Tuesday, March 17, 2009

कौन बनेगा पीएम?

सध्या आँनलाईन आणि मोबाईल गेम्सची धूम आहे.निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा लागेल.कौन बनेगा 'पीएम' हा येथे मुद्दाच नाही.तुम्ही माऊस क्लिक करुन किंवा सेलफोनचे बटन दाबुन ह्व्या त्या नेत्याला पंतप्रधान बनवा.देशातील राजकारणावर नव्या गेम्सची मालिकाच आली आहे.प्रमुख आघाडिच्या नेत्यांचे पात्र या गेममघ्ये उतरलेले असेल.स्पर्धा असेल पंतप्रधानपदासाठी व त्याना निवडुन देण्याची जबाबदारी खेळ खेळणार्यावर असेल. पंतप्रधान डाँ.महमोहनसिंग,भाजपचे ज्येष्ट नेते लालकृष्ण अडवाणी,बसपाच्या अध्यक्ष मायावती यांचे पात्र या खेळात सहभागी असतील. अडथळ्यांची,धावण्याची,पोहण्याची,उंच उडीची शर्यत सोबत भालफेक व रस्सीखेचसारख्या खेळात करमणुक होईल. वेगवेगळ्या नविन खेळाने भरपूर करमणुक करणारी ही कार्टून पात्रे कोणत्याही पक्षाचा प्रचार करणारी नाहीत. सर्व वयोगटाप्रमाणे हे खेळ बनविले आहेत. निवडणुकही राजकारणात मोठी उलथापालथा घडविणारी घडामोड असल्यामुळे नवनविन खेळ माक्रेटमघ्ये आणार आहेत. मोबाईलवर व आँनलाईनवर गेम्स खेळणार्याला आपल्या आवडत्या नेत्याला निवडायचे आहे.भारतातील प्रमुख पतंप्रधानपदाच्या दावेदार नेत्यांची अशी चेष्टा या गेम्समघुन चाललेली आहे. या सर्व प्रकाराला खेळणारांची संमती आहेच पण हा सर्व प्रकार आपल्याला मान्य आहे का?

No comments: