स्पर्घेत पाठविलेला लेख
जन्म स्वातंत्र्यानतंर झाला म्हणून आम्हाला स्वातंत्र्यासाठी झगडावे लागले नाही पण आता स्वातंत्र्य टिकविण्यासाठीआपल्याच लोकांबरोबर झगडावे लागत आहे. इग्रंजानी स्वातंत्र्य देताना आपल्यात कलह् पेरुन गेले,या कलहाचा परीणाम आपण आताही भोगत आहोत. जातीयवाद,दहशतवाद,दगंली,बाँम्बस्पॉट,अतिरेकी कारवाया या सारख्या समश्यांना सतत तोंड घ्यावे लागत आहे. आपले शेजारील देश अशा कारवायांना सतत खतपाणी घालत असल्यामुळे आपल्या देशात कायम अशातंता जाणवत राहते. आपल्यात सलोखा होऊ नये म्हणून काही देश प्रयत्नशिल असतात.सामान्य माणूस नेहमीच दडपणाखाली जगत आहेत.परिणामी देशाचा सरंक्षणासाठी खुपच खर्च होतो.
चीन व कारगील या युध्दाने देशाची आर्थिकबाजू हालाखीची झाली होती.विज्ञानाची प्रगती होऊनही नैसर्गिक आपत्तीची आगाऊ सुचना मिळ्त नसल्यामुळे मनुष्यहानी व वित्तहानी झाल्यामुळे देशाची आर्थिक प्रगती खुटंत आहे. लोकसंख्येला आवर घालण्यास आपण अपयशी ठरलो आहोत. शिक्षण, नोकरी, आरोग्य असे गहन प्रश्न कायम पडुन आहेत. मधल्या काळात आर्थिक मंदीने देशाची आर्थिक बाजू कमकुवत झाली होती.पण आता चागंलीच सुधारणा झाली आहे. मंत्र्याच्या व नेत्यांच्या मनाप्रमाणे विकासाची कामे होत आहेत. देशातील राज्ये आपापसात सीमा प्रश्न,पाणीवाटप या प्रश्नांवरुन भांडत आहेत. कराचे महत्त्व लोकांना आजून समजत नसल्यामुळे विकासाची कामे अपुर्ण राहत आहेत. समाजात भ्रष्टाचार खोलवर रूजली आहे.वीजेची वाढत आहे. मुलभुत गरजेच्या नियोजनाच्या अभावामुळे गरजेपेक्षा मागणीची पूर्तता करण्यास यत्रंणा कमी पडते. कामगाराच्या मागण्या व प्रश्न कामगाराना चळवळीने सोडवावे लागतात. शिक्षणात राखीव जागाचा प्रश्न सुटत नाहीत. ग्रामीण विकासाची गरज देशाच्या प्रगतीकरीता आवश्यक आहे. हल्ली समाजात स्वैराचार व बेशिस्त बोकाळल्याने गंभीर गुन्हे वाढत आहेत. न्यायव्यवस्थे वरचा विश्वास सामान्य माणसांचा उडत चालला आहे. कोणत्याही योजनेतील आर्थिक मदत शेवटच्या गरजु पर्यत पोहचत नाही हे अपयश आपल्याला मान्य करावेच लागेल. जातीयवादामुळे आपापसात वैर वाढल्याने एकमत होत नाही. स्वातंत्र्य मिळवूनही आपण या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकलो नाही यांचेच दुख: आहे.
हरीतक्रांती,उद्दॉगधंदे,तेल व गँस उत्पादन,शिक्षण,अवकाश, उर्जा,पयर्टन,विज्ञान,आण्विक, मिडिया,घरबांघणी, दळणवळण, इल्केट्राँनिक्स,आरोग्य,बँकींग,खेळ,कला ,क्षेत्रात स्वातंत्र्यानतंर लक्षणीय प्रगती झालेली आहे. वर्ल्ड बँकेच्या मदतीने आपण आपले प्रकल्प विकसीत करीत आहोत. साक्षरतेने वैचारीक पात्रतेत वाढ झाली हे देशाच्या फायद्याचे झाले. महिलांचा सैन्यासह सर्वच क्षेत्रात सहभाग वाढत गेल्याने समाजाच्या व देशाच्या प्रगतीला मदत होत आहे. संगणकाने तर माणसांचे जीवनात आम्रुलाग बदल झाला आहे. तरुणांना शिक्षाणाच्या संधी उपलब्ध झाल्याने वेगवेगळ्या क्षेत्रांत शिक्षण घेऊन तरुण देशाच्या उन्नती साठी आपले योगदान देत आहेत. वृद्ध व जेष्ट समाजाला व पुढच्या पीढिला नैतिक मार्गदर्शन करीत आहेत. देशाला जगात मान सन्मान मिळण्यास प्रत्येक जण नविन पिढिला मार्ग दाखवत आहेत. शास्त्रज्ञ नविन शोध लावण्यात गर्क आहेत. जगात आपल्या देशाला मान प्राप्त झालेला आहे.स्वातंत्र्यामुळेच आपण सर्व क्षेत्रात प्रगती साध्य करु शकलो आहोत.
अशा या आपल्या स्वातंत्र्याला साठ वर्ष पूर्ण झाली आहेत पण आपल्या मध्ये आपल्या देशासाठी झटण्याची इच्छा अजून का उत्पन्न होत नाही? कारण आपण स्वातंत्र्याचा अर्थच मुळी वेगळा लावला आहे.देशात व्यक्ती स्वातंत्र्य असल्याने जो तो आपआपल्या फायद्याप्रमाणे त्याचा वापर करीत आहे.त्यामुळे आवश्यक्यतेपेक्षा अधिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच आजदेशाच्या प्रगतीपथामघ्ये आपण अनेक अडसर निर्माण करीत आहेत. काही देशातील माणसे स्वार्थी प्रवृत्ती बाजूला सारुन स्वात:ला स्वत:च्या देशासाठी वाहून घेतात अशी प्रवृत्ती स्वातंत्र्य मिळवुन आपल्यामघ्ये कधी येणार? स्वातंत्र्य टिकविण्यासाठी व देशाच्या भरभराठी प्रत्येकाने आपल्यात हा बदल घडवून ,एकजुठीने कोणतेही काम देशाचे कार्यसमजुन केल्यास आपण येणार्या कोणत्याही सकंटावर सहज मात करु शकतो.
आपल्याला स्वातंत्र्य उपभोगताना आपल्यातल्या दोषाँमुळे अनेक अडचणीशी सामना करावा लागत आहे पण त्याचबरोबरीने आपल्याला समृद्धीही प्राप्त झालेली आहे.
1 comment:
Namaskaar,
apalaa blog avadal.
malaahi asa blog lihinyacha chhand aahe. maza blog baghun comments nakki dya
http://marathikavitaa.blogspot.com/
sujit
ny.sujit@gmail.com
Post a Comment