Thursday, October 2, 2008

अहंकार

आपल्याला मोठया सकंटातून जो कोणी वाचवतो तो कोणत्याही जातीचा असला तरी आपण त्याला देवास्वरुप मानतो.मदत करणारा आपले कर्तव्य पार पडत असतो.त्यावेळेला आपण त्याची जातपात न जाणता व लहानमोठा न पाहता प्रथम त्याचे आभार मानतो. वाचवणारा वाचवणार्याची जात पाहून त्याला वाचवण्याचे ठरवित नाही. तसेच वाचवणार्याची जात पाहून त्याची मदत स्विकारण्याचे वाचणारा ठरवित नाही. एरवी आपण जातपात पाहतो.सकंटात मदतीला धावून येतो त्याची आपण तात्काळ मदत स्विकारतो.सगळ्यांवर संक़टे येतात पण त्या सकंटात मदत करायला सगळे का नसतात? त्यामघल्या काहीचा अहंकार पुढे येतो. अहंकारी माणुस समाजाला घातक ठरत आहे.अहंकारी माणुस केव्हाच दुसर्याला मदत करायला पुढे येत नाही.माणसातला अंहकार काढणे फारच कठीण काम आहे.हाच अंहकारी माणुस दुसर्याकडुन मदत घेण्यास पुढे असतो.पण मदत करण्यास मागे राहतो. जर अहंकार माणसातुन दुर झाला तर तो माणुस खुप सुखी होऊ शकतो.आपला अहंकार वेगळ्या जातीतल्या लोकांना आपलं म्हणायला तयार नसतो. जाती वेगवेगळ्या पण सर्वाचा घर्म एकच तो म्हणजे माणुसकी. प्रत्येकाने आपल्यात माणुसकी जपली पाहीजे व सर्वाना मदत केली पाहीजे.

No comments: