Monday, March 9, 2009

'मी अण्णा'



स्वातंत्र्य संग्राम सैनिक व समाज भुषण अण्णा वायकुळ यांच्या ९३ व्या वाढदिवसादीनी त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला शनिवार दि.७ मार्च २००९ रोजी गिरगांवात नवाकाळ पथ येथे हजर होतो. जनसामान्यांच्या आयुष्यातील संघर्ष स्वत:चे समजून त्यासाठी आपले व्ययक्तित जीवन संघर्षमय करुन कुंटुबीयांच्या पाठबळावर स्वत:ला समर्पित करुन संघर्षावर मात करीत,' कार्यकत्ता ते नेता ' अशी यशस्वी वाटचाल करणांया जेष्ठ स्बातंत्र्य संग्राम सैनिक अण्णा वायकुळ यांच्य जीवनचारीतत्र्याचा लेखा जोगा आहे. त्याच्या जीवन प्रवास मुबंई व ग्रामिण भागातील सामाजिक व राजकीय कार्य असा विविध स्तारावर झालेला आहे. त्यांच्या पत्नी शोभनाताईनी अण्णानी ऑढ्वून घेतलेल्या खडतर जीवनात तत्वाला कोठेच मुरड न घालता स्वाभिमाने साथ दिली.तत्वापासुन ढळू दिले नाही म्हणूनच अण्णा आपल्या सहचारीणीला आपल्या गुरु या नात्याने पाहतात.
पुस्तकात समाजाला मार्गदर्शक व प्रेरणा देणारे प्रसंग वाचनीय ठरले आहेत.कोकणातील स्वातंत्र्यसैनिकांच्या माध्यमातून कोकणाच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रसंगयुक्त उद्दबोधक जीवनचारित्र्य हे 'मी अण्णा'चे असेल. निस्वार्थी स्वातंत्र्य सैनिक म्हणुन त्यांची ओळ्ख आहे. अण्णांना वयाच्या २० वर्षी काँग्रेसची गांधी टोपी स्विकारुन समाज कार्यात ,राजकारणात प्रवेश केला या वाटचालीत अनेक प्रलोभनावर मात करीत तत्वे सांभाळली. स्वार्थासाठी, मानासाठी पक्ष बदलू राजकारण केले नाही. या प्रवासात त्याच्या पत्नी शोभनाताईची सोबत होती व त्याची भुमिका नेहमीच तत्वनिष्ठ होती.
सोह्ळ्यात स्वारी खुषीत दिसत होती.त्यानी सुरु केलेल्या संस्थेमार्फत त्याच्या जीवनचारीत्र्यावर पुस्तक प्रकाशन होत आहे ही त्याच्यासाठी मोठी गोष्ठ होती. सर्वाचे आभार मानुन सर्वाना आशिवार्द देत होते.त्याचे प्रसन्न व्यक्तिमत्व पाहुन आनंद झाला. कार्यक्रमात त्याना खुप बोलायचे होते.पण प्रक्रुतीमुळे त्याना आवरते घेउन सर्वाचे आभार नमस्कार करुन मानले.स्पष्ट वक्ते म्हणुन प्रसिध्द असलेल्याची चुनुक आपल्या छोट्या भाषणात करुन दिली.
सामान्य कार्यक्त्याचे जीवनचरीत्र्य 'मी अण्णा' हे पुस्तक वाचनीय ठरले आहे.

No comments: