Friday, January 2, 2009

पाहीलेले दुबई शहर

इमिग्रेशन पार पाडुन व सामान घेऊन बाहेर पडत असताना पाहुन विक्रमला व त्याच्या मुलीना खुप आनंद झाला. मुलीनी उडया मारुन आमचे स्वागत केले.घावत घावत येऊन त्यानी आम्हाला मिठया मारल्या. सामान गाडीत चढवून आमच्या परदेशातील दौंर्याला सुरुवात झाली. दुबंई शहराची ओळख आम्हाला विक्रम कडुन होऊ लागली. रात्रीतील विजेचा झगमगाट पाहुन चक्क झालो लगेच मुंबईतील लोडशेडीँगची आठवण झाली. वाहतुकीतून वाट काढत काढत आम्ही घरी पोहचल्यावर हेमांगीने आमचे स्वागत केले.दुबईतले हवामान मुबंईसारखेच वाटते.पण उन्हाळ्यात कडक उन्हाळा असतो तर थंडीत बोचरी थंडी असते.पाउसतर वर्षातून कधी तरी थोडासा पडतो. पिण्याच्या पाण्यासाठी त्याच्याकडे समुद्रांचे पाण्याचे पिण्याच्या पाण्यात रुपांतर करुन ते सगळीकडे पुरविले जाते.पण काहीजण 'बिसलरी' चे पाणी पिण्यासाठी वापरतात व नळाचे घरातील कामासाठी वापरतात. समुद्र स्वच्छ व निळेशार दिसते व पाण्याचा तळ पाहाता येतो. पाण्यात कुठेच घाण दिसत नाही म्हणुन पोह्ण्याचा मोह आवरता योत नाही. परदेशी पाहुणे तर या स्वच्छ समुद्रात मजा करत किनार्यावर पहुडलेले असतात. या समुद्रात फिरण्यास हे लोक याँट वापरतात. या सर्वसुख सोयीयुक्त याँट साठी मरीना आहेत. पाण्यातील खेळ खेळ्यासाठी हि मडंळी उत्सुक दिसतात. सध्यांकाळी या समुद्र किनार्यावरुन फिरण्यास मस्त वाटते व वेगळीच नशा येते. दुबंईत अरब कमी पण जगातल्या सर्व जमातीचे लोक शातंतेने व शिस्तीने राहाताना दिसतात. दुबईत श्रींमती दिसण्यात येते. अवाढव्य व बीनखडयाच्या रस्त्यामुळे वाहतुक सुरळीत होत असते. अवाढव्य व बीनखडयाच्या रस्त्यामुळे वाहतुक सुरळीत होत असते. वाहतुकीचे नियम कडक असल्याने वाहतुक शिस्तीत धावत असते. सर्व गाडया अलिशान व वातानुकुलीन असुन वेगाने लेन न तोडता सिग्नल प्रमाणे पळ्त असतात. सर्व गाडया डाव्या हातानेच हाकतात.महामार्गावर गाडयाचा वेगावर नियत्रंण ठेवण्यासाठी कँमेरे लावलेत. दिलेल्या वेगापेक्षा रस्त्यावरुन जास्त वेगाने धावणार्या गाडयाचे फोटो काढले जातात व शिक्षा म्हणुन दंड आकारले जाते. जास्तवेळा शिक्षा झाल्यावर त्याचा गाडी चालविण्याचा परवाना रद्द केला जातो. पेट्रोल व डिझेल स्वत असल्यामुळे गाड्या वाढल्यामुळे ट्राफिक जाम होत आहे. माल वाहतुक फक्त रात्रीच होते. रस्त्यावर कुठेच फेरीवाला दिसत नाही.माँल व शाँपिंग क़ाँमप्लेक्स मघुन प्रत्येकजण खरेदी करत असतात.लोकल मार्केट नसल्यामुळे शहरात घाण दिसत नाही. शहरातील कचरा रात्रीत काढुन शहराबाहेर नेला जातो. शहराची प्रत्येक रस्त्याच्या मघ्यभागी व दोन्ही बाजुला सुदंर फुलांच्री,खजुराची झाडे व गवत लावुन शोभा वाढविली आहे. वाळवंटात हिरवळ ठीबंक सिंचनाने वाढविली आहे. पाण्याचा चागला उपयोग करुन मोठे मोठे सुदंर बगीचे बनविले आहेत. रात्रीत विजेचा झगमगाट असतो.सर्व रस्त्याना विजेचे दिवे लावले आहेत.फ्लायओवर बाधुन वाहतुक सुरळीत करण्याचा नेहमीच त्याचा प्रयत्न असतो. थोडे दिवसात मेट्रो ट्रेन सुरु आहेत. रस्त्याचा तिकडेही टोळ गोळा केला जातो पण वेगळ्या पध्दतीने. गाडीवाल्याने पैसे भरल्यावर त्याना एक चीप दिली जाते ती गाडीचालकाच्या समोरील काचेवर चिटकावी लागते. ज्या रस्त्यावर टॉळ आहे त्या रस्त्यावर सेंस्नर लावले आहेत. गाडी जेव्हा सेस्नर मघुन पास होते तेव्हा त्याच्या खात्यातून पैसे कापुन घेतले जातात. आपल्याकडे रस्त्यावर रांगेतून पैसे देउन टोळ भरण्यामुळे वेळ वाया जातो. दुबईत आपल्यापेक्षा जास्त महिला गाडी चालविताना दिसतात. तिकडच्या एकाही चालकाला आपल्यासारखी घाई नसते. रस्त्याची कामे करण्याच्या अटी कडक़ असल्यामुळे पटक़न व वेळेत होतात. आपल्याकडील चित्रपटाना अरेबी चित्रपटापेक्षा खुप मागणी आहे.टि.व्ही.वर भारतीय चँनल जास्त पाहीले जातात. सर्व शाळा व त्याच्या बसेस वातानुकुलीन आहेत.दुबईत तेलाचा पैसा आहे पण राज्यकर्ते 'शेख' जनतेच्या सुखसोयीसाठी पैशाचा उपयोग चागला करताना दिसतात. हाच मुख्य फरक आपल्या व त्याच्या राजकारण्यात दिसुन येतो. दुबईत येणारे नविन प्रोजेक्ट सुखसोयी वाढवुन जनतेला आनंदायी ठरणारे आहेत व हे शहर जगात अध्यावत ठरेल.









No comments: