Thursday, July 10, 2008

पदभ्रमण

पदभ्रमण हा माझा सर्वात आवडता छंद आहे.पदभ्रमण ह्या छंदाची सुरुवात १९८६ साली बी.पी.टी.मघल्या स्पोर्टस ल्कबच्या सभासदांबरोबर भिमाशंकर या ट्रेक ने केली होती. तेव्हापासुन आतापर्यत त्याच आवडीने पदभ्रमणाला वेगवेगळ्या ग्रुप बरोबर जात असतो. सह्याद्रीच्या सुंदर कँनव्हासवर म्हणजेच द-या खो-यातुन मनमुराद भटंकती केली.गगनाला भिडणारी बेलांग डोगररांग,चढापासुन सरळ कड्यापर्यत घनदाट जंगले, त्यावर धुक्यात लपलेले सुळ्के,कडयांवरुन कोसळ्णारे असंख्य लहान मोठे धबधबे,उतारावरुन खळखळत घावणा-या नद्या तर कुठे शांत जलाशय असा हा निसर्गाचा खजिना पाहण्यास पदभ्रमण केलेच पाहीजे.डोगंरदरयातुन निसर्ग पाहत मित्रासह फिरण्याची मजा काय और असते. माहुली,पेब,पेठ,चंदेरी ही ठिकाणे मुबंई पासुन जवळ्च रेल्वेने जाता येत असल्याने नेहमीच जात आलो आहे.
कर्नाळा,कोरई गड,राज गड,नाने घाट,हरीशचद्र गड,गोरख गड,रायगड,मुळ्शी घरण परीसर,
तांदुळवाडी,माथेरान परीसर,राजमाची,लोहगड,डुक्स नोज,आजोबा हे ट्रेक वांरवार होतच आहेत.
कालच २७ जुलै,२००८ रोजी खारेगांव या परीसरातील मित्र व माझा मुलगा यांच्याबरोबर वसईच्या जवळचा 'टकमक' ' कील्ला' यावर ट्रेक केला. तीन मुली आमच्या ग्रुपमघ्ये होत्या.पावसाचे दिवस असल्यामुळे सगळीकडे हिरवी छ्टा पसरली होती.किल्ला ढगातुन लपलेला होता.खालुन कील्ल्याची उंचीचा अंदाज लागत नव्हता.वातावरण ट्रेक साठी अनुकुल होते. जगंलातुन पावसाचा मार खात चढाव करीत होतो.कील्ल्यावर ढगातुनच मार्गक्रमण करीत आम्ही स्वारी केली. गडावर पोहचताच पावसाने जोरदार स्वागत केले.गडाची पाहणी केल्यानतंर तेथेच पटकन केळीच्या पानाचा आडोसे घेउन पोट पुजा केली व तसेच खाली उतरण्यास सुरुवात केली. पावसाने आम्हाला चागंलेच झोडपले.थंडीमघ्ये कुडक़ुडी भरली थरथरत होतो.सावघतेने खाली उतरत असताना मघ्येच ढग बाजुला पांगल्याने समोरचा नजारा पाहुन मन खुश झालो.खुप दिवसाने ह ट्रेक केल्यामुळे गुडघे थोडे दुखत होते.पण कोणाला याची कल्पना येउन दिली नाही.य ट्रेकच्या आठवणी घेउन घरी परतलो व पुढच्या ट्रेकची आखणी करुनच.


सिंथन पास व मार्गन पास

१९८६ साली मी माझ्या चार मित्रासह पुण्यातल्या युवाशक्तीने आयोजीत केलेल्या चौदा दिवसाच्या काश्मीरमघल्या सिंथन पास व मार्गन पासच्या ट्रेकला गेलो होतो. एक महीना घराबाहेर होतो पण या दिवसात घरची कधीच आठवण आली नाही येवढी मजा केली होती. दिवसभर संसार पाठीवरच्या सँकमघ्ये घेउन पदभ्रमण करीत वेगवेगळ्या तेरा कँम्पवर रोज रात्री कँम्प फायर करुन थकवा घालवुन तंबुत झोपी जात असायचो. काय ते दिवस आनंदाचे होते.चौदा दिवस आघॉंळ केली नव्हती एवढी थंडी होती.स्वर्गात फिरत आहोत असा भास त्यावेळेला झाला. कीतीही फोटो काढले तरी समाघान होत नव्ह्ते. उभी चढ चढताना दम लागल्यानतंर खुप वेळ विश्नांती घ्यावी लागे. एकामेकाच्या पाठीमागुन रांगेत लिडरच्या संगतीत गाणी म्हणत चढाई करायचो. घनदाट जगंले,बर्फाची पर्वते,खळखळत्या नदीच्या प्रवहासह चालत चालत एकेक कँम्प पार करत पुढे जात रहायचो. आमचा १३००० फुटाच्या उंचीपर्यत पायी प्रवास झाला.या उंचीवरुन आम्ही जग पाहीले आहे. हिमालयात स्वच्छंदी फिरण्याची संघी या ट्रेकमुळे आम्हाला मिळली.पुन्हा असा योग केव्हा येईल हे माहीत नव्हते पण आता तरी आम्ही मनसोक्त मजा केली. अपरीचित संस्क्रुतीची जवळुन ओळख झाली. आयुष्यात ही मडंळी फक्त तीनंदाच आघोंळ करतात.एकदा जन्मल्यावर दुसर्यादालग्नाच्यावेळी व तिसर्यादा मरण पावल्यानतंर अशी माहेती एका या विभागातील सुशिक्षीत व्यक्तीने दिल्याने आम्ही आष्चर्यचकीत झालो. या विभागातले स्त्रीयांचे सौंदर्य पाहण्यासारखे असते असे एकले होते.सुंदरता पाहुन आम्ही थक्क् झालो.पण स्वच्छते बद्दल विचारु नका. ही मडंळी खुपच घाणेरडी असता थंडीमुळे आंघोळच करीत नाहीत. ह्या परीसरात खुपच गरीबी आहे.थंडीमघ्ये बर्फामुळे तर ही मडंळी घर सोडुन खालच्या भागात उतरतात. थंडी व बर्फ ओसरल्या नतंर परत आपल्या घरात परतात.स्त्रियाचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. पण त्या गलिच्छ असतात.कारण आंघोळ प्रकार त्याना माहीत नाही. 'ग्लोशियर' हा बर्फाचा खडक पाहीला.यावरुन चालत जाताना जपुन जावे लागते.या खडकाखालुन पाणी वाह्त असते. हा खडक पुढे जाउन नदीला मिळतो त्यामुळे खुपच जपुन चालावे घसरलो तर वेगाने वाहणार्या नदित पडु शकतो. वाटेने चालताना मेंढ्या,शेळ्या,घोडे व खेचरे सोबतील असतात.



सौरकुंडी पास ट्रक
मघल्या काळात महाराष्ट्रात खुप पद्भ्रमण केले. २००६ सालातल्या मे महीन्यात युथ होस्टेल ने कुलु-मनालीच्या दर्या खोर्यात पद्र्भ्रमण आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी माझ्या मुलासह भाग घेण्यासाठी नांव नोंदंणी केली.आमच्या बरोबर माझ्या दोन मित्राने भाग घेण्याचे ठरवुन पैसे भरले. हिमाचलमघ्ये हुंदडायला मिळणार म्हणुन मला व सोबतीला मुलगा असल्यामुळे आनंद झाला.माझ्या मुलाला खुप लवकर लहान वयातच ही संघी मिळाली होती. दहावीची परीक्षा दिल्याबरोबर तो तयारीला लागला. त्याने साहीत्य जमा करण्यास सुरुवात व चाढण्याचा व उतरण्यास सराव म्हणुन छोटे ट्रेक केले. चोघे जण सर्व साहीत्य घेउन बबेली या बेस क़ँप्मला पोहचलो. कँम्प चागल्या लोकेशन टेंट लावुन वसविला होता. थंडीतही आमचे वाँर्म वेलकम केले. उंच उंच बर्फाचे पर्वत व घनदाट जगंले आणि खळखळत घावणारी नदी पाहुन तब्तेत खुष झाली. दोन दिवस वातावरणाची सवय होण्यासाठी आम्हाला बेस कँम्पवरच व्यायाम व एक छोटा ट्रेक साठी ठेवुन घेतले. प्रसन्न वातावरणात ताजेतवाने राहुन थकवा येत नाही. रोज रात्री कँम्प फायरला तर जुगलबंदि असायची पण दहा वाजत्ता सर्वानी झोपले पाहीज अशी त्याचा आग्रह असायचा.आमच्या बँच मघ्ये गुजरात,पुणे,आंघ्र,ओरीसा,बँगलोर मघले ट्रेकर होते.पण कँम्प फायरलासर्वजण एकत्र होउन दुसर्या बँचवर तुटुन पडायचो.
उत्साहात व टाळ्याच्या गजरात व कँम्पवरील लिडरांचे निरोप व सदिच्छा घेउन आम्ही ट्रेकची सुरुवात केली. पहील्याच दिवशी लिडर असुन देखील आमच्यातले काही जण रस्ता चुकले व त्यामुळे आमचा खुप वेळ वाया गेला. छोटया गावात थांबुन जेवलो व उन्हातुन पुढ्चा रस्ता धरला. सेगली हा कँम्प डोंगर उतारावर होता.सफरचंदाच्या बागेतच तंबुत आमचे वास्तव्य होते.पुढचा ट्रेक खुपसा उभा चढायचा होता.आज सकाळपासुनच उन्हे असल्यामुळे खुप त्रास झाला. दुपारी जगंलातच मागच्या कँम्पमघुन घेतलेला टिफीन खाल्ला.पावसाचे ढग जमु लागल्यामुळे बँचला पटापट चालण्याची सुचन देण्यात आली.दाट जंगलात मोठया मोठयाझाडांच्या बुदयातच हा कँम्प बसवला होता. पावसाने सुरुवात केली. आम्ही लगेच तंबुत घुसलो.थंडी वाढली.वीजा चमकुलागल्या.गडगडाट जोरात होउ लागला.आपल्या जवळ्च हा आवाज होत आहे असे वाटायचे व आवजही मोठा असायचा.असे वादळ पाहुन भिती वाटली.पावसाने जोर घरला.आम्ही स्लिपींग बँगमघ्ये घुसलो. हा 'होरा थँच ' कँम्प मोठमोठ्या झाडांखाली मोकळया जागेत स्थापला होता. दुसर्या दिवशी पहाटे पाउस ओसरुन चांगला सुर्यप्रकाश पडला होता. आजच्या दिवसाचा ट्रेक सपुंर्ण कडक सुर्यप्रकाशात झाला.त्यामुळे उन्हाचा लागलाच त्रास झाला.आम्ही उंचीवर असल्यामुळे उन जास्त लागत होते. आज पहील्यांदाच बर्फाच्या जवळ आलो होतो.निसर्गातला बर्फ प्रथमच हाताळला.