Friday, November 9, 2012

मद्यराष्ट्र


     मद्य हे एक अल्कोहोलयुक्त पेय आहे.दारू पिण्याची इच्छा अनियंत्रित.इतर मादक द्रव्यांप्रमाणे मद्य पिणार्यांमध्ये नशेकरिता मद्याची मात्रा वाढवावी लागत नाही.

      पहा आपल्या राज्यात कीती दारु रिचवली जाते.राज्याला दारूतून आठ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते तर ३० हजार कोटी रुपयांच्या दारूचा खप राज्यात होतो.म्हणूनच महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र झाले आहे.महाराष्ट्रात मद्याला मोठी मागणी आहे आणि ती वाढत असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात मद्याची निर्मीतीही होत आहे.विदेशी दारू आणि देशी दारू या सर्व प्रकारांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी आठ टक्क्यांनी वाढली आहे.महाराष्ट्राची लोकसंख्या १० कोटी धरली तरी दरडोई दरमहा अर्धा लिटरपेक्षा जास्त दारू विकली गेली आहे.काही गावात प्यायला पाणी मिळत नाही पण तेथे दारु मुबलक मिळते.'दारूबंदी' की 'दारूवृद्धी' यापैकी शासनाचे धोरण काय आहे हा प्रश्न उभा राहतो.आतातरी महाराष्ट्राच्या राज्यशासनाने धान्यापासून मद्य बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

        फक्त ठाणे जिल्हात गेल्या वर्षभरात ठाणेकरांनी तब्बल १५० कोटी रुपयांचे मद्य रिचवल्याची माहिती हाती आली आहे.गेल्या वर्षात ठाणे महापालिकेने मद्यावरील जकातीमधून १० कोटी ३५ लाख रुपयांची कमाई केली आहे.




     दारूबंदी आणि दारूमुक्तीच्या लढ्यात राज्य सरकारची मदत मिळेल,अशी अपेक्षा ठेवणेच चूक आहे.दारुमुळे मिळणारे उत्पन्न राज्य सरकार सोडण्यास तयार नाही.यासाठी दारूमुक्तीची चळवळ चालवावी लागेल.चळवळीत मद्यक्रांतीची शक्तिपीठे उद्ध्वस्त करण्याची ताकद कशी आणायची,हाच मोठा प्रश्न आहे.दारूबंदी करण्याचा अधिकार देण्याचा फक्त प्रस्ताव आला.

      तरुणाई दारुच्या नशेत जात आहेत.दारुपासून युवकांना रोखण्याची गरज आहे.वेगवेगळ्या पार्ट्यामघून दारु संपली जाते.रेव्हपार्ट्यामघून नुकतेच वयात आलेले तरुण दारु पित आहे.तरुण पिढी व्यसनाकडे आकृष्ट होत असल्याने केंद व  राज्य सरकारांनी दारूबंदी लागू करण्याच्या प्रस्तावावर गांभिर्याने विचार करावा.रोज मद्य घेण्याची सवय लागणे प्रकृतीला घातक ठरू शकते.

       गुजरातमघ्ये दारूबंदी आहे.मग आपल्या राज्यात का नाही?

       'मद्यमुक्त महाराष्ट्र' या क्रांतीची सुरुवात करावी.

No comments: