Tuesday, September 9, 2008

डिस्क क्लिनर

माझा संगणक अचानक एकदम धिम्या गतीने काम करु लागला. माझी खूपच पंचाईत झाली. मी माझ्या कुवती प्रमाणे प्रयत्न केले पण काहीच परीणाम झाला नाही. जाणकार मित्राला फोन करुन माझ्या अडचणीवर उपाय सांगण्याची विनंती केली. त्यानी नेट वरुन 'डिस्क क्लिनर' ही प्रणाली डाउनलोड करुन संगणकावर उतरवुन त्याचा वापर नेहमीच केल्यास संगणक व्यवस्थित काम करेल,असे कळविले. सागिंतल्या प्रमाणे मी सर्व गोष्टी केल्याबरोबर माझा संगणक वेगाने काम करु लागला. ह्या प्रणालीत संगणकावरील उपयोगात नसलेल्या फाईल्स् डिलीट केल्याने संगणकाला काम करण्यास जागा उपलब्ध झाल्यामुळे तो जोरात काम करतो. 'डिस्क क्लिनर' अशा प्रणालीचा उपयोग माणसाची मने साफ करण्यास करता आला असता. सगंणकाप्रमाणे माणुसालाही मनातले वाईट व नको असलेले विचार काढून मन साफ करुन ताजेतवाने होता आले असते. अतिरेकी, खुनी, चोरी, विध्वसंक वृत्ती माणसांतून बाहेर काढता येऊ शकेल.
माणसांच्या जीवनात याचा चांगला उपयोग झाला असता. माणसांच्या मनाच्या डिस्कवरील कलुषित विचार दूर केल्यास त्याला चांगल्या विचारांची देवाणघेवाण करता येऊ शकली असते. संगणकाबरोबर नेहमी कामे करताना काही फाईल्स तातर्पुत्या स्वरुपाच्या बनविल्या जातात. त्या काढल्या नाहीतर जागा अडवून बसतात व कामात व्यत्यय आणतात. तसेच आपल्या रोजच्या व्यवहारात काही घटनांमुळे काही वाईट विचार मनात घोळ्त राहतात ते काढले नाही तर त्या तुम्हाला सारख्या त्रास देत राहतात. लहान मुलांची मने कशी स्वच्छ व खेळकर असतात. ती मोठी झाल्यावर चांगल्या व्रुत्तीसह वाईट प्रव्रुत्ती त्याचामघ्ये मनात बळावतात. तसेच नविन संगणक सुरुवातीला वेगात चालतो आणि त्याचा वापर जास्त झाल्यावर तातर्पुत्या फाईल्स वाढल्याने त्रास देण्यास सुरुवात होते. प्रत्येकाने आयुष्यात आपण स्वत:च मघ्ये मघ्ये आपली डिस्क क्लिन करुन घेतल्यास सर्वाची मने साफ राहुन समाजात कोणीच दु:खी होणार नाही. प्रत्येकाने आपल्या मन:पटलाच्या डिस्कवर नेहमीच योग्य डेटा ठेवण्याचा प्रयत्न करावा.

1 comment:

असा हा एक(ची)नाथ ! said...

from where i can download mind cleaning utility ?

ha ha ha !!!

nice one !