Thursday, July 3, 2008

मोटर सायकलिंग

सायकलवरुन प्रवास करण्यास खुप वेळ जात असल्याने आम्ही मित्रानी मोटर सायकल खरेदी केल्या.लगेचच आमच्या सफारी सुरु झाल्या. प्रथम घरच्याना गाडीवर प्रवास करण्यास बंदी होती.पण काही छोटया सफारी करुन त्याचा विश्वास संपादन करुन प्रवासाना सुरुवात केली. मुबंई ते ईंदापुर हा प्रवास एकटयाने एका मित्राबरोब व एका दिवसात केल्याने आत्मविश्वास वाढला. वेगळाच आंनद झाला व मजा आली.मोटर सायकलवाल्याचा एक ग्रुप तयार झाला व सहलीचे आयोजन झाले. दिव - दमण हा प्रवास काँलेजच्या मित्राबरोबर तीन दिवसात व तीन गाडयानी मजेत केला. काही दिवसाच्या अंतराने पुर्ण कोकण मोटर सायकलवर पालथा घालण्याचे आम्ही दोघा मित्रानी ठरविले. संजय सावत या मित्राची गाडी नेण्याचे ठरविले. जरुरीच्या वस्तु गाडीच्या सँक मघ्ये टाकुन व घरच्याचा निरोप घेउनप्रवासाला निघालो. पाली,इदांपुर,भिरा,पोलादपुर,महाबळेश्वर,चिपळुण,रत्नागिरी,गणपतीपुळे असा प्रवास झाला.कोकणातला होळीचा सण या प्रवासात पाहायला मिळाला. वेगळ्यावेगळ्या ठीकाणी वस्ती केल्यामुळे खुप जणाची ओळख झाली.आमचे सर्व ठीकाणी उत्साहात स्वागत झाले . यानतंर काही सहलीचे आमत्रंण आले पण इतर अडचणीमुळे मला स्विकारता आले नाही.
या माझ्या छदांत मी खुप मजा केली.मला माझ्या गाडीने नेहमीच साथ दिली.त्यामुळे मला तरुन वयात खुप मस्ती करता आली. प्रत्येकाने स्वताला कोणता तरी छंद लावुन घेतला तरच आयुष्य मिळमिळीत राहणार नाही.

1 comment:

Unknown said...

please write article on our some cycle tour.The rest blog is very interested,keep it up.