मक्याचे कणीस म्हणजे समाजाचे प्रतिक आहे. आपण फक्त कणीस पाहतो पण त्याची रचना पाहील्यास आपल्याला समाजाच्या बाधींलकीची जाणीव नक्कीच होईल. कणीसाच्या दांडयाजवळचे मोठे दाणे म्हणजे बुजुर्ग,जेष्ठ,जाणकार व वयस्कर मडंळी व टोकाचे दाणे म्हणजे नवजात बालके आणि मधले दाणे म्हणजे कुटुंबातील वेगवेगळ्या वयाची नात्यातील मडंळी. अश्या वेगवेगळ्या वंशावळ मिळून गोलाकार एकत्र येउन एक समाज होतो.त्या समाजातील प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी एका वर एक अशी सरंक्षण कवचे निसर्गानेच ठेवलेली आहेत. सर्व दाणे कणसाला घट्ट चिकटून असतात.एखादा जरी दाणा कणसामधून निखळला तर ते कुटुंब व्यथित व विस्कळीत होते. ती जागा दुसर्या दाण्याणे भरता येत नाही व निखळलेल्या दाण्याच्या बाजूचे इतर दाणेही कमकुवत होतात. प्रत्येक माणसाने कुटुंबाला घरुन व सर्व कुटुंबे कणसाप्रमाणे एकत्र राहीले तरच आपण सुरक्षित राहू शकतो. अशा एकजुटीच्या समाजावर कोणत्याही दिशेने होणार्या अतिरेक्याच्या आक्रमणाला हा समाज सामोरे जाण्यास कधीही तयार असतो. मक्याचे कणीस हे सामाजिक बाधिंलकीचे प्रतिक ठरले आहे.
No comments:
Post a Comment