सर्वजणानी एकमेंकावर बर्फ उडवुन मजा केली. आजुबाजुला उंच उंच पर्वताने बर्फाचे पाघंरुन घेतेलेले दिसत होते.मघ्ये थोडा आराम करुन लवकरच 'मैली थँच'याकँम्प वर पोहचलो.कँम्पचे लोकोशन सुदंर होते. हा कँम्प १०००० फुटांच्या उंचीवर वसलेले आहे.डोगंराच्या उतारावर तंबु टाकले होते.प्रार्तविघी साठी खुप लांबवर जावे लागत होते.छोटासा ट्रेक करावा लागयचा. या ट्रेक मघली ही सघ्यांकाळ आठवणीत राहण्यासारखी आहे.प्रसन्न वातवराणात सर्व थकवा दुर झाला.आकाश स्वच्छ असल्यामुळे सुर्यास्त पाहण्यास मिळाला. सर्वजण खुशीत व मजेत वाटले.आजचा कँम्प फायर मस्त झाला सर्वानी घमाल केली. दुसर्या दिवशी पहाटे उठुन निघण्याच्या तयारीला लागलो.तेवढयात बाजुच्या तंबुतुन घाप लागलेल्या माणंसाचा आवाज येऊ लागला.आम्हाला वाटले कोणीतरी थकल्यामुळे आवाज येत असेल म्हणुन आम्ही प्रथम र्दुलक्ष केले.पण आवाज वाढत गेल्याने आम्ही चौकशी केली. काल रात्री पुढच्या कँम्पचेलिडर श्रीयुत. आजारी पडल्यामुळे त्याना आमच्या कँम्पवर उचलुन आणण्यात आले होते.त्यांचा आजार वाढला होता.आम्ही त्याना तंबुतुन बाहेर काढले. त्याचा खुपच दमा वाढला. आम्ही घाबरलो व आमच्या बँच मघल्या डाँक्टराना बोलावुन आणले. त्यांनी चेक करुन त्याना काही गॉळ्याची ताबडतोब गरज असल्याचे सागितले.त्याची प्रक्रुती खालावलेली होती.कँम्प लिडरने बेस कँम्पला संपर्क करुन या तातडीची माहीती दिली. कँम्प वरील वातावरण लगेच बदलले व सर्वजण टेंन्स झाले. सर्वाची धावपळ सुरु झाली.काहीच निर्णय घेता येत नव्हता. त्याची घरघर आता खुपच वाढल्यामुळे आम्ही धाबरलो होतो. सर्वानी उंचलुन त्याना तंबुत नेउन ठेवले.काही वेळात त्याची घरघर मदांवत चालली होती. आमच्या बँचमघले डाँक्टर पुन्हा तंबुत त्याना पाहण्यास आत शिरले आणि तसेच बाहेर आले. शांतपणे त्यांनी कँम्प लिडर 'नो मोअर'असे सर्वाना सागिंतले. तसे सर्वजण स्तब्द व निशब्द झाले. सर्वत्र भयाण शांतता पसरली. त्या थंडीत ह्या घटनेने तर आम्ही पुरते गोठुन गेलो. आम्हाला पुढच्या प्रवासाची भिती वाटली.बेस कँम्पला सर्पक साधुन घटनेची माहीती दिली. आम्ही बेस कँम्पच्या आदेशाची वाट पाह्त होतो. या कँम्प लिडरने कालच्या वादळात स्वत: भिजुन आमच्याअगोदरच्या बँचमधल्या ट्रेकरची व्यवस्थित सोय करुन सर्वाची काळजी घेतली होती. त्या धावपळीत या कँम्पलिडरने स्व:ताच्या तब्तेतीची जराही काळजी घेतली नाही. त्याचा हा असा शेवट झाला होतो. बेस कँम्पच्या आदेशानुसार आमच्या बँचला ह्या कँम्पहुन लवकरात लवकर प्रयाण करण्यास सांगण्यात आले.लगेचच आम्ही या कँम्प लिडरला मानवंदना देउन पुढच्या प्रवासाला ह्या घटनेची भिती मनात ठेवुन निघालो. यांचे मरण आमच्या कायमच्या स्मरणात राहीले.
त्या दिवशी आमचा ट्रेक एकदम शांततेत सुरु होता.मग कँम्प लिडरने आम्हाला समजावले व जोक्स सांगुन टेशन घालविले. ती घटना तशी पटकन विसरता येण्यासारखी नव्हती.आठवणीने भिती वाटत होती. मी माझ्या मुलालाही घेउनआलो होतो म्हणुन मला त्याची जास्त काळजी वाटत होती. अशा घटना पाहुन तो मनातुन बिथरु नये असे वाटत होते. दुपारनतंर आम्ही सकाळ्ची घटना विसरुन आमची गाडी पुन्हा रुळावर येउ लागली. मोठी चढ चढुन आल्यावर एका ठिकाणी आम्ही विश्रांतीसाठी थाबंलो.माझी सँक बाजुला ठेवून मी पाणी पिऊन बाजुला बसलो होतो. एवढयात माझी बँग हळली व सँक सरकुन खाली दरीमघ्ये घरंग़ळत जाऊ लागली.
जवळ नसल्यामुळे तिला कोणीच थोपवू शकला नाही. सँक दगडांवर आपटत आपटत खाली गेली आणि दिसेनाशी झाली.सगळेजण पाहत बसले.बँगमघ्ये कपडे व जरुरीच्या वस्तू होत्या.
मी माझा पुढचा ट्रेक कसा करायचा याचा विचार करीत होतो. त्यादिवशीच्या आमच्या लिडरला आम्ही सर्वानी खाली उतरण्यास सागिंतले . तो तसाच वेळ न घालवता झरझर खाली उतरत
गेला. आम्ही वरुन त्याला सुचना देत होतो.तो वेगात खाली तळाला पोहचला. त्याला तेथे माझी सँक कोठेच दिसत नव्हती. तो इकडे तिकडे शोघताना दिसत होता. आम्ही वरुन ओरडून त्याला आणखी खाली उतण्यास सागत होतो. त्याप्रमाणे तो खाली उतरल्यावर त्याला एकदाची सँक दिसली पण ती अडगळीच्या ठिकाणी जाऊन पडली होती.आम्हाला त्या ठिकाणी पोहचण्यास खूपच कठिण होते पण तो त्या परीसरातीला असल्यामुळे त्याने त्याठिकाणी पोहचून एकदाची त्याने माझी सँक वर काढली . वर चढुन आल्यावर तो खूप दमलेला होता. त्याला सर्वानी पाणी,खाउ दिला व त्याचे आभार मानले. मी त्याला त्याच्या परीश्रामाची किंमत म्हणुन त्याला पैसे दिले. प्रथम त्याने पैसे घेण्यास नाकारले पण सर्वाच्या आग्रहामुळे सकोचित होउन स्विकारले. तेथून त्याची आमच्या बरोबर चांगली मैत्री झाली. पुढे पावसाची चिन्हे दिसू लागल्याने आम्ही भरभर चालत होतो. पाउस पडला नाही. पण पावसाच्या वेळेचे निसर्ग पाहावयास मिळाले. बर्फाच्या ओढयातून (ग्लेशियर) आमचा पहीलाच प्रवास सुरु झाला. आम्ही सावधातेने व सावकाशीने पुढे पुढे सरकत होतो. एकामेकांना साभांळत व लिडरच्या सुचनेचे पाळण करीत वाटचाल सुरु होती. मोठे मोठे पठार दिसू लागले. झाडे कमी दिसत होती.बर्फाचे प्रमाण वाढू लागले. बर्फ उंचावरुन खाली उतरत जात असलेला भास होतो. त्यावरुन चालताना भीती वाटायची.मी व मझा मुलगा पाठोपाट काठीच्या आधारने चालत होतो.येथे चालताना काठीची मदत होते व मोठा आधार मिळतो.ती बर्फात खुपसायची व नतंर आपल्या पायाची हालचाल करायची.
सेगली ७०००
होरा ९०००
मैली १०५००
डोरा ११३००
सौरक़ुंडी पास १२९००
लोंगा १००००
लेखणी ८१००
(बेस कँम्प) बबेली ७०००
या कँप्मवर आम्ही वास्तव्य केले होते.



अपुर्ण आहे.

1 comment:

Prachi Gaikwad said...

superb kaka.....really remembered some part of my Stok Kangri expedition.........too good....
well inspired by u...i have also started blogging...and making my experiences imortal!!!