Tuesday, March 10, 2009

लोकसभेतील मुके नेते.

चौदाव्या लोकसभेच्या खासदारांच्या प्रगतीपुस्तकात पांच वर्षाच्या कालावधीत एकही प्रश्न न विचारणार्या नेत्यांमघ्ये वेगवेगळ्या पक्षांचे व पंतप्रधानपदांचे दावेदार लालकृष्ण अडवाणी ,सोनिया गांधी,ममता बँनर्जी असे जेष्ट नेते आहेत. संसदेत माडंलेले सर्व विधायके ,मुद्दे ,प्रस्ताव या लोकप्रतिनिघीना मान्य असतात का? नविन कायद्याना आक्षेप किंवा विरोध नसतो का? संसदेच्या कामकाजात याना काहीच स्वारस्य नसते का? सर्व गोष्टीना याची मुक संमती असते का? विधायके मंजुर करताना मुके राहुन एकमत दाखवित असतील तर गेल्या पांच वर्षात फक्त २५८ विधायके का मंजुर झाली? यापुढे हेच नेते देशाचे लोकप्रतिनीघीत्व करणार आहेत. लोकसभेतील खासदारांकडुन राजकीय व सामाजिक प्रल्गभता दिसायला मिळेल अशी अक्षेपा बाळगणांर्याच्या वेगवेगळ्या पक्षांच्या जेष्ट नेत्यांची अनेक घटनांनी घोर निराशा होते तरी हे नेते कसे शांत बसु शकतात? सभेतून जनतेला आश्वासने देणारे नेते लोकसभेत का गप्प बसतात? जनतेचे प्रश्न लोकसभेत का माडंत नाहीत? पधंराव्या लोकसभेतील लोकप्रतिनिधीची निवड करताना, चौदाव्या लोकसभेतील आपल्या सर्व लोकप्रतिनिधीच्या वर्तनाची दखल घेऊनच जनतेने योग्य लोकप्रतिनिधीची निवड करावी.

No comments: