Thursday, August 27, 2020

सगळे काही ऑनलाईन

                                          सगळे काही ऑनलाईन 


हल्ली लहान मुलांपासून देशाची कामे सर्व काही ऑनलाईन सुरु आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत आपण ब-याच गोष्टी ऑनलाईन करण्यास सुरुवात केली आहे.हे ऑनलाईन प्रकार आपण कधी आत्मसात केले ते कोणाला कळले नाही. जो तो सगळं काही ऑनलाईन करण्यासाठी धडपडत आहे. ऑनलाईन व्यवहार सर्वांना सोयीचे वाटू लागले, हा ऑनलाईन फायदा झाला. पण ऑनलाईनमध्ये फसवणूक सुरु झाल्याने लोकांचे पैसे लुबाडले गेल्याने ’ऑनलाईन’ गैरसोयीचे ठरले.ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात  वाढ होतेय.वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवून ऑनलाईन फसवणूक होत आहे. नोकरदारवर्ग वेतन त्यांच्या खात्यात जमा झाल्याने तो वर्ग खुष झाले.  

सुरुवातीला बॅकेचे सगळे व्यवहार ऑनलाईन सुरु झाले. लोकांच्या व बॅकेसाठी खूपच सोयीचे झाले. पहिल्यांदा व्यवहार ऑनलाईन करायला ग्राहक घाबरत होते.नंतर सोपे व सोयीचे वाटू लागले.घरातू सगळी बीलं वेळेत भरली जाऊ लागली. शेअर मार्केटचे सर्व व्यवहार ऑनलाईन होतात. प्राप्तीकर भरण्यासाठी व्यवहारांची माहिती ऑनलाईन पडताळून पाहणे करदात्यांना सुलभ झाले.विमा पॉलिसी खरेदी किंवा नूतनीकरण करता येत आहेत. 

देशाच्या कितीतरी गोष्टी ऑनलाईन सुरु झाल्या आहेत. सगळ्या मंत्र्याच्या सर्व मिटिंग ऑनलाईन झाल्याने नेत्यांचा वेळ व त्रास कमी झाला. देशाचा पैसा वाचला. कितीतरी उदघाटन लोकांनी ऑनलाईन घरात बसून पाहिले. सरकार शेतक-यांच्या खात्यात  पैसा जमा करु शकले. निवडणुकातील उमेदवार उमेदवारीचा अर्ज ऑनलाईन भरु लागला. 'आपले सरकार' या वेब पोर्टलच्या माध्यमातून जनतेला तक्रारी आणि अभिप्रायासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. 

अमेझॉन व फ्लिपकार्ड ह्यांच्याकडून काही गोष्टी ऑनलाईन खरेदी करु शकत होतो.आता तर बिल्डिंग खालचा वाणी देखील ऑनलाईन वस्तू  पाठवू लागला. भाजीवाला, मच्छीवाला, केकवाला व हॉटेलवाला ऑनलाईन ऑर्डर घेऊन वस्तू घरी पाठवू लागले आहेत.लोकांना बाहेर न पडता सर्व गोष्टी दारावर येऊ लागल्या.ऑनलाईन खरेदी करताना या काही गोष्टी लक्षात ठेऊन खरेदी केल्यास घरबसल्या खरेदी करण्याचा आनंद आपण लुटू शकतो.

शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण संस्थेसाठी ऑनलाईन प्रवेश,ऑनलाईन क्लासेस व ऑनलाईन परिक्षा व निकाल सर्व काही ऑनलाईन सुरु झाले आहे.विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण केले आहे. पासपोर्ट व व्हिसा ऑनलाईन मिळू लागले.

आजारपणात डॉक्टर देखील फोनवर किंवा व्हिडीयो कॉलवर रोग्याची माहीती घेऊन त्याला औषध देऊन बरा करीत होते.फार्मसीमधून औषधं ऑनलाईन मागवली की घराच्या दारात औषधं येऊ लागली. 

तरुणांना ऑनलाईन नोंदणी करून नौक-या मिळू लागल्या. ऑनलाईन लग्न जमू लागली.उंबरठे झिजवायची व शोधाशोधा करण्याची गरज नाही. लोकांना वृतपत्र ऑनलाईन वाचण्य़ाची सवय लागली. वाहतुक पोलीस वाहक चालकांच्या चुकांवर ऑनलाईन दंड भरण्याची शिक्षा करू लागला.एसटी पासून विमानापर्यत सर्व तिकिटं ऑनलाईन उपलब्ध झाली. पर्यटनातल्या सर्व गोष्टीच ऑनलाईन बुकिंग करु शकलो.  जूने चित्रपट,नाटकं व जूने क्रिकेट किंवा इतर खेळांचे सामने ऑनलाईन पाहू शकतो.रम्मीचा खेळ ऑनलाईन खेळून कर्जबाजारी झाले आहेत.राज्यात ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. 

गणेशविसर्जन करण्यासाठी ऑनलाईन तारीख, वेळ बुकिंग करावी लागणार. देवाला घरी आणण्यापासून देवाचे विसर्जनासाठी ऑनलाईन करावी लागत आही.देवदेवतांचे दर्शन व आरत्या रोज ऑनलाईन पाहू शकतो.प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही.घरात बसून देशातील मोठ्या देवस्थानाचे दर्शन घेऊन देवाला देणगी देखील ऑनलाईन भरू शकता.गणपतीला गावाला जाण्यासाठी मुंबईकरांना ई-पास ऑनलाईन काढावा लागत आहे. 

सगळ्यात वाईट शेवटी माणसाचं अंत्यविधी देखील लोकांना ऑनलाईन पहावे लागले.सगळ्यात वाईट गोष्ट घडली. 

अशाप्रकारे ब-याच गोष्टी ऑनलाईन करता येऊ लागल्या आहेत.पण जेव्हा निवडणुकीचे मतदान ऑनलाईन होईल तेव्हाच सर्व ऑनलाईन झाले असे मी मानतो.

No comments: