Saturday, January 12, 2013

मुके मित्र



         रेल्वेच्या प्लाँटफाँर्मवर गाडीची वाट पाहत उभा होतो.बाजुला गर्दी होती.थोडया अतंरावर दोन मुलं हातवारे करीत उभी होती.बहुतेक शाळकरी पण शाळेच्या गणवेशात नसलेली एक मुलगी व एक मुलगा मूकबधीर असल्याने हातवारे करीत  बोलत होती.एकमेकांची भाषा (हातवारे) समजत असल्याने या मूकबधीरांनी एकमेकांशी दिलखुलास संवाद साधला होता.प्लाँटफाँर्मवरची इतर माणसे त्याच्या पाहत होती.आपल्याकडे बाजुला उभी असलेली माणसे आपल्याकडे पाहत आहेत याकडे त्याचे लक्ष नव्हते.हा हाताचा संवाद पाहाणा-याना वेगेळचा खेळ दिसत होता.बहिऱ्या-मुक्यांची भाषा हावभाव व देहबोलीतून व्यक्त होते.      
               
              काही वेळ गाडी नसल्याने या दोघांच्या हातवा-याकडे इतर प्रवाशी पाहत होते.मुलगा तिला काहीतरी  सांगत होता.मुलगी   ऐकत होती.दोघे मघ्येच हसत खिदळत होती. त्याचे हातवारे लोक कुतुहालाने पाहत होते शब्द येत नाही म्हणुन त्यानी हातवारे व देहबोलीने संभाषण सुरु ठेवले होते. त्याना आपल्यासारखे बोलता येत नाही म्हणुन वाईट वाटत होते.पण ही मंडळी बोलता येत नाही शांत बसलेली नाहीत.हातवारे करीत आपला संवाद करीत होते. पण त्याना ह्या कमी पणाचे काय वाटत असेल?काय माहीत.

          काय झाले माहीत नाही पण बोलता बोलता ती दोघे शांत झाली.हातवारे कमी झाले.लोकाना आश्चर्य वाटले. थोड्यावेळाने त्याने हातवारे करीत तीला समजावण्याचा प्रयत्न सुरु केला.गयावया करीत असलेला वाटला.ती शांत होती.संवाद कोणत्या विषयाचा होता ते फक्त त्या दोघानांच माहीत.बहुतेक ती रागावली होती आणि तो तीला मनवत होता.काही क्षण दोघेही शांत राहीली.



                         मुक्यांची भाषा त्यांची दुर्मिळ अवघी शब्दांनाही जी ना कळे..
                        चेहर्‍यावरती हसरे भाव.. उसंत नाही हातांना..
                        हृदयामधली शब्द-संपदा कळली होती बोटांना..
                        नजरे मधूनी सांधत होती संवादाचा सेतू जणू..
                       अबोल वाणी वदते - हसते.. या सार्‍याला काय म्हणू..
                        मला त्या क्षणी इतुके कळले.. कशास शब्दांची चाकरी..

                              काही वेळ गाडी आलीच नाही.मी त्या दोघांकडे पाहत उभा होतो.त्याचे हातवारे करीत तिला समजवण्य़ाचे प्रयत्न सुरु होते.पण ती अबोल होती.तो रडवेला झाला होता.आपण बोलणारे शब्दात आपली मते मांडु शकतो.ही मुक़ी मडंळी कशी मते मांडत असणार व तसेच समोरच्या कसे कळत असेल.यासाठीच मुक्यांची भाषा विकसीत झाली आहे.त्याचे हातवारे जोरात सुरु झाले जसे काय आपण मोठ्याने बोलत तसे.
 
                      गाडी येताना दिसत होती.प्रवाशांची लगबग सुरु झाली.आता काय होणार याकडे माझे लक्ष होते.त्याने तिचा हात हातात घेत दयायाचना सुरु केल्या होत्या.गाडी जवळ येत असलेले पाहुन तो बिथरला होता.त्याला काय करायचे कळत नव्ह्ते.इतक्यात गाडी येऊन थांबली.महिलांच्या डब्यात त चढली व गर्दी असल्याने दारातच उभी राहीली. त्याच्या कडे ती पाह्त नव्हती.



                         मला त्या गाडीने जायाचे नसल्याने मी  ती गाडी सोडली.गाडी सुटली.तो गाडी बरोबर धावू लागला.गाडीच्या वेगाबरोबर त्यानेही धावण्याचा वेग वाढवला.मला  वाटले जर तिने याला काही सांगितले नाही तर जीव देईल अशी भिती वाटली.

                              गाडीच्या वेगाबरोबर तो धावत होता.त्याचे तिच्याकडे काहीतरी मागणे होते.सगळे प्रवाशी त्याच्याकडे पाहत होते. ती धाबरलेली दिसत होती.धावता धावता दमल्याने तो पाठामागे पडत होता.तिला काय वाटले माहीत नाही पण तिने त्याच्याकडे पाहून जोरात हातवारे केले.तो तिच्या ह्याच पाठींब्याची वाट पाहत होता.तिने हातवारे केलेले पाहिल्यावर तो आनंदाने नाचु लगला.त्यांचे हे मुके नाटक पाहणा-यानाही आनंद झाला.पाहणा-याना काय संवाद होता ते कळले नाही.पण त्याचा आनंदात सामिल झाले.तो मुलगा पटकन तेथून धावत धावत स्टेशनच्या बाहेर निधून गेला.   

                              प्रत्येक प्राणी वेगेवेगळ्या प्रकारे संवाद करीत असतो.मनुष्यप्राण्याला संवाद साधण्यासाठी शब्द दिले आहेत.त्याला बोलता येते.पण ज्याला बोलता येत नाही त्याला हातवारे करीत संवाद साधण्याची कला अवगत करावी लागते.या  संवादात एक फायदा असतो आपले बोलणे दुस-याला कळत नाही.त्या दोघात बोलणे सुरु असते.तेव्हा दुसरे त्याना पाहत असतात.

                           प्रत्येक प्राणी वेगेवेगळ्या प्रकारे संवाद करीत असतो.मनुष्यप्राण्याला संवाद साधण्यासाठी शब्द दिले आहेत.त्याला  बोलता येते.पण ज्याला बोलता येत नाही त्याला हातवारे करीत संवाद साधण्याची कला अवगत करावी लागते.या संवादात एक फायदा असतो आपले बोलणे दुस-याला कळत नाही.त्या दोघात बोलणे सुरु असते.तेव्हा दुसरे त्याना पाहत असतात.
  
                            मुक्यानी बोललेले  समजणे कीती कठीण असते ते आज कळले.  
                                
                            
                 



          

No comments: