Sunday, October 19, 2008

खरी मैत्री

दोन मित्र रस्त्याने चाललेले असतात.बोलता बोलता त्यांच्यात जबर भांडण होते. वाद पेटतो.दोघांची डोकी तापतात. आणि राग अनावर होऊन एक मित्र दुसर्याच्या श्रीमुखात भडकावतो. आपल्या मित्राने एवढयातेवढया कारणाने आपल्यावर हात उचलला.हे काही त्या बिचार्या मित्राला आवडले नाही.पण तो गप्प बसला. संतापून हात तर अजिबात उचलला नाही. चालता चालता तो थांबला आणि वाळूवर त्याने लिहिले..'माझ्या जिवाभावाच्या मित्राने आज माझ्यावर अकारण हात उचलला!'. त्या मित्राने ती नोदं झालेली पहीली. लक्षातही ठेवली. कोणी काहीच न बोलता ते दोघे पुढे चालत राहीले. समोरुन एक झरा झुळुझुळुत वाहत होता. तिथे दोघे थांबले. थोडा वेळ विश्रांती घेतली. थोडयावेळाने दोघे अंधोळीसाठी पाण्यात उतरले. ज्या मित्राने मघाशी मार खाल्ला होता.त्याचा नेमका पाय घसरला. तो पाण्यात पडला.गटांगळ्या खाऊ लागला. नाकातोडंत पाणी जायला सुरुवात झाली. तितक्यात त्याचा मित्र मदतीला धावला.त्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याला वाचवले. पाण्याबाहेर काढले. कसाबसा वाचलेला हा मित्र धापा टाकत श्वास घ्यायला लागला. जरा वेळ शांत बसला. आणि तेवढ्यात त्याला समोर एक काळाकुळकुळीत दगड दिसला. त्याने त्या दगडावर काही अक्षरे कोरायला सुरुवात केली. त्याने लिहीले..'आज माझ्या मित्राने माझा जीव वाचवला..मी 'आहे' तो केवळ त्याच्याचमुळे!'. दुसरा मित्र ते वाचून हादरतोच. 'तू काय करतोय मला काही कळत नाही.हे असे तू का लिहीत आहेस? मघाशी मी तूला मारले तेव्हा तू ते वाळूवर लिहीलेस आणि आता दगडावर. असे का? तो उत्तर देतो, "यालाच मैत्री म्हणतात.आपल्या मित्राने आपले मन दुखावले,आपल्याला त्रास दिला तर ते असे हलक्या हाताने वाळुवर लिहिल्यासारखे करावे. काळाची लाट येते आणि ती अक्षरे पुसून जातात. आपल्या मनात काहीच राहत नाही. पण मित्राने जर आपल्यासाठी काही केले तर ते कायम मनात जपून ठेवायला हवे.आपल्या आयुष्यांची खरी पुंजी म्हणुन जपायला पाहीजे असे मला वाटते. हेच बध ना, तू मला मारलंस त्याहीपेक्षा महत्वाचे आहे ते तू स्वत:चा जीव धोक़्यात घालून मला वाचवलेस ते!".
मैत्री अशीच तर असते. वाळू आणि दगडावर कोरलेल्या अक्षरांसारखी. काय वाळूवर लिहायचे आणि काय दगडावर कोरयचेहे शेवटी आपल्यालाच ठरवायला हवे!.
---वाचण्यात आलेला ललित लेख, वाचकांसाठी येथे ठेवला आहे.

1 comment:

Anonymous said...

Went through your blog. Very nicely created and assembled blog. Nice stories and reading material. I felt very proud when I saw the Times of India letters. I thought you write only in Maharashtra Times. I liked the 'Two friends' and 'Chuklela Mitra' stories.