Thursday, January 15, 2009

नको त्या वेळेला वाजलेली रीगटोन

मित्राची बायको आजाराने बेजार होती. काही दिवसातच तीचे निधन झाले.आम्हा मित्राना ही वाईट बातमी कळल्यानतंर आम्ही धावत त्याच्याकडे पोहचलो.त्याची भेट घेतली. त्याने पत्नीची व्यथा सांगितली त्याच्या प्रयत्नाना यश आले नाही व शेवटी तीचा अंत झाला. पुढिल समस्याचे ओझे त्याच्यावर पडले होते. नातेवाईक जमले होते.सर्व तयारी सुरु झाली.तिच्या निधनाने सर्वाना वाईट वाटले होते. जाणकार मडंळी प्रेतयात्रेच्या तयारीत गुतंले होते.थोडया वेळाने सर्व नातेवाईक खाली आले. तिलाही खाली आणुन तिरडीवर ठेवले.तिची मुले सारखी रडत होती.आजीनी त्याना जवळ घेतले होते.त्या मुलाना पाहुन सर्वाना वाईट वाटत होते.त्या वेळेस त्या ठिकाणी तणाव जाणवत होता. ती वेळ सर्वासाठी कठीण होती. काही जण एक फाँर्म्यालीटी म्हणुन आपली कामे घेउन प्रेतयात्रेला आले होते. ते आपली कामे मोबाईलवरुन्र मार्गदर्शन करुन करीत होते.सर्व विधी झाल्यवर प्रेतयात्रेला सुरुवात करणार अश्या भयाण शातंतेच्या वेळेस एकाच्या मोबाईलवर 'घुम' या चित्रपट मघल्या 'घुम मचाये घुम' या गाण्याची रीगटोन वाजली. ती रीगटोन खुप वेळ वाजत होती तो ग्रुह्स्थ धाबरल्यामुळे त्याला ती रीगटोन थाबंविण्यास वेळ लागला. त्या प्रसंगाला त्या रीगटोन सर्वाचे लक्ष विचलीत केले. ज्याच्या मोबाईल वरुन ही रीगटोन वाजली तो ग्रुहस्थ एकदम ओशाळला व तो पटकन गर्दीतुन बाहेर पडला. अश्या वेळेस ह्या रीगटोन ने गोधंळ झाला. अश्या वेळेस ह्या रीगटोन ने गोधंळ घातला. सर्वजण त्याच्या कडे रागाने पाहत होते.
प्रत्येकाने आपल्या मोबाईलवर कोणती रीगटोन ठेवायची याचे त्याला स्वातंत्र्य आहे. पण अश्या प्रसंगात प्रत्येकाने आपला मोबाईल बंद ठेवणे योग्य ठरले.

No comments: