Friday, January 30, 2009

अतिथी देवो भवो...








दहशतवादाने आपल्या देशातील परदेशी पर्य़टनावर बराच मोठा फरक पडला आहे व तसेच प्रेक्षणीय स्थळांवर परदेशी पाहुण्याना त्रास देऊन लुटले जाते म्हणुन आपल्या देशाची प्रतिमा जगात मलीन होत असल्यानेही आपले पर्यटन कमी होत आहे. भारतीय पर्यटकाना देखील आपल्या देशातील पर्यटन स्थळांवर स्थानिकांकडुन फसवणुक होतेच्.प्रवासभाडे,स्थानिक वस्तुचे दर,हाँटेलची भाडी नविन पर्यटकांकडुन जास्तच आकारले जाते. तर हेच स्थानिक पाहुण्यांचा चागलांच समाचार घेतात.आपल्याकडे पर्यटन वाढले पाहीजे याकरीता परदेशी पर्यटकाना त्रास न देता त्यांचा आदर करावा असे जाहीर आवाहन सरकार करत आहे. (Incredible India) या जाहीरातीत आजचा प्रसिद्ध अभिनेता अमिर खान परदेशी पाहुण्यांना आपला अतिथी समजुन त्याचा पाहुणचार करावा असे देशाच्या उन्नतीसाठी जनतेला विनंती करीत आहे. उशीराका होईना पण हे आवाहन गरजेचे होतेच.

हे पाहुणे पर्यटन स्थळांना भेटी देतात तेव्हा त्या स्थळांचे फोटो काढतात व शुटींग करतात. पण तेथील बसलेल्या भिकार्याचे व घाणीचे फोटो काढतात. हेच फोटो व विडीयोज परदेशात जाऊन प्रसिध्द करुन पैसे कमवितात व आपल्या देशाची परीस्थिती जगाला दाखवतात. ह्या गोष्टी आपल्याला अयोग्य वाटत असतील तर त्याच वेळेला आक्षेप घेऊन त्यांना तेथेच रोखुन शातंतेने त्याच्याशी संवाद ,करुन हे करु नये अशी विनंती करुन आपल्या देशाची नामुष्की टाळ्ली पाहीजे. स्वत:ला साफसुथरे व सुशिक्षीत समजणारे परदेशी पाहुणे नेहमीच भारतीयाना कमी लेखुन आपल्या गरीबीचे मार्केटीग करतात हे शातंतेते रोखले पाहीजे.

No comments: