Monday, January 23, 2012

फोडाफोडी

हल्ली निखळ बहुमत मिळविण्याची कोणत्याही पक्षात ताकद न राहिल्यामुळे लोकप्रतिनिधींची फोडाफोडी करून निवडणुक जिंकण्याचा सगळ्या पक्षांचा कल असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे.फोडाफोडी करून सत्तेची सूत्रं आपल्या हाती ठेवण्याचा हा प्रयत्न सगळे पक्ष करीत आहेत.कोणता मासा कोणत्या पक्षाच्या गळाला लागतो यावरुन त्या पक्षाची ताकद मोजली जाते.आताचे सर्वच लोकप्रतिनिधी दलबदळु आहेत.निवडणूक जाहीर झाली की फोडाफोडी, पाडापाडी आणि घोडेबाजार यांना ऊत येतो.


शिवसेनेच्या ठाण्यातील नेत्यांनी राष्ट्रवादीच्या असंतुष्टांना गळाला लावून फोडाफोडी सुरू केली होती. या रणनीताला शह देण्यासाठी खुद्द शरद पवारच मैदानात उतरले. खा. परांजपे यांना गळाला लावून त्यांनी सेनेला धोबीपछाड केले आहेत.

तिकडे मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे भाऊ पंडितअण्णा मुंडे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपची आमदारकी भूषवणारे धनंजय मुंडे हेही दादांच्या मांडीला मांडी लावून व्यासपीठावर बसले होते


मुंबई उपनगर, ठाणे परिसरात गेल्या काही वर्षांत लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. बांधकामक्षेत्र फोफावले आहे. हजारो कोटींची उलाढाल सुरू आहे. साहजिकच या शहरांच्या महापालिकेतील सत्तेला महत्त्व प्राप्त झाले आहे. नगरसेवक पदाला  मोठी किंमत आली आहे.भ्रष्टाचार करुन पैसा कमवायचा एक व्यवसाय सुरु झाले आहे.

या फोडाफोडीच्या राजकारणात सामान्य कार्यकर्ते गोधळुन जातात.कोणावर विश्वास ठेवायचा याचा अंदाज बांधता येत नाहीत.आपला नेता या पक्षात गेला त्या पक्षात त्याला जायाचे नसते.यामुळे तो नेता या कार्यकर्त्यांवर नाराज होतो.



कसेही करुन सत्ता आपल्याकडे राहण्यासाठीची ही पैशाने केलेली फोडाफोडी.

या सा-या सुंदोपसुंदीच्या आणि शह-काटशहाच्या राजकारणाने गेल्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकारण रंगात आले आहे. हेच खरे! जनतेचे प्रश्न बाजुला राहिले आहेत.



दुस-या पक्षातील नगरसेवक,आमदार,खासदार याना फोडुन आपल्या पक्षात आणण्याचे राजकारण योग्य नाही.फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा समाजांच्या समश्येकड लक्ष दिले पाहिजे.फोडाफोडिचे राजकारण पैशाने होत असेल तर ते निश्चित घाणेरडे राजकारण होत आहे.या फोडफ़ोडीत पैशाला विकले जाणारे लोकप्रतिनिधी निर्माण होणार आहेत.मग हेच लोक  दरवर्शी नविन पक्षात दिसतील.

ही फोडाफोडी म्हणजे समाज कार्य नाही.सत्तेसाठी व स्वर्थासाठीची पळापळ आहे.याना जनतेनीच धडा शिकवला पाहिजे.



No comments: