* पासपोर्ट,तिकिटे,विसा ची zerox काँपी व विमाच्या दाखला बरोबर घेतले आहेत का? हे प्रथम तपासुनच विमानतळात प्रवेश करा.
* जड सामानाचे स्क्रीनींग(security check) झाल्यावर त्या सामानावर स्टीकर्स व टँग लावतात व हाततल्या बँगना लावण्यास एयरलाईन्सचे टँग देतात.
* जड सामान पुन्हा ट्रालीवर घेउन पुढे चालत एयरलाईन्सच्या खिडकीवर जाउन ChecK-In साठी रंगेत उभे राहणे.
* Original पासपोर्ट , तिकिटे व विसा ची zerox काँपी ChecK-In करीता खिडकीवर देणे व त्याच वेळेस विमानतल्या खिडकीच्या जागेसाठी विनंती करणे.
* इथे तुमच्या सर्व जड सामानचे वजन होते.जास्त वजनाचे वेगळे पैसे भरावे लागतात.वजन बरोबर झाल्यास, येथे तुमचे सर्व जड सामान त्याच्या ताब्यात जाते.तुमच्या जवळ फक्त हातातल्या बँग राहतात.
* Check-In आँफिसर तुम्हाला पासपोर्ट , तिकिटे व विसा च्या zerox काँपीसह बोर्डीग पास देतो. बोर्डीगवर सिट नबंर व गेट नबंर नमुद केलेले असते.
* Check-In आँफिसर तुम्हाला एक Emmigration Form देईल. तो फाँर्म तुम्ही शांतपणे भरावा.
* Emmigration Check साठी खिडकीवर रांगेत राहणे. पासपोर्ट, विसा zerox काँपी, Emmigration Form तपासणी साठी द्दावे.
* कागदपत्राची तपासणी झाल्यावर आँफिसर तुम्हाला EXIT चा स्टँम पासपोर्ट मारुन पासपोर्ट,विसा zerox काँपी परत देईल. पासपोर्ट व्यवस्थीत तपासून घेणे गरजेचे आहे.
* आता फायनल सिक्युरीटी चेक साठी रांगेत उभे राहणे.बेल्ट,पैशाचे पाकीट,पेन,काँईन्स,इतर वस्तु अगोदरच काढुन एका ट्रे मघ्ये ठेवुन स्वत: मेटल डिटेक्टर मघुन पास होउन बाहेर येणे,प्रत्येकाची शारीरीक तपासणी केली जाते. पुरुष व महीलांसाठी वेगवेगळी रांगतुन तपासणी होते. बँग व ट्रे मघ्यल्या वस्तु SCAN होतात व पासपोर्टवर स्टँम मारतात. ट्रे मघल्या सर्व वस्तु व्यवस्थित तपासुन घेणे.
* बोर्डीग पासवर दाखविलेल्या गेट नबंर वर जाउन बसण्याची सोय असते त्याठीकणी विमानाची वाट पाहत बसणे. वेळ झाल्यावर विमानात प्रवेश करणे.विमानात सिट नबंर प्रमाणे बसणे. विमानातील टी.व्ही व जेवणाचा पुरेपुर उपभोग घेणे.
प्रथम विमान प्रवास करणार्यास या टिप्सची मदत होईल.
No comments:
Post a Comment