Saturday, December 10, 2011

श्रध्दावन

 निसर्गाने अन्याय केलेल्या व समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट फुलवणारे आणि त्यांच्यात आत्मसन्मानाचा हुंकार जागवून जगण्याचे बळ देणारे थोर समाजसेवक मुरलीधर ऊर्फ बाबा   आमटे.सेवाभाव या मार्गावरील त्याचा पहिला मैलाचा दगड 'आनंदवन'आहे. समाजाने अव्हेरलेल्या दिनदुबळ्यांसांठी ते मायेचे, हक्काचे घर ठरले आहे. या मंडळींच्या हातांना तेथे काम मिळाले आणि स्वत:च्या पायांवर उभे राहण्यासाठी आथिर्क बळ दिले आहे.













     थोर समाजसेवक बाबा आमटे यांना त्यांच्या लाडक्या 'आनंदवना'त अखेरचा निरोप देण्यात आला.पर्यावरणाच्या रक्षणाबाबत कमालीचे जागरुक असलेल्या बाबांच्या पाथिर्वाचे दहन नव्हे,तर दफन करण्यात आले होते.त्या शांत परीसराला 'श्रध्दावन' या नावाने प्रसिध्द आहे.दीनदलित व कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणा-या ज्येष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे यांच्या पार्थिवाचेही आनंदवनातच दफन करण्यात आलेले आहे. बाबा आमटे यांची समाधी असलेल्या 'श्रद्धावन'या समाधीस्थळी त्यांच्या शेजारीच साधनाताईंनी चिरनिद्रा घेतलेली आहे. बाबांचे आनंदवनातील कार्य पाहून भारावल्याने आपले मस्तक नकळत त्या दोघांच्या  समाधीसमोर झुकते.हे 'श्रध्दावन'पवित्र आहे.हे स्थान हिरव्या वनराईच्या बागेत वसलेले आहे. आनंदवनाचे सेवेकरी हे स्थळ स्वच्छ ठेवून त्यानी या जागेचे  पावित्र्य जपले आहे.बाबां व साधनताई यांच्या कामाचे हे स्मारक आहे.या समाधीस्थळाला भेट देण्याची खुप दिवसाची इच्छा हल्लीच पुर्ण झाल्याने धन्य झालो.















दिल्लीतील महात्मा गांधींची 'राजघाट',पंडित नेहरूंचे 'शांतीवन', इंदिरा गांधींची 'शक्तिस्थळ' ही समाधीस्थळे राजधानीत राजकीय नेत्यांच्या चिरनिद्रेची ठिकाणे म्हणून ओळखली जातात.तसेच महाराष्ट्रात बाबा आमटे यांचे 'श्रध्दावन' हे समाधीस्थळ झाले आहे.

कायम नतमस्तक व्हावे असे हे 'श्रध्दावन' पवित्र ठिकाण आहे.

No comments: