चायना मोबाईलमुळे देशाच्या सुरक्षा व्यवव्थेला धोका निर्माण झाला आहे.दिसायला आर्कषक,सुदंर व स्वस्त असल्यामुळे आजची तरुणाई चायना मेड वस्तूकडे वळत आहेत.दुरसंचार मंत्रालयाने या चायना मोबाईलवर बंदी घातली पाहीजे होती.ज्यामघ्ये आयएमईआय नबंर नाही अशा सर्व मोबाईलचे येणारे-जाणारे काँल अडवुन ठेवण्याचेच निर्देश विविध कंपन्यांच्या टेलीकाँम आँपरेटरना दिले होते.या आदेशाची अंमलबजावणी सहा जानेवारीपासून करावयास हवी होती.मात्र,खाजगी कंपन्यायाकडे दुर्लक्ष करीत आहेत.त्याचे कारण म्हणजे देशभरातीले एकाच वेळी दोन कोटी कनेक्शन बंद होतील व कोट्यावघीरुपयांचा फटका बसेल या भीतीमुळे खाजगी कंपन्यांना बाळगुन आहेत.आयएमईआय नबंर नसलेल्या मोबाईलचे उत्पादन प्रामुख्याने चीन व तायवान या देशात घेतले जाते.मोबाईलवरील *#०६# ची बटन दाबल्यास आयएमईआय नबंर दिसतो.१५ ते १७ क्रंमाकाचा हा नबंर असतो.मोबाईलमघ्ये आयएमईआय नबंर नसल्यास कोण कुठे बोलत आहे,हे माहीत होत नाही. तसेच 'लोकेशन ट्रेस' करता येत नाही.अशा मोबाईलमुळे देशाच्या सुरक्षेला केव्हाही घोका निर्माण होउ शकतो मुबंई हल्ल्यातील दहशतवादी सेटेलाईट फोन,आयएमईआय नबंर नसलेल्या मोबाईलचा वापर करीत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.संपुर्ण देशभरात वर्षभरात मोबाईलचा व्यवसाय ३० हजार कोटी रुपयांचा आहे.त्यात चायना मोबाईलचा वाटा १२ टक्के आहे म्हणजेच वर्षाला चार हजार रुपयांचे चायना मोबाईल विकले जातात.बाजारात ब्राँडेड मोबाईल १५ ते १८ हजार रुपयांत मिळतात.ब्राँडेड कंपन्यांचे टच स्क्रिन मोबाईल २२ हजार रुपयांपर्यत मिळतात. असे चायना मोबाईल चार हजारांपर्यत मिळत असल्याने याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे.आता चायना मोबाईल बंद करण्याएवजी आयएमईआय नबंर साँफ्टवेअर टाक़ण्याचे प्रयत्न सुरु झालेले आहेत.देशाच्या सुरक्षेसाठी जनतेने हे चायना मोबाईल बंद वापरणे बंद करावे.
No comments:
Post a Comment