मुबंईत बसस्टाँपवर,मैदानात आणि चौपाटीवर कानातले मळ काढणारे गिर्हाईकांबरोबर बसलेले दिसण्यात येतात. खाद्दांवर असलेल्या एका छोटया चामडयाच्या बँगेत त्याची ह्त्यारे घेऊन फिरत फिरत आपला धंदा करतात.डोक्यावर रंगीबेरंगी फेटा घालून त्यामघ्ये त्याची सर्व ह्त्यारे खुपसून ठेवलेली असतात. विशिष्ट जमातीचे लोग हे काम करताना पाहतो. पांढरे कपडे घालुन व तेलाने माखलेले गिर्हाईकांना न बोलविता आपला धंदा करीत असतात.मुबंईत जसे डब्बेवाले पुर्वीपासुन काम करतात तसेच हे कानातले मळ काढणारेही शांततेने कान कोरत बसलेले दिसतात.गप्पा मारत मारत कान साफ करण्याची हातचलाखी सुरु असते. मुबंईतल्या लोकांना आपल्या शरीराची स्वच्छता करण्यास वेळ नसतो व कंटाळा असल्यामुळे हा व्यवसाय चालतो. पैसे देऊन कान का दुखवुन घेतात ही मडंळी. काही वेळेला नविन गिर्हाहीकांना धाबरुन टाकतात व चागंलेच पैसे जमा करतात. कानात गुपचुप काहीतरी भरतात व कानातुन काढले म्हणुन तुम्हाला दाखवतात. ठराविक माणसेच याच्यांकडुन कान साफ करुन घेतात. त्याना याच्या कडुन कान साफ करुन घ्यायला मजा वाटते म्हणुन पैसे देऊन आनंद उपभोगतात. ही मडंळी खास तंद्री अनुभवण्यासठी कान कोरुन घेतात. पण हे लोक डाँक्टर कडे का जाऊन कान साफ करुन घेत नाहीत? पैसा की भीतीमुळे? स्वत:चा किंमती अवयव काही तद्रींची मजा अनुभवण्यासाठी व कमी पैशासाठी या अशिक्षीत माणसांकडे कसा स्वाधीन करतात? कीतीतरी लोकांच्या कानाची या मडंळीनी वाट लावली आहे.तद्रीं लागल्यावर काही लोकांना तर या मडंळीनी लुटले आहे. कानातला मळ पटकन निघावा म्हणुन कसले कसले तेल व केमिकल कानात टाकतात. कान निकामी झाल्या नतंर पस्तावून काय उपयोग. आपल्या मौल्यवान अवयवाचे नुकसान करुन न घेता शास्त्रशुद्ध पध्दतीने व अद्यावत उपकरणाने जाणकाराकडून कान नियमित साफ करुन घेतल्यास अवयव चागला राहील. कानात बोळे घालून फक्त दहा मिनीटे बहीरेपणा अनुभवल्यास रस्त्यावर कान साफ करुन घेण्याचे घाडस कोणीच करणार नाही.
No comments:
Post a Comment