मी एका जवळच्या नात्यातल्या जोडप्याला भेटलो.दोघांचे वय वर्षे सत्तरीच्या घरात.आताची आर्थिक परीस्थिती व्यवस्थित.आपल्या कुटुंबात मौजमजा करीत उरलेले आयुष्य मजेत उपभोगत आहेत.चार मुलींची लग्ने होऊन नातवंडे आहेत.सगळ्यांशी संबध चागंले आहेत.
गांवी शिक्षण घेवून ते सचिवालयात नोकरी करीत होते.नोकरीला वीस वर्षे पूर्ण झाल्यानतंर कायद्याचा अभ्यास केला आणि नोकरी सोडली.कोर्टात गेली तीस वर्षे काम करीत आहेत.कामसू,कोणाला त्रास न देता कायम मदत करणारे प्रसन्न व हसरे व्यक्तिमत्व.बोलायला खूप आवडते.ते 'पप्पा 'म्हणुन कुटुंबात सर्वांचे आवडते आहेत.
स्पष्टवक्त्या,मदतीला धावणा-या,चवीष्ट पदार्थ बनविणा-या,कायम हसतमुख असलेल्या व कुटुंबाची काळजी घेणा-या त्या सर्वांच्या जवळच्या आहेत.लग्नानतंर कुटुंबासाठी लहान मोठे व्यवसाय केले.केलेली कष्टे त्या विसरल्या नाहीत.गप्पात विषय निघाल्यास त्यावेळच्या पारीस्थितीची जाणीव करुन देतात.त्याच्या आयुष्यात काही अपघातातील आजारपणाना त्याना सामोरे जावे लागले.खंबीरपणे त्यानी सर्व संकाटाना तोंड दिल्याने त्या कुटुंबाच्या 'आई 'आहेत.
दोघांचे एकमेकावर अतोनात प्रेम. दोघानी कुटुंबासाठी खुप हाल अपेष्टा सहन केल्या आहेत.खुप कष्ट केले आहे.दोघांचे एक स्वप्न होते.गावात जागा घेऊन एक बंगला बांधायचा.त्यासाठी त्यानी खुप मेहनत घेतली.कामातून वेळ काढीत गावाला जात वर्षभरात ती वास्तू बांधून दोघानी आपले स्वप्न साकार केले. त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याने सर्वाना आनंद झाला.नारळी फोफळीत ती वास्तू लपलेली असते.आजुबाजुला वेगवेगळ्या फळ व फुलांची झाडे लावून वास्तुचे सौंदर्य वाढविले आहे.मित्र व नातेवाईकांना तेथे नेउन त्यांचा पाहुणचार करण्यात त्या दोघाना आनंद वाटतो.
आयुष्यभर झगडणा-या त्या दोघांचे मजा करीत चांगले दिवस चालेले होते.पण काही दिवसापूर्वी त्या पडल्या. तेव्हापासून त्या आजारी झाल्या.काय झाले माहीत नाही पण इस्पितल व घर अशा फे-या वाढल्या.गावाला जायला मिळत नसल्याने त्याना जास्त होत होता.पायाचे दुखणे व नतंर पोटाचे वाढत गेले.आता त्या खुपच आजारी आहेत. हिमोग्लोबीन व प्लेटलेट्स कमी होत राहीले आहे.शेवटी त्याना रक्ताचा कँन्सर असल्याचे निदान झाले .काही दिवसाच्या सोबती असल्याचे डाँक्टरनी कळविले आहे. हे कळल्यानतंर आम्हा सर्वांवर मोठे सक़ंट आले आहे.त्याना आम्ही भेटत आहोत.
आईना झालेल्या आजाराची पप्पाना माहीती आहे.पण आईना हे सांगितलेले नाही.भेटण्यास गेल्यावर आम्ही नेहेमीप्रमाणे त्याच्या आजाराची चौकशी करत असतो.जीवनभर साथ दिलेल्या पत्नीची सोबत काही दिवसांची आहे हे सहन करणे त्याना त्रासाचे आहे.पण आईसमोर आपले दु:ख न दाखवता हसत खेळत तीची थट्टामस्करी करीत घरातले वातावरण प्रसन्न ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.आतून रडत असतात पण चेह-यावर ते हसत असतात.कसल्या मनस्थितीतून जात आहेत.पप्पाना पाहिल्यावर खुप वाईट वाटते.पण आलेल्या सकंटाला त्यानी खंबीरपणे सामोरे जाण्य़ाची तयारी केली आहे.शेवटच्या दिवसात या आजाराच्या भयानक वेदना मला पाहावयास लावू नकोस अशी ते देवाकडे प्रार्थना करीत आहेत.चित्रपटातून पाहतो तसेच प्रसंग आपल्या समोर घडत आहेत.त्या दोघाना पाहताना मोठे दु:ख होत आहे. काही दिवसात या आजारातून मी बरी होईन असे त्याना वाटत आहे.बरे झाल्यावर आपण काय काय करु याची आखणी त्या करीत असतात.दोघेही असामान्य आहेत याची प्रचिती येते.
त्याचा आजार दिवसादिवसाने वाढत आहे.आईना प्रसन्न ठेवण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो.त्यानी चारीही मुलींना स्वंतत्रपणे बोलावून 'मला कोणता आजार झाला आहे' याची शहानिशा केली.आजार कळल्यावर ती कोसळेल या भितीने मुलीनी त्यांना त्यांच्या आजाराबद्द्ल कोणतीच माहीती दिली नाही.त्या तिच्या इच्छा पूर्ण करण्य़ाचा प्रयत्नात आहेत.
आईंची खूप दिवसाची गावाला जाण्य़ाची इच्छा होती.तीची इच्छा पूर्ण करण्य़ासाठी आईना डाँक्टरांच्या संमतीने गावाला नेऊन आणले.पप्पा आईंची अथक सेवा करीत असतानाच परवा आईंचे निधन झाले.पप्पानी आलेल्या संकटाने कोलमडुन न जाता संकटाला सामोरे गेले.खंबीर दिसले.पप्पांचे आईंवर खुप प्रेम होते.त्यानी आईना शेवटच्या काळात फुलासारखे जपले.प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी महत्वाचा होता.हे त्यानी दुस-याला कळून दिले नाही.आपल्या प्रिय व्यक्तीचे मरण पाहावे लागले यासारखी वाईट घटना त्यांच्या आयुष्यात घडली.
शेवटपर्यत आईना खुष ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला सलाम.
No comments:
Post a Comment