सुरक्षेचे कवच घेऊन फिरणार्या राजकारणी नेत्याना जनतेच्या सुरक्षेबद्दल विचार करायला वेळ आहे का? अद्यावत शस्त्रात्रे नसल्यामुळे पोलीसदल अतिरेक्यांशी कसा सामना करु शकेल? दहशतवाद विरोधी पथकात फक्त ३५ अधिकारी करोडो लोकांचे सरंक्षण कसे करु शकणार? या गोष्टीचा नेत्यानी विचार केला आहे का ? मुबंईसह देशभरात पधंरा दिवसाने दहशतवादी कारवाया वेगवेगळ्या मार्गाने अतिरेकी करीत आहे. या कारवाया फक्त चर्चा करून थांबणार आहेत का? मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घटनास्थळाना भेट देऊन फ्क्त चंनेलावर स्वत:ची प्रसिद्धी घेण्यात गुतंलेले दिसले. विरोधी पक्ष मंत्र्याचे व सरकारचे राजीनामे मागण्यात पुढे आहे.
हेमंत करकरे यांच्या कुटुंबीयांना बलिदानाबद्दल रक्कम देऊ करणे,उन्नीकृषन यांच्या घरी सांत्वनासाठी जबरदस्तीने घरात घुसणे,दहशतवाद्दांच्या हल्ल्यात मुबंई होरपलेली असताना दिल्लीतील जेष्ट नेत्यांनी मुबंईतील सुरक्षा यत्रंणेवरच्या ताणाचा विचार न करता मुबंईला धावत सुट्णे या सर्व घटनांमागे राजकीय लाभ उपटण्याचा प्रयत्न होता हे क़ळण्यास जनता दुधखुळी वाटली काय याना? राजकारण्यानी आपली मर्यादा सोडुन वागत असल्याचा त्रास हुतात्मांच्या कुटुंबीयांना झाला.
जनतेचे प्रतिधिनी असलेल्या राजकारण्यांनी परीस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता अशी अशोभनीय कृत्त्ये केल्यामुळे राजकारण्यांवद्दल सतांप वाढत आहे. सुरक्षेच्या कवचात राहणार्या नेत्यांनी प्राणांची चिंता न करता जनतेच्या सरंक्षाणासाठी यज्ञकुडांत उडी घेणार्या शहिदांच्या बलिदानाची अशी अवहेलना करणे शोभा देते का? निर्धावलेल्या नेत्यांनी अशी माणुसकी व्यक्त करणे बंद क़रावे.
राजकीय व व्यैयक्तीक स्वार्थासठी राष्ट्रीय हिताला तिंजाजली देणारी मंड्ळीनी देशाला स्पाँट टार्गेट बनविले आहे. हे युध्द लादणार्या देशाविरुद्ध लढा पुकारण्याचे घैर्य सघ्याच्या सरकारात नसेल तर येणार्या निवडणुकीत तसे वचन देणार्यानाच जनतेने राजकर्ते बनवावे.
1 comment:
छत्रपती शिवाजी महाराजानी दिल्ली हादरवली, पण आज मात्र कुठलाही
निर्णय घ्यायचा असेल तर दिल्लीला जावे लागते
काय म्हणत असतील महाराज
अहो मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वार्या जर बंद ज़ाल्या तर कमीत कमी एका
जिल्ह्या चा विकास होईल
Post a Comment