Tuesday, January 27, 2009

सैनिकहो तुमच्यासाठी...



अमेरिका वि ब्रिटिश या देशाचे सुमारे लाखभर सैनिक इराक व अफगाणिस्तानात आहेत. मायदेश, घर,पत्नी-मुले यांच्यापासुन हजारो मैल दुर या सैनिकाना डयुटी बजावावी लागत आहे. या जवानांच्या पत्नींना मुंलाचे पालनपोषन करताना माता पिता अशा दोन्ही भुमिका साकाराव्या लागतात.अनेक दिवस कुटुंबापासुन दुर राहावे लागल्यामुळे पती-पत्नीत दुरावा निर्माण होत असुन अनंत अडचणींना सामना करावा लागत आहे.मुलांशी सहजपणे संपर्क साधणे दुरापास्त होउ लागत आहे.त्याची परिणती तणावांचे संबंध,अबोला,सवांद साधण्यात अडचणी आणि प्रसंगी विभक्त राहणे यात होउ लागली आहे.या अडचणीवर मात करण्यासाठी अमेरिका व ब्रिटिश सैन्याधिकांर्यानी पुढाकार घेउन संवाद वाढीच्या द्रुष्टीने प्रयत्न सुरु करुन त्या पध्दतीचे ट्रेनिंग सैनिकाना दिले जात आहे.या सुविधाचा सैनिकाना चागंलाच फायदा झाला आहे.

आपल्या देशातले सैनिक सुध्दा वर्षोनोवर्ष घरापासुन दुर सीमेचे रक्षण करण्यात गुतंलेले असतात. आपल्या देशातील सैन्याधिकांर्यानी अशाप्रकारे सैनिकाना आपल्या कुटुंबीयांशी सुसंवाद करण्यासाठी काही सुविधा प्रस्थापित केल्या आहेत का? हे सैनिक खुप वेळा दुर्गम भागात सरंक्षणाची जबाबदारी पेलत असतात.त्या ठीकाणाहुन त्याना कुटुंबाशी संवाद करण्यास मिळाले तर ते आपले काम आणखी उत्साहने करतील आणि कुटुबीयही सुखावतील.आताच्या सगणंकातील क्रांतीचा व अध्यावत उपकरणांचा उपयोग करुन या सुविधा सरंक्षण खात्यानी आपल्या सैनिकांसाठी निर्माण कराव्यात. सैनिक हे देशासाठी लढत असतात. त्यांच्याच कुटुबीयांत सुसंवाद नसेल तर त्यांना देशासाठी लढण्यास कसे प्रोसाहीत करता येईल?

1 comment:

Anonymous said...

It was worth and informative visiting your blog. Keep it up and all the best.