श्रीलंकेच्या क्रिकेट खेळांडूवर पाकिस्तानमघ्ये भ्याड हल्ला झाला या कारवाया बद्द्ल जगाने पाकिस्तानावर क्रिडाबहिष्कार पुढील कमीत कमी पांच वर्षासाठी टाकावा. पाकमघ्ये अराजकसद्र्सस्थिती पाहून कोणाताच देश पाकिस्तानात कोणत्याहीखेळासाठी दौरा करण्यास धजणार नाही.पाकिस्तानातील आर्थिक,राजकिय व सामाजिक घडी विस्कटलेली आहे व सर्वराजकीय पक्षांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असलेल्याचा फायदा उचलत तालीबान बंडखोरी करीत 'स्वात' प्रांतातील सत्ता ताब्यात घेतलेली आहे.तसेच पाकिस्तानच्या प्रशासनावर तालिबानचे वर्चस्व दिसून येत आहे.तालिबानावर पाकिस्तानाचा काहीच नियत्रंण राहीले नाही.पाकिस्तान ताब्यात घेण्याच्या तयारीत तालिबान असल्यामुळे पाकिस्तानातील परिस्थिती अधिक बिधटत चालेली आहे.हल्लेखोराना पाकिस्तान अजून पकडू शकले नाही यात काही वेगळाचा संशय येत आहे. अशा परिस्थितीच्या देशाबरोबर जगाने सर्वच बाबतीत बहिष्कार घालावा.
No comments:
Post a Comment