Friday, May 24, 2013

पोटासाठी


जगण्यासाठी पोट भरणे व पोट भरण्यासाठी काम करणे हे ओघानेच आले.काम करण्यासाठीच पोट दिलेले असल्यामुळे पोटासाठी कार्य करीत राहणे हेच निसर्गाच्या त्रिकालाबाधीत नियमाशी सुसंगतच आहे. जन्माला आलेला प्रत्येक माणूस पोट भरण्यासाठीच काहीतरी काम करीतच असतो. निसर्गनियमाला अनुसरून जे आपला व्यवसाय आवडीने प्रामाणिकपणे व आत्मियतेने करतात त्यांच्यावर निसर्ग देवतेची कृपा होऊन ते जीवनात यशस्वी होतात. निरनिराळ्या प्रकृतीचे किंवा आवडीचे लोक पोट भरण्यासाठी निरनिराळी कामे करीत असतात

अंधत्वावर मात करून रेल्वेच्या डब्यांत फेरीवाल्याचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करावा लागतो.काहीजणांवर पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:च्या मुलांना पैशासाठी विकावे लागत आहे.लोकांच्या कच-यावर जगणारी माणसे आहेत.तर काही जण काहीही न करता भिक मागत आपला उदारनिर्वाह करीत आहेत.पण ह्याच्यातील काही गरीब मंडळी भिक न मागता छोटे छोटे व्यवसाय करीत जगत आहेत व कुंटुबाला जगवीत आहेत.  



अशाच एका विशिष्ट गरीब माणसाची भेट उजैन येथील " महाकालेश्वर" मंदीर परीसरात झाली.तो मुस्लिम असून देखिल हिंदू दैव्यत महाकालेश्वराचे फोटो विकत फिरत होता.त्याला त्याच्या गरीबीने हे काम करावयास लावले.प्रथम मला वाईट वाटले.पण नतंर त्याच्या या घाडसी कामाने त्याचे कौतुक वाटले. तो इतरांसारखा भिक मागू शकला असता.मंदीर परिसरात खुप भिकारी भिक मागत होते.जगण्यासाठी भिक मागणे हा सोपा व बिन खर्चाचा उपाय आहे.यासाठीच गरीब भिक मागणे हा मार्ग सोईस्कररित्या स्विकारतात. पण त्यांच्यात आणि याच्यात फरक होता फ्क्त "भिक न मागण्याचा". तो फक्त फोटो विकत होता.पण आपल्याला ते फोटो हिंदू देवाचे असल्याने वेगळेपण जाणवत होते.या व्यवसायाने त्याला पोटासाठी कोणाकडे करुणेचा हात न फसरवता मानाने जगणे शिकवले होते.

आपला व्यवसाय आवडीने,प्रामाणिकपणे व आत्मियतेने केल्यास तो आपल्या जीवनात यशस्वी होतो याची  प्रचिती  मला त्याला पाहिल्यावर आली.मी त्याच्या कडून फोटो खरेदी केला व माझ्या मित्राना देखील त्याच्याकडून फोटो घेण्यास सांगितले.आमच्या निर्दशनात आलेले त्याचे वेगळेपण त्याला आम्ही दाखवून दिले नाही.

No comments: