माझ्या लाबंच्या नात्यातील पंचान्नव वय असलेल्या आजीचे निधन झाले. अतंयात्रेची तयारी सुरु झाली होती. वृद्धापकाळयातल्या आजाराने आजीचे निधन झाल्यामुळे जमलेल्या सर्व मडंळीवर दु:खाचे मोठे सावट वाटत नव्हते. आजीचा एक सात वर्षाचा पणतू त्याच्या आईला चिकटून स्तब्ध उभा राहून एक टक आजीकडे पाहत होता. त्याचे आजीवर व आजीचे त्याचावर खूप प्रेम होते. मी त्याला न्याहळत होतो. मात्र त्याच्याकडे त्यावेळेस कोणाचे लक्ष नव्हते. 'आजी आपल्या सर्वाना सोडून देवाघरी गेली आहे .ती आता परत आपल्याला भेटणार नाही' असे त्याला कोणी सांगितल्यामुळे तो शांत झाला होता. तो मनात कोणत्या गोष्टीचा विचार करीत आहे हे काही कळ्त नव्हते. आजीला हार घालण्यास नातेवाईकानी सुरुवात केली. माझे लक्ष पुन्हा त्याच्याकडे गेले तेव्हा त्याच्या हातात एक हार होता. हा सर्व प्रकार त्याला नविन होता. सर्वानी हार फुले अर्पण करुन व नमस्कार करुन आजीचे शेवटचे दर्शन घेतले. पणतूला त्याच्या आईने आजीला हार घालण्यास सांगितले. त्याने प्रथम आपल्या आईकडे पाहीले व शांतपणे आजीला हार घातला आणि मोठयाने रडायला लागला. त्या वेळेस सर्वाचे लक्ष त्याच्याकडे गेले व त्याला रडताना पाहून सर्व नातेवाईकांचे डोळे भरुन आले. आजी व पणतूचे नाते इथेच सपंले होते. त्याच्या पुढील आयुष्याच्या प्रवासात हा छोटा मुलगा आजीला आठवणीत ठेवील का?
No comments:
Post a Comment