Tuesday, April 14, 2009

रिसाट


भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)आता दिवसाचे २४ तास हवामानाची माहिती देणारा उपग्रह अवकाशात सोडणार आहे.येत्या २० एप्रिल रोजी श्रीहरीकोटा येथून हा उपग्रह अग्निबाणाच्या मदतीने अवकाशात जाईल , तेव्हा आपल्या अवकाशविषयक कार्यक्रमामघ्ये एक नव्या अध्याय लिहिला जाईल. आज आपल्याला दिवसाचे २४ तास हवामानाविषयक माहीती मिळविण्यासाठी पतदेशांच्या उपग्रहांवर अवलंबून राहावे लागत आहे. आता 'रिसाट' म्हणजे 'रिमोट इमेजिंग सँटेलाइट'या उपग्रहामुळे आपण त्याहीबाबतीत स्वयंपुर्ण होण्याच्या मार्गाला लागणार आहोत.जागतिक स्तरावर झपाटयाने बदलत असणारे हवामान व त्याचे अनेक ठिकाणी दिसू लागलेले दृश्यपरिणाम विचारात घेता अशा प्रकारच्या उपग्रहाची आपल्याला अतिशय आवश्यकता होती. 'रिसाट' मुळे ती पूर्ण होणार आहे.विशेषत: हिमालयातील हिमनद्दांची स्थिती,ओरिसाच्या किनार्याला धडका देणारा समुद्र,आक्रसत जाणारी जंग़ले या आणि अशा इतर गोष्टींबाबत आपण अधिकाअधिक सजग राहण्याची गरज आहे,हे अलीकडच्या काळात दिसून आले आहे. परंतू या उपग्रहाचा तेवढा एकच उपयोग नाही.या उपग्रहामुळे आपल्या सीमाभागामघ्ये काय चालले आहे, याचीही कल्पना येउ शकणार आहे. काश्मिरात अतिरेकी घुसण्य़ाचा प्रयत्न करत आहेत अशा बातम्या येत असताना आणि अलीकडेच राष्ट्रपतींच्या अरुणाचल प्रदेशाच्या भेटीच्या निमित्तने चीनने पुन्हा त्या प्रदेशावर अप्रत्यक्षपणे हक्क सांगितला असताना अशा उपग्रहाची आपल्याला गरज आहे. बांगलादेशातूनही आपल्या देशात,विशेषत: आसाममघ्ये,मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असल्याच्या बातम्या सतत येत असतात. गेले काही महिने श्रीलंकाही घुमसत आहे.थोडक्यात,देशाच्या सर्वच सीमा या अतिशय संवेदनक्षम बनल्या आहेत. त्या सांर्यावर बारकाईने नजर ठेवण्यासाठी हा उपग्रह उपयोगी पडणार आहे. दिवसाप्रमाणेच रात्रीच्या अंधारातसुद्धा छायाचित्रे घेण्याची क्षमता या उपग्रहाकडे असणार आहे. ढगांचे आच्छादन असले, तरी ते भेदून जमिनीवर टेहाळणी करणे आणि छायाचित्रे घेणे 'रीसाट' मुळेच शक्य होणार आहे. थोडक्यात,हा नवा उपग्रह म्हणजे २४ तास पहारा करणारा आणि माहिती पुरविणारा आकाशातील आपला शक्तीशाली डोळाच असेल. अर्थात त्यासाठी आपण इस्त्रायलचे तांत्रिक सहकार्य घेतले आहे.या मदतीमुळेच या नेत्राला दिवसाच्या उजेडात आणि रात्रीच्या अंधारात आपले काम करता येणार आहे. सीमाभागातील हालचाली रात्रीच आधिक प्रमाणात होत असतात.त्याची चाहूल आपल्याला लागलीच मिळून खबरसारीचे उपाय योजता येतील.कोणत्याही गाजावाजा न करता इस्रो अशी कामे करत आहे,हे ,विशेष.

No comments: