मी दुपारच्या वेळेस मुसळधार पावसातून वाहतुक कमी असलेल्या र्निमनुष्य रस्तावरुन पायी चाललो होतो. धो धो पावसात मी स्वत:च्या विचारात घाई घाईत चालत होतो. इतक्यात एक युवती माझ्या छत्रीत पटकन घुसली. अपरीचीत स्त्री अशी अचानक छत्रीत आल्यामुळे मला अवधडल्यासारखे झाले. मी गुपचुप तिच्याकडे पाहीले. पाउस जोरात पडत असल्यामुळे आम्ही दोघे छत्री असून देखील भिजत होतो. सडपातळ, गोरी, निळ्या पंजाबी ड्रेसमघली पंचवीशीतील ती तरुणी माझ्याबरोबर चालत होती हि मला कल्पना वाटत होती. ती जास्त भिजत असल्याने मी स्त्रीदाक्षिणात्य दाखवून तिच्याकडे छत्री झुकवली. तिच्या हालचालीवरुन ती विचारात व धावपळीत असल्यासारखी दिसत होती.पावसाचे पाणी छत्री वरुन खाली तिच्या सोडलेल्या केसावरुन ओघंळत होते.ती अशीच माझ्याबरोबर छत्रीतुन चालत राहावी असे मला का वाटत होते ते कळ्त नव्हते. दोघेही शांतपणे चालत होतो. काहीच पर्याय नसल्यामुळे व तिला वेळेत पोहचण्याची घाई असल्यामुळे बहुतेक तिने अपरीचित माणसाच्या छत्रीत येण्याचे घाडस केले होते. मी तिच्याशी सवांद साधण्याचा प्रयत्न केला. विचारातून बाहेर येत तीने बोलण्यास सुरुवात केली. ती तिची छत्री घरी विसरुन आली होती.ती महिला सुधार समिती सहीत काम करीत होती. पुरुष दारु पिउन महिलांचे कसे हाल करतात याचे वर्णन तिने मला थोडक्यात सागिंतले.महिलांच्या शोकांतिका तिने काही प्रसांगातुन प्रतीत केल्या.तिच्या बोलण्यावरुन तिचा पुरुषांवरचा राग दिसून आला. दारु पिउन नशेत बायकोला शिव्या देतात,मारतात,भाजतात. बायकाना यानी गुलाम केले आहे. याचा परिणाम त्यांच्या लहान मुलांवर होतो. तिचे काही भयानक अनुभव ऐकल्यावर मलाही या दारुडया लोकांचा राग आला. त्याच्या व्यथा व त्यांची घुसमट तीने बारकाईने अनुभवले होते. ती पुढे सांगत राहीली की, अशा कुटुंबाना या व्यथेतून बाहेर काढताना आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. पण पाठपुरावा करुन आम्ही त्याना सुधारतोच. हि कुटुंबे सुधारल्याचे पाहून आम्हाला त्याचा खूप आनंद होतो. या वयात तिने या कामाला वाहून घेतले व हे सामजिक कार्याचे व्रत स्विकारलेले पाहून आश्चर्य वाटले. तिचा या कामात दांडगा आत्मविश्वास वाटला. ती बोलत होती मी ऐकत होतो. महिलांच्या व्यथा व कथा अगदी मनापासून ती सागंत होती. तिने दिवसभराचा तिचा कार्यक्रम बोलता बोलता सांगितला तो ऐकून मी थक्क झालो व मलाही समाजासाठी असेच अथक कार्य करण्याची जाणीव झाली.ती जशी छत्रीत पटकन घुसली तशीच ती पटकन छत्रीतून बाहेर पडली व बाजुच्या इमारतीत शिरली. मी तिच्या पाठमोर्या आक्रुतीकडे थक्क होउन पाह्त उभा राहीलो. पण ती मला छत्रीतल्या सोबतीत खूप काही शिकवून गेली होती.
Friday, September 12, 2008
छ्त्रीतील सोबत
Labels:
वेगळेच विषय
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment