर्क परिस्थिती, दहशतवाद, महागाई या सर्व प्रश्नांची चर्चा मागे पडून फक्त राजकीय रस्सीखेच आणि आरोप-प्रत्यारोप सुरू होतील. मंत्र्यांच्या कारभारावर पंतप्रधानांनी वेळीच बारीक लक्ष ठेवले असते तर टु जी घोटाळ्याचे प्रकरण घडलेच नसते.

आता पंतप्रधान व गृहमंत्रीनी हा आरोप खोढुन काढला पाहिजे.त्यानी आरोपाचे खरे खोटे जनतेसमोर आणावे.

2 comments:

Anonymous said...

आरोप खोडून काढला पाहिजे असे क्से म्हणता तुम्ही? ते दोशी नाहीत असं म्हणायचंय का तुम्हाला?

VIVEK TAVATE said...

त्यानी दोषी नाहीत हे पुरव्यानिशी सिद्ध करावे असे माझे म्हणणे आहे.