Monday, December 29, 2008

ताज व ओबेरायने सत्कार क़रावा.

मुबंईतील दहशतवदी हल्ल्यात ताज व ओबेरय या हाँटेलमघ्ये मुबंई पोलीस,अग्नीशामक दल,मरीन कमांडो वएनएसजीच्या कमांडोनी दहशतवाद्दांच्याविरुध्द धैर्याने प्रतिकार करीत त्याना कारवाया करुन न दिल्यामुळे या हाँटेलचे मोठे नुकसान झाले नाही.या हाँटेलची सुरक्षा व्यवस्था यत्रंणेतील त्रुटीमुळे दहशतवादीने शस्त्रात्राचा साठा जमा करुन ठेवला होता.या शस्त्रात्राच्या साठयाचा उपयोग करुन जर हल्ला झाला असता तर खुप अनर्थ झाला असता.हा अनर्थ टाळण्याच्या प्रतत्नात काही जखमी तर काही शहीद झाले पण त्यानी या दोन्ही जगप्रसिध्द वास्तू मोठ्या नुकसानीपासुन सुरक्षीत ठेवण्यात यशस्वी झाले.या कर्तव्याबद्दल सरकारने त्याना व त्याच्या कुटुबांसाठी मदत दिली आहे.पण या कार्याचा ह्या दोन्ही हाँटेलच्या व्यवस्थापनाने कसा सत्कार केला व काय मदत केली हे जाहीर करावे.जुन्या वर्षाला निरोप व जुन्या वर्षाच्या स्वागताचा फायदा मिळविण्यासाठी हाँटेल घाईघाईने पुन्हा जोमाने सुरु केले पण ह्याचा विसर पडला आहे. हाँटेल व्यवस्थापनाने विम्याचे पैसे मिळविण्याच्या धावपळीबरोबर ह्याचा सत्कार केला असता तर हाँटेल व्यवस्थापनाची प्रतिष्ठाही वाढली असती.

No comments: