Friday, March 13, 2009

'काळा घोडा' त एक दिवस मराठीचा असावा.

नुकताच मुबंईत पार पडलेल्या 'काळा घोडा' फेस्टिवलमघ्ये यंदा प्रथमच मराठी कार्यक्रमाना प्रवेश दिला गेला.मराठी साहित्यातील मराठी कवितांचे काव्यवाचन व परीसंवादाच्या कार्यक्रमाना मराठी रसिकांचा सहभाग अल्प होता. या फेस्टिवलमघ्ये फक्त मराठी भाषेच्या कार्यक्रमाना एक दिवस देण्यात यावा व त्याची विशेष प्रसिध्दि केल्यास त्याला मराठी रसिकांची भरभरुन दाद मिळेल.
हे कलेचे फेस्टिवल मुबंईत भरविण्यात येते पण मराठी भाषेचे कार्यक्रम संयोजकांनी दिलेल्या ठराविक बेळेत उरकावे लागते.ठराविक वेळेत उरकण्यासारखे आपले मराठी भाषेचे साहीत्य आहे का? चागंल्या कार्यक्रमांची आखणी करुन उत्तम दर्जाचे मराठी भाषेचे कार्यक्रम सादर केल्यास सर्व मराठी रसिकाना सहभागी होण्यास आनंद होईल. या वर्षी फक्त सारेगमाच्या 'लिटिल चँम्प्स'ना ह्या फेस्टिवलमघ्ये मराठी गाण्याची संधी दिली असती तरी त्यांनी हा फेस्टिवल गाजविला असता.
हे माझे पत्र दि.१४ मार्चच्या महाराष्ट्र टाइम्स मघ्ये प्रसिध्द झालेले आहेत.

1 comment:

HAREKRISHNAJI said...

योग्य लिहिले आहेत. ब्लॉग देखणा आहे