Sunday, July 26, 2020

परीक्षा व निकाल

  • परीक्षा व निकाल 
  •  
  • प्रथम परिक्षा व नंतर निकाल.प्रत्येक परिक्षेला निकाल असतोच.परीक्षेपेक्षा निकाल महत्वाचा असतो. या निकालाने त्या विद्यार्थ्याचे भवितव्य ठरत असते. निकाल काय लागेल याचा ताण विद्यार्थ्याच्या मनावर सतत असतो.हा निकाल इतरांसाठी अभिनंदन करण्यासाठी किंवा नापास झाल्यास सहानुभूती दाखवण्यासाठी फक्त असतो. परिक्षेचा निकाल त्या विद्यार्थ्यी, त्याचे पालक व त्याच्या घरासाठी अत्यंत महत्वाचा असतो. पुढची वाटचाल ठरवणारा व दिशा दाखवणारा हा निकाल आयुष्यात मोठा बदल देखील घडवणारा ठरतो.निकालानंतर काही विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होताना दिसतात तर काहीनी आकाशाला गवसणी घातलेली दिसते. हा निकाल विद्यार्थ्याला कोठे घेऊन जाईल ते त्यावेळी त्या विद्यार्थ्यालाही माहित नसते.या निकालानंतर काहींना पूरस्कार व बक्षीसं मिळतात.मुलाखती होतात.काहींना चांगल्या कॉलेजमध्ये दाखल होण्याची संधी मिळते. तर काही निकालानंतर जग सोडून जातात. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीनुसार त्याचा निकाल लागत असतो. निकालापेक्षा विद्यार्थ्यांनी त्यांच्या कर्तुत्वाला महत्व दिले पाहिजे व कर्तुत्वावर विश्वास ठेवले पाहिजे.       

  • विद्यार्थ्यांना निकालाचे महत्व निकाल लागल्यानंतरच खरं कळतं.विद्यार्थीदशेत असताना विद्यार्थ्यी निकालाबद्दल विचार करीत नाही,ही मोठी चुक करतो. ज्या विद्यार्थ्यांला निकालाचे महत्व अगोदरच कळतं तो त्या दिशेने तयारी करीत योग्य निकाल आपल्या खिशात घालत असतो.

  • लाखो विद्यार्थी व पालक परीक्षेच्या निकालाच्या तारखेकडे लक्ष लावून असतात.वर्षभर अभ्यास करुन दिलेल्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्याची प्रगती कळते. अभ्यास मनापासून करणारे विद्यार्थी परिक्षेत पास होतात आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारे विद्यार्थी परिक्षेत अयशस्वी होतात.परिक्षेच्या काळातच अभ्यास न करता वर्षभर नियमित अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांची प्रगती दिसते. विद्यार्थ्यांना जीवनातील विशिष्ट ध्येय गाठण्यास परिक्षा द्याव्याच लागतात. परीक्षेत मिळालेले उत्तम यशच विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यात कारणीभूत ठरते.

  • परीक्षा म्हटलं की थोडी भीती वाटणे व ताण येणे स्वाभाविक आहे. परंतु वेळेचे व्यवस्थापन, नियोजनबद्ध अभ्यास व तब्येतीची काळजी घेऊन आत्मविश्वासाने विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातात. शैक्षणिक करियरमध्ये यश मिळवायचं असेल तर आपण ज्या परीक्षा देतो त्यामध्ये चांगले गुण मिळवणे आणि अव्वल दर्जाने उत्तीर्ण होणे गरजेचे असते. अर्थातच, अव्वल येण्यासाठी अभ्यास करणं, तो लक्षात ठेवणं आणि परीक्षेत तो नीटपणे मांडणं तितेकचं महत्वाचं असतं. हे ज्या विद्यार्थ्याला जमलं तो कायम यशस्वी होत जातो.

  • आपल्याला जर सुखी जीवन जगायचे असेल तर परीक्षेत प्राविण्य मिळविणे गरजेचे आहे.शिक्षणाद्वारे समाजात नावलौकिक, आदरसन्मान मिळून जीवनात समाधान मिळते.परीक्षा आणि परीक्षांच्या निकालाच्या काळात घडणार्‍या आत्महत्या आणि नैराश्य यांना हद्दपार करण्यासाठीच परिक्षांना आपल्या जीवनातील एक सण-उत्सव समजावे.

  • आयुष्यभर माणसाला परिक्षा देत राहावे लागते.निकालाची वाट पाहत असतानाच दुस-या परिक्षेची तयारी करत जीवन जगावे लागते.

No comments